Friday , November 6 2026
Breaking News

चार महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या गर्भवती महिलेची आत्महत्या; खुनाचा संशय?

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील मच्छे गावात चार महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या तीन महिन्यांच्या गर्भवती महिलेचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. अनिता नीलेश निलदकर (२५) ही घरात लटकलेल्या अवस्थेत आढळली. अनिताचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळल्यानंतर तिच्या कुटुंबाने तिचा पती नीलेशवर हत्येचा आरोप केला आहे.
याबाबतची माहिती अशी की, पिझ्झा हटमध्ये काम करणाऱ्या अनिता आणि नीलेश एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी नोंदणीकृत पद्धतीने चार महिन्यांपूर्वी लग्न केले.

अनिताच्या मृत्यस पती नीलेशला जबाबदार धरून अनिताच्या कुटुंबीयांनी नीलेशच्या घरासमोर निषेध सुरू झाला आहे. तिच्या कुटुंबाने आरोप केला आहे की नीलेशने अनिताची हत्या केली आहे.

बेळगाव ग्रामीण पोलिसांनी शोध घेतला आहे आणि पती नीलेश याला ताब्यात घेतले आहे.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *