Monday , December 15 2025
Breaking News

बेळगाव

भारतीय संविधानाच्या प्रतिज्ञेने पार पडला विवाह!

  बेळगाव : धार्मिक रीतीरिवाजांना फाटा देऊन भारतीय संविधानाच्या प्रतिज्ञेने शहरात एक अभिनव व ऐतिहासिक विवाह सोहळा संपन्न झाला. शहरातील प्रसिद्ध दलित नेते व सामाजिक कार्यकर्ते मल्लेश चौगले यांच्या कनिष्ठ पुत्राचा विवाह संविधानाची शपथ घेऊन पार पडला, ज्याने सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रात चर्चेला सुरुवात झाली आहे. ऍड. विशाल चौगले (वर) …

Read More »

ब्रिगेडिअर जॉयदीप मुखर्जींची शांताई वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट

  बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडिअर जॉयदीप मुखर्जी यांनी आज आपल्या कुटुंबीयांसह आणि जवानांसह शांताई सेकंड होम या वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट दिली. वृद्धाश्रमातील आजीबाईंनी ब्रिगेडिअर मुखर्जींचे पारंपरिक आरतीने उत्साहात स्वागत केले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली. वृद्धाश्रमातील हिरवळ, स्वच्छ परिसर आणि आनंदी वातावरण पाहून ते …

Read More »

आमदार लक्ष्मण सवदी यांच्या कारला अपघात…

  अथणी : बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथील दरूरजवळ माजी उपमुख्यमंत्री, आमदार लक्ष्मण सवदी यांच्या कार आणि मालवाहू वाहनामध्ये अपघात झाला. लक्ष्मण सवदी हे अथणीहून गोकाक मार्गे बंगळुरूला जात होते. यावेळी त्यांच्या कारला एका मालवाहू वाहनाची धडक झाली. सुदैवाने लक्ष्मण सवदी धोक्यातून बचावले. अपघातानंतर लक्ष्मण सवदी दुसऱ्या कारने बंगळुरूला निघाल्याचे कळते. …

Read More »

शेतकऱ्यांनी बांधलेल्या रस्त्यावर अडथळा : संतप्त शेतकऱ्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी गावाच्या हद्दीत असलेल्या कलारकोप्प येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जाण्यासाठी स्वतः तयार केलेल्या रस्त्यावर एका व्यक्तीने अडथळा निर्माण केल्याने त्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात हिरेबागेवाडी गावाच्या हद्दीतील कलारकोप्पचे …

Read More »

कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशनतर्फे एशियन स्पर्धेसाठी निवड झालेल्या देवेन बामणेचा सत्कार

  बेळगाव : सप्टेंबर महिन्यात कोरिया येथे होणाऱ्या एशियन रोलर स्केटिंग स्पर्धेत भारतीय संघात निवड झालेल्या बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचा स्केटर देवेन बामणे याचा कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशनतर्फे सत्कार करण्यात आला. हा सत्कार कर्नाटक राज्याचे क्रीडा अधिकारी श्री. चेतन आर. आय पी एस यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. यावेळी …

Read More »

गणेशपूर मेन रोडवर कचऱ्याचे साम्राज्य!

  बेळगाव : गणेशपूर मेन रोडवरील सैनिक क्वार्टर्ससमोर “कचरा फेकू नये” असा सूचना फलक लावलेला असतानाही, नेमक्या त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा टाकला जात आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, बेळगाव महापालिकेच्या आरोग्य विभागाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे. गणेशपूर मेन रोडवरील सैनिक क्वार्टर्ससमोर लावलेल्या या …

Read More »

महात्मा ज्योतिबा फुले वाचनालयाच्या वतीने सुरेश रोटी यांचा सत्कार

  उचवडे : उचवडे (ता. खानापूर ) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेचे शिक्षक सुरेश रोटी हे आपल्या 35 वर्षांच्या प्रदीर्घ शिक्षकी सेवेतून नुकतेच निवृत्त झाले. त्यामुळे उचवडे येथील महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने त्यांचा हृधसत्कार करण्यात आला. वाचनालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री कलमेश्वर युवक संघाचे अध्यक्ष व्ही. एन. …

Read More »

बेळगाव जिल्हा जिम ओनर्स असोसिएशनची कमिटी जाहीर

  बेळगाव : बेळगाव जिल्हा जिम ओनर्स असोसिएशन यांच्यावतीने आज रविवार दि. 8 रोजी सर्वसाधारण बैठक शिवबसव प्लाझा फुलबाग गल्ली येथे घेण्यात आली. संस्थापक किरण कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत मागील वर्षांतील जमाखर्च सादर करण्यात आला. त्याचप्रमाणे एकमताने नवीन कमिटीची निवड करण्यात आली. नवीन कमिटी पुढीलप्रमाणे अध्यक्षपदी चेतन ताशीलदार तर …

Read More »

यशाचा राजमार्ग मेहनतीतून जातो : सचिन शिंदे यांचे प्रतिपादन

  मराठी अध्यापक संघाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा चंदगड : “आयुष्यात यश मिळवण्यासाठी शॉर्टकटचा मार्ग न पत्करता प्रामाणिकपणे कष्ट घेणं गरजेचं आहे. कारण प्रामाणिक प्रयत्नांनी मिळालेलं यशच खऱ्या अर्थाने टिकतं आणि जीवनाला दिशा देतं,” असे स्पष्ट मत कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री. सचिन शिंदे यांनी व्यक्त केले. …

Read More »

दिवंगत शीतल बडमंजी यांची श्रद्धांजलीपर शोकसभा 9 रोजी

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतनच्या जेष्ठ शिक्षिका, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व, शीतलताई बडमंजी यांचे शुक्रवारी पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले… त्यांच्या निधनाच्या शोक प्रित्यार्थ सोमवार दिनांक ९ जून रोजी सायं. ४.३० वा. मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहामध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ, मराठी विद्यानिकेतन, मराठा …

Read More »