Thursday , April 30 2026
Breaking News

आशादीपतर्फे आई-वडिलांचा आधार नसलेल्या मुलाला शिक्षणासाठी आधार

Spread the love

 

येळ्ळूर : महावीर नगर उद्यामबाग येथे भाड्याच्या घरामध्ये आजी सोबत राहणाऱ्या व आई-वडील असून देखील गेल्या चार वर्षापासून आजीकडे सोडून गेलेल्या मुलाला आशादिप वेल्फेअर सोसायटीतर्फे 5000 व शैक्षणिक साहित्य बरोबरच अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.
वास्तविक पाहता या मुलाचा सांभाळ करण्यासाठी त्याच्या आजी ऑफिसमध्ये फरशी पुसण्याच्या कामापासून घरोघरी जाऊन भांडी धूनी अशा प्रकारचे कामे करून नातवाच्या व आपल्या पोटाची खळगी भरत असते. ही बाब आशादीप वेल्फेअर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष व अभियंते हणमंत कुगजी व त्यांच्या पत्नी सौ. उज्वला कुगजी यांच्या कानी पडता हे दाम्पत्य मदतीला धावले. व आजीला त्या मुलाच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी घेण्याची ग्वाही देऊन त्यांना धीर दिला.
अभियंते हणमत कुगजी यांनी आत्ताच झालेल्या गणेशोत्सवामध्ये विराट गल्ली येळ्ळूर येथील युवकांना डॉल्बी सारख्या कर्कश आवाजापासून दूर राहून पारंपरिक वाद्याचा उपयोग करून गणरायाचे आगमन करण्यासाठी 31 हजार रुपयाची देणगी देखील दिली.

About Belgaum Varta

Check Also

प्रगणकांनी काम संपवले; महापालिकेचे किट अजूनही हवेत!

Spread the love  प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्न बेळगाव : बेळगाव शहर परिसरात सुरू असलेल्या जनगणनेच्या कामामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *