बेळगाव : नेगील योगी रयत सेवा संघ कर्नाटक बेळगाव शाखा यांच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या सहाय्यकानी शेतकऱ्यांच्या निवेदनाचा स्वीकार केला व सदर निवेदन लवकरात लवकर शासनाकडे पाठवून त्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात …
Read More »इंगळगी मारहाणी प्रकरणी चार जणांना अटक
बेळगाव : हुक्केरी तालुक्यातील इंगळी गावात श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना झालेली मारहाणीची घटना दुर्दैवी आहे. या प्रकरणी चार जणांना गजाआड करण्यात आली असल्याची माहिती बेळगावचे जिल्हा पोलिस प्रमुख भीमाशंकर गुळेद यांनी दिली. पत्रकार परिषदेत माहिती देताना ते म्हणाले की, काल हुक्केरी तालुक्यातील इंगळी गावात एक दुर्दैवी घटना घडली आणि त्याचा …
Read More »श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ ३ जुलै रोजी हुक्केरी बंदचा इशारा
हुक्केरी : अवैध गो तस्करी करणाऱ्यांची अडवणूक करणाऱ्या श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ३ जुलै रोजी हुक्केरी बंदचा इशारा देण्यात आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांच्या नेतृत्वाखाली “चलो इंगळगी” निषेध रॅली काढण्यात येणार आहे. श्रीराम सेनेचे प्रदेशाध्यक्ष गंगाधर कुलकर्णी यांनी या संदर्भात बोलताना …
Read More »हवेत गोळ्या झाडून साजरा केला वाढदिवस; ग्रामपंचायत सदस्याला अटक
बेळगाव : बेळगावमध्ये एका ग्रामपंचायत सदस्याने सार्वजनिकरित्या हवेत गोळ्या झाडल्या, हातात चाकू धरून बेधुंद होऊन वाढदिवस साजरा केला. बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील कुडची शहरात एका ग्रामपंचायत सदस्याने गुंडासारखे वर्तन केले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बाबाजान खलीमुंडसाई यांनी हवेत गोळ्या झाडून, हातात चाकू धरून आणि बेधुंद …
Read More »जुगार अड्ड्यावर छापा: १२ आरोपींना अटक
बेळगाव : जुगार सुरू असलेल्या अड्ड्यावर छापा टाकला आणि १२ आरोपींना अटक केली. अंदरबाहर खेळत असल्याची माहिती मिळाल्याने बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचे पीएसआय संतोष दलवाई यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नंदीहळ्ळी गाव हद्दीतील वाकडेवड रोडवरील रवी टोपकर यांच्या शेतात छापा टाकला आणि १२ आरोपींना अटक करण्यात आली. गोविंद परशुराम चौगुले, सूरज …
Read More »श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना झाडाला बांधून मारहाण
बेळगाव : गायींची अवैध तस्करी करण्यासंदर्भात जाब विचारण्यास गेल्याच्या कारणावरून हुक्केरी तालुक्यातील इंगळी गावात श्रीरामसेनेच्या पाच कार्यकर्त्यांना झाडाला बांधून मारहाण करण्यात आल्याची घटना यमकनमर्डी पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली असून या घटनेमुळे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी, गायींची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर, श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी गायींची वाहतूक करणारे …
Read More »मोफत आरोग्य तपासणी शिबिरात नागरिकांचा उत्साहवर्धक सहभाग
बेळगांव : शिवाजी रोड कोनवाळ गल्ली येथे रविवारी झालेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात बेळगांवकरांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. एंजल फाउंडेशन, हिरकणी महिला मंडळ आणि राजा शिवछत्रपती युवक मंडळ या तीन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हे उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सिद्धार्थ नेत्रालय आणि विजय ऑर्थो सेंटर या आघाडीच्या वैद्यकीय संस्थांच्या …
Read More »तनिष्का काळभैरव हिची विजयी घोडदौड सुरूच!
बेळगाव : ताश्कंद येथील जागतिक टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत (डब्ल्यूटीटी) रौप्य आणि सुवर्ण पदक मिळविल्यानंतर बेळगावच्या तनिष्का काळभैरव हिने स्वीडन आणि नॉर्वेमध्ये रौप्य पदके जिंकून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. नवीन आत्मविश्वास आणि धारदार कौशल्यांसह भारतात परतताना तनिष्का हिने बेंगलोर येथे झालेल्या दुसऱ्या कर्नाटक राज्य …
Read More »सक्षम स्पोर्ट्स एरिनाच्या फुटबॉल स्पर्धेत सेंट झेवियर्स अजिंक्य!
बेळगाव : बेळगाव शहरातील टिळकवाडी येथील सक्षम स्पोर्ट्स एरिना या क्रीडा संस्थेतर्फे आयोजित 14 वर्षाखालील बाद पद्धतीच्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद सेंट झेवियर्स हायस्कूल संघाने पटकावले आहे. सदर स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात सेंट झेवियर्स हायस्कूल संघाने प्रतिस्पर्धी ज्योती सेंट्रल हायस्कूलचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला विजेत्या सेंट झेवियर संघातर्फे अरकन …
Read More »प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे यांची कला शाखेच्या अधिष्ठातापदी नियुक्ती
बेळगाव : येथील राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी विभागातील प्राध्यापक डॉ. चंद्रकांत वाघमारे यांची राणी चन्नम्मा विद्यापीठातील कला शाखेच्या अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यात आली. सदर नियुक्ती कर्नाटक राज्य सरकार विद्यापीठ विधायक-2000, परिच्छेद 21(1) च्या नियमानुसार करण्यात येते. डॉ.चंद्रकांत वाघमारे हे गेल्या अठ्ठावीस वर्षापासून मराठी विभागात सेवा बजावत असून विद्यापीठातील अनेक समित्यावर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta