Tuesday , December 16 2025
Breaking News

बेळगाव

बेळगावमध्ये ऑटो मीटर सक्तीचे करण्यात येणार; जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन

  बेळगाव : बेळगावमध्ये पुढील तीन महिन्यांत ऑटो मीटर सक्तीचे केले जाईल, अशी घोषणा जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केली आहे. आज पत्रकार संवाद कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले की, ऑटो मीटर सक्तीचे करण्यासाठी त्यांनी आणि प्रादेशिक परिवहन आयुक्तांनी अनेकदा बैठका घेतल्या असून, ऑटो चालक …

Read More »

मुतगा कृषी पत्तीन सहकारी संघाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी; भागधारकांची मागणी

  बेळगाव : मुतगा (ता. जि बेळगाव) येथील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघ लिमिटेड या संस्थेतील भ्रष्टाचाराची चौकशी करावी आणि या संस्थेकडून गेल्या दोन वर्षापासून प्रलंबित असलेले पीक कर्जाचे वाटप तात्काळ पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी संस्थेच्या भागधारक शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मुतगा प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघ …

Read More »

धर्मशास्त्र परंपरेला पुढे नेण्यासाठी श्रीहरी छ. शिवाजी महाराज गुरुकुलची स्थापना : श्री मंजुनाथ भारती स्वामी

  बेळगाव : भारतीय अध्यात्मिक परंपरा जगाला प्रेरणादायी आहे. आपला देश धार्मिक क्षेत्रात अग्रेसर आहे. मात्र आधुनिक युगात धर्मशास्त्र आणि परंपरेचा ऱ्हास होत चालला आहे. याचकडे लक्ष देऊन धर्मशास्त्र परंपरेला पुढे नेण्यासाठी हल्याळ येथे श्रीहरी छत्रपती शिवाजी महाराज गुरुकुल स्थापन करण्यात येत आहे. या कामात प्रत्येकाचे सहकार्य आणि योगदान महत्त्वाचे …

Read More »

मॅजेस्टिक ग्रुपच्या मुलाखती पुढे ढकलल्या…

  बेळगाव : मॅजेस्टिक ग्रुपच्या वतीने टेलीकॉलर्स, कस्टमर सर्व्हिस ऑफिसर आणि कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह पदांसाठी २५ मे २०२५ रोजी होणाऱ्या मुलाखती (इंटरव्ह्यू) ढकलण्यात आल्या आहेत. या मुलाखती कॉलेज रोड येथील हॉटेल सन्मान डिलक्समध्ये सकाळी ११ ते सायंकाळी ७ दरम्यान घेण्यात येणार होत्या. कंपनीतर्फे जारी केलेल्या माहितीनुसार, “काही अडचणींमुळे मुलाखतीची तारीख …

Read More »

महिला व बाल कल्याण खात्याच्या कार्यालयावर लोकायुक्त पोलिसांची धाड; लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

  बेळगाव : महिला व बाल कल्याण खात्याच्या कार्यालयावर लोकायुक्त पोलिसांनी धाड टाकून अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या बदलीसाठी 15 हजार रुपयांची लाच स्वीकारताना कार्यालयीन अधीक्षक व कॉम्प्युटर ऑपरेटरला रंगेहात पकडल्याची घटना आज घडली. लोकायुक्तांच्या जाळ्यात सापडलेल्या कार्यालयीन अधीक्षकाचे नांव अब्दुल वली आणि कॉम्प्युटर ऑपरेटरचे नाव सौम्या बडीगेर असे आहे. बदलीसाठी अंगणवाडी सहाय्यीकेकडे …

Read More »

डॉक्टरांच्या सल्ल्यावर विश्वास ठेवा : डॉ. दत्तप्रसाद गिजरे

  आदर्श माता सन्मान सोहळा उत्साहात बेळगाव : “डॉक्टर आपल्या अनुभवाच्या आधारे सल्ला देतात,डॉक्टरांच्या सल्ल्यावर विश्वास ठेवा महिलांनी त्यांच्या आरोग्याबाबत जागरूक राहून वेळच्यावेळी तपासणी करावी. तब्येत गंभीर झाल्यानंतरच डॉक्टरांकडे जाणे टाळावे आणि नंतर त्यांना दोष देणे चुकीचे आहे,” असा मोलाचा सल्ला डॉ.दत्तप्रसाद गिजरे यांनी दिला. तारांगण रोटरी क्लब व जननी …

Read More »

शहापूर स्मशानभूमीतील निवारा कोसळला, सुदैवाने जीवितहानी टळली

  बेळगाव : शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमीत असलेला अंत्यविधी निवारा आज दुपारी झाड कोसळून संपूर्णतः कोसळला आहे. सदर घटनेच्या वेळी शेजारील निवाऱ्यात अंत्यविधी सुरू होते. मात्र नागरिक यावेळी दूर थांबलेले असल्यामुळे केवळ सुदैवानेच जीवित हानी टळली. शहापूर स्मशानभूमीत 21 वर्षांपूर्वी मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळ आणि गौड सारस्वत ब्राह्मण समाज यांच्या वतीने …

Read More »

हॉकी प्रशिक्षण शिबीराचा शनिवारी समारोप समारंभ

  बेळगाव : बेळगाव हॉकी बेळगाव तर्फे घेण्यात येणाऱ्या मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिराचा समारोप समारंभ शनिवार दि. 24 मे रोजी सायंकाळी 6 वाजता लायन्स क्लब ऑफ टिळकवाडीच्या लायन्स भवन येथे होणार आहे. यावेळी बेळगावचे खासदार व माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन व जय भारत फाउंडेशनचे सचिव नंदकुमार तलरेजा …

Read More »

15 जून रोजी सर्व शाखांमधील ब्राह्मण समाजाचा वधू- वर मेळावा

  बेळगाव (प्रतिनिधी) : श्री सप्तगिरी सेवा प्रतिष्ठान बेळगाव आणि विश्व मध्व महा परिषद बेळगाव यांच्या वतीने १५ जून रोजी बेळगाव येथील राणी चन्नम्मा नगर येथील श्री सत्यप्रमोद सभागृहात सर्व शाखांमधील ब्राह्मणांचा वधू वर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यासंदर्भात प्राचार्य श्रीधर हुकेरी आणि डॉ. दत्तप्रसाद गिझरे यांनी पत्रकार परिषदेत …

Read More »

राष्ट्रीय एकात्मतेसाठी आंतरजातीय विवाह काळाची गरज : शिवाजी हसनेकर

  बेळगाव : आंतरजातीय विवाह होणे हे राष्ट्रीय एकात्मतेसाठी गरजेचे आहे. आपल्या देशातून जातीयता नाहीशा करायच्या असतील तर आंतरजातीय विवाहाचे आपण स्वागतच केले पाहिजे. कारण जातीयता समाज विकासाला बाधकच आहेत, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते शिवाजी हसनेकर यांनी केले. बेळगाव जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या वतीने जागर विवेकाचा या सदराखाली आयोजित …

Read More »