Monday , December 15 2025
Breaking News

बेळगाव

अट्टल दुचाकी चोरास एपीएमसी पोलिसांकडून अटक; 9 दुचाकी जप्त

  बेळगाव : बेळगावच्या के.एल.ई. रुग्णालयाच्या मागील कर्करोग रुग्णालयासह विविध ठिकाणी पार्क केलेल्या दुचाकींची चोरी करणाऱ्या अट्टल चोरास एपीएमसी पोलिसांनी अटक करून एकूण 9 दुचाकी जप्त केल्या. मूळचा गोकाक येथील आणि सध्या बेळगावच्या वैभवनगर येथील रहिवासी असलेल्या संतोष अंदानी असे त्याचे नाव आहे. शहर पोलिस आयुक्त, उपायुक्त आणि सहाय्यक पोलिस …

Read More »

मालमत्ता चोरी प्रकरणी आरोपींना अटक; बेळगाव ग्रामीण पोलीसांची कारवाई

  बेळगाव : बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षक (पीआय) यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मालमत्ता प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींना शोधून अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे १३० ग्रॅम सोन्याचे दागिने, ज्यांची अंदाजे किंमत १३,२२,७५० रुपये आहे, आणि ३१० ग्रॅम चांदीचे दागिने, ज्यांची अंदाजे किंमत ३७,८२० रुपये आहे, तसेच २५,००० रुपये किमतीचे प्लंबिंग …

Read More »

बेळगावात २२ जून रोजी सूर्यनमस्कार मॅरेथॉनचे आयोजन

  बेळगाव : जागतिक योग दिनानिमित्त बेळगावच्या इतिहासात पहिल्यांदाच सनातन संस्कृती एवं योग सेवा संघाच्या वतीने २२ जून रोजी सूर्यनमस्कार मॅरेथॉन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष डॉ. प्रशांत कटकोळ यांनी दिली. आज बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. २५ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, २२ जून …

Read More »

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची पुनर्रचना; मध्यवर्तीच्या पाठपुराव्याला यश

  बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर महाराष्ट्र शासनाने नुकतेच एक शासन परिपत्रक काढले असून, सीमाप्रश्न सोडवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चाधिकार समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. 21 फेब्रुवारी 2025 रोजी दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना व उपमुख्यमंत्र्यांना तसेच महाराष्ट्रातील इतर नेत्यांना सीमाप्रश्नासंदर्भात निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी …

Read More »

कसाई गल्लीतील फिश आणि मटण मार्केटजवळील रस्त्याची दुर्दशा!

  बेळगाव : बेळगावातील कसाई गल्लीतील फिश आणि मटण मार्केटजवळील रस्त्याची दुर्दशा झाली आहे. विकासकामांसाठी खणलेला खड्डा योग्यरित्या न बुजवल्यामुळे तो उघडाच राहिला आहे, ज्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना ये-जा करताना अडचणी येत आहेत. कसाई गल्लीचा हा रस्ता केंद्रीय बस स्थानकाला जोडणारा प्रमुख मार्ग आहे. येथे पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनांची वाहतूक सुरळीत …

Read More »

20 जूनपासून चौथे रेल्वे गेट अंडर पास कामाला सुरुवात; वाहतूक मार्गात बदल

  बेळगाव : चौथे रेल्वे गेट अंडरपासचे काम सुरू होणार असून वाहतूक व्यवस्थेसाठी जनतेने पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन बेळगाव रहदारी पोलिसांनी केले आहे. बेळगाव पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात याची माहिती दिली आहे. बेळगाव शहरातील अनगोळ येथील 4थ्या रेल्वे अंडर ब्रिजच्या बांधकामाला येणाऱ्या 20.06.2025 पासून …

Read More »

रुक्मिणी नगरमध्ये कारवर कोसळले झाड!

  बेळगाव : बेळगावच्या रुक्मिणी नगरमध्ये मुसळधार पावसामुळे एका कारवर भलेमोठे झाड कोसळल्याची घटना घडली आहे. बेळगावात पावसाने आपला कहर सुरूच ठेवला आहे. शहरातील रुक्मिणी नगर येथे मुसळधार पावसामुळे घरासमोर उभ्या असलेल्या कारवर एक भलेमोठे झाड कोसळले. यामुळे कारचे मालक, रुक्मिणी नगर येथील प्रदीप हुलकुंड यांना लाखो रुपयांचे नुकसान झाले …

Read More »

बसमधील खिडकीकडे बसण्यावरून विद्यार्थ्यावर धारदार शस्त्राने वार; विद्यार्थी गंभीर जखमी

  बेळगाव : बसच्या खिडकीकडे बसण्यावरून विद्यार्थ्यावर अज्ञात तरुणांच्या एका गटाने धारदार शस्त्राने वार केल्याची घटना आज बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकावर घडली. बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकावर, बसच्या खिडकीच्या सीटसाठी अज्ञात तरुणांचे एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याशी भांडण झाले, भांडण वाढले आणि विद्यार्थ्याच्या छातीत धारदार शस्त्राने वार करण्यात आले आणि तो पळून गेला. …

Read More »

उपनिबंधक पदी रवींद्र पाटील यांची फेरनिवड

  बेळगाव : बेळगाव जिल्हा सहकारी संघाच्या उपनिबंधक म्हणून रंजना पोळ यांनी मागच्या आठवड्यात पदभार स्वीकारला होता. या निवडीविरुद्ध उपनिबंधक रवींद्र पाटील यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यांची मागणी मान्य करून उच्च न्यायालयाने आज रवींद्र पाटील यांची उपनिबंधक म्हणून फेरनिवड केली असून ते उद्या बुधवारी आपला पदभार स्वीकारणार आहेत.

Read More »

‘वेगा हेल्मेट’ कंपनीच्या कर थकबाकीवरून महापालिका बैठकीत वादळी चर्चा

  सखोल चौकशी करून रक्कम वसूल करा ; महापौर मंगेश पवार यांचे निर्देश बेळगाव : बेळगावातील प्रतिष्ठित ‘वेगा हेल्मेट’ कंपनीने महापालिकेला सात कोटींहून अधिक रुपयांची करचुकवेगिरी केल्याच्या आरोपावरून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि ती रक्कम वसूल करावी, असे निर्देश महापौर मंगेश पवार यांनी दिले. मंगळवारी बेळगाव महापालिकेच्या कौन्सिल हॉलमध्ये …

Read More »