Monday , December 15 2025
Breaking News

बेळगाव

एएसीपी नारायण बरमणी स्वेच्छानिवृत्तीच्या तयारीत!

  बेळगाव : बेळगावातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी हात उचलल्याने नाराज झालेले धारवाडचे एएसपी नारायण बरमणी यांनी सरकारकडे स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज केल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला आहे. समजावण्यामुळे एएसीपी नारायण बरमणी काहीसे शांत झाल्याचे सांगितले जाते. पण ते झालेल्या अपमानामुळे दुखावले गेले. म्हणूनच, त्यांनी कामावरून …

Read More »

सरकारी मराठी मॉडेल शाळेत मासिक पालक सभेचे आयोजन…

  बेळगाव : सरकारी मराठी मॉडेल शाळेत मंगळवार दिनांक 01/07/2025 रोजी मासिक पालक सभेचे आयोजन करण्यात आले. या सर्व पालकांचे ईशस्तवन व स्वागत गीताने शाळेच्या विद्यार्थ्यिनी केले. यानंतर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एम्.एस्. मंडोळकर यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र चलवादी यांनी केले. यामध्ये 2025-26 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करणे, शाळा …

Read More »

ज्येष्ठ पत्रकार, वीरवाणीचे संपादक सुनील आपटे कालवश

  बेळगाव : ज्येष्ठ पत्रकार, साप्ताहिक वीरवाणीचे संपादक श्री. सुनील गणपतराव आपटे (वय 65) यांचे दि. 2 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. सुनील आपटे सिद्धहस्त पत्रकार होते. त्यांनी दै. तरुण भारत, सकाळ, पुढारी, स्वतंत्र प्रगती येथे सेवा बजावली होती. कथा, कविता, संगीतावर त्यांनी अनेक …

Read More »

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे डॉक्टर व सीएंचा सत्कार

  बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणने रोटरी इंटरनॅशनल वर्ष 2025-26 ची सुरुवात एक हृदयस्पर्शी सत्कार समारंभ घेऊन केली. ज्यामध्ये वैद्यकीय आणि आर्थिक क्षेत्रातील मान्यवर व्यावसायिकांचा लक्ष्मी भवन येथे गौरव करण्यात आला. यावेळी डॉ. महादेव दिक्षित, डॉ. माधुरी दिक्षित, डॉ. देवगौडा इमगौडनावर, डॉ. सविता कड्डू,, सीए भागू दोयापडे यांचा …

Read More »

भिंत कोसळून लाखोंचे नुकसान : सुदैवाने जीवितहानी नाही

  कुद्रेमानी येथील जीवननगर परिसरातील घटना कुद्रेमानी : बेळगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या सततच्या मुसळधार पावसामुळे कुद्रेमानी येथील जीवननगर परिसरात मंगळवार दिनांक ३० जून रोजी मध्यरात्री भीषण दुर्घटना घडली. श्रीमती सखूबाई गोपाळ पन्हाळकर यांच्या घराची पश्चिमेकडील संपूर्ण भिंत रात्री बारा वाजून तीस मिनिटांनी कोसळली. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान …

Read More »

संगरगाळी गावातील युवकांनी बुजविले स्वखर्चातून खड्डे!

  बेळगाव : पिरनवाडी येथे बेळगाव खानापूर रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यावर सर्वत्र खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे खड्ड्यात पाणी साचले आहे त्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. या रस्त्यावरून ये-जा करणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देण्यासारखे आहे. खानापूर तालुक्यातील बरेच युवक उद्यमबाग येथे कामानिमित्त येत …

Read More »

सब ज्युनियर राज्यस्तरीय स्पर्धेसाठी बेळगावचा हॉकी संघ रवाना!

  बेळगाव : बळ्ळारी येथे होणाऱ्या सब ज्युनियर राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा दि. 2 ते 6 जुलै दरम्यान होणार आहेत. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी हॉकी बेळगाव संघ रवाना झाला. यामध्ये संघात यशवंत बजंत्री, अशोक येळूरकर, भैरू आरे, समर्थ अकोळ, समर्थ करडीगुद्दी, आर्यन घगणे, फैजल, रोहीत घुगरी, पार्थ कडलास्कर, आदर्श अमाती, अयान …

Read More »

….म्हणे सीमाप्रश्न संपलेला अध्याय : इराण्णा कडाडी बरळले!

  बेळगाव : सीमाप्रश्न संपलेला अध्याय आहे. स्थानिक नेते केवळ राजकारण करण्यासाठी सीमाप्रश्न जिवंत ठेवला आहे, स्थानिक जनतेला फक्त विकास पाहिजे, असे हास्यास्पद विधान करून राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी मराठी भाषिकांना डिवचले आहे. त्यामुळे इराण्णा कडाडी यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना राज्यसभा सदस्य इराण्णा …

Read More »

आदर्श मल्टीपर्पज सोसायटीतर्फे सभासदांच्या गुणी मुलांचा होणार गौरव

  बेळगाव : अनगोळ रोड, टिळकवाडी येथील सुप्रसिद्ध आदर्श मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्या वतीने सभासदांच्या गुणी मुलांचा गौरव करण्यात येणार आहे. गेल्या मार्च-एप्रिलमध्ये झालेल्या दहावी, बारावी, पदवी किंवा पदविका परीक्षेत 75 टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळविलेल्या तसेच अभियांत्रिकी, वैद्यकीय, एमबीए, एमसीए, सीए परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि पीएच. डी. प्राप्त मुलांचा …

Read More »

अलतगा – कडोली संपर्क रस्त्या म्हणजे मृत्यूचा सापळा!

    बेळगाव : अलतगा- कडोली संपर्क रस्त्यावर अलतगा हद्दीत भले मोठे खड्डे पडले असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी प्रतिक्रिया व्यक्त होतं आहे. या खड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने या खड्ड्यांना तळ्याचे स्वरूप आले आहे त्यामुळे दुचाकी वाहन तसेच मालवाहू रिक्षा चालकांनी या रस्त्यावरुन‌ या प्रवास करण्याचे बंद केले …

Read More »