Friday , November 6 2026
Breaking News

….म्हणे फक्त निवेदन द्या, मोर्चा काढू नका; बेळगाव पोलिसांची समितीच्या नेते मंडळींना नोटीस

Spread the love

 

बेळगाव – कन्नड सक्तीच्या विरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने सोमवार दिनांक 11 रोजी महामोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चासाठी शहर, उपनगर, बेळगाव तालुका तसेच खानापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. सोमवारच्या मोर्चाला मोठ्या संख्येने मराठी भाषिक उपस्थित राहणार अशीच दाट शक्यता आहे. दरम्यान पोलीस प्रशासनाने आज महाराष्ट्र एकीकरण समितीला महामोर्चा रद्द करावा आणि केवळ निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट द्यावी अशी सूचना केली आहे.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने महामोर्चासाठी प्रशासनाकडे रितसर परवानगी मागितली होती. या संदर्भात पोलीस प्रशासनाने महामोर्चामुळे वाहतुकीला अडथळा तसेच सर्वसामान्य नागरिकांना त्रास निर्माण होईल, शांतता ही भंग होईल या कारणास्तव महामोर्चाला परवानगी नाकारली आहे. महामोर्चा ऐवजी केवळ निवेदन देण्यात यावे, असे म. ए. समितीला सूचित करण्यात आले आहे.

दरम्यान, मनोहर किणेकर, मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, रमाकांत कोंडुस्कर आणि शुभम शेळके यांना नोटीस वाजवण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *