बेळगाव : कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना बेंगलोर यांनी, आज बुधवारी बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आणि स्पर्धेवर बहिष्कार घातलेल्या २० क्लबच्या सदस्यांची बैठक बोलावली होती. कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेच्या सभागृहात झालेल्या तातडीच्या बैठकीत अध्यक्षांनी मानद अध्यक्ष आ. हरीश एन. ए. उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभीच अध्यक्ष हरीश एन. ए. बेळगाव आलेल्या …
Read More »आरसीबीचा विजयोत्सव साजरा करताना चाहत्याचा हृदयविकाराने मृत्यू
बेळगाव : आरसीबीने आयपीएल ट्रॉफी जिंकल्याच्या आनंदात सुरू असलेल्या जल्लोषादरम्यान एका चाहत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बेळगाव जिल्ह्यातील मूडलगी तालुक्यातील अवरदी गावात घडली आहे. मूडलगी तालुक्यातील अवरदी गावातील मंजुनाथ कुंभार असे मृत तरुणाचे नाव आहे. आरसीबीच्या विजयाच्या जल्लोषावेळी त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. …
Read More »केएसआरटीसी बस-ट्रक धडकेत महिलेचा मृत्यू
गोकाक : गोकाक तालुक्यातील बेनचिनमरडी गावाजवळ केएसआरटीसी बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून १५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. गोकाक तालुक्यातील बेनचिनमरडी गावाजवळ केएसआरटीसी बस आणि ट्रकची धडक होऊन भीषण अपघात झाला. ट्रकच्या धडकेमुळे बस पलटी झाली. पलटी झालेल्या बसखाली अडकून येल्लव्वा …
Read More »आशा पत्रावळी “नारीशक्ती -२०२५” पुरस्काराने सन्मानित
बेळगाव : राजेश चौगुले फाउंडेशन, अंकलखोप या सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे बेळगावच्या आशा पत्रावळी यांना नारीशक्ती – २०२५ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्त्रीच्या जिद्द, संघर्ष, प्रेम, त्याग व निस्वार्थ सेवेचा, तेजस्वी वाटचालीचा गौरव करणारा हा सोहळा, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यासाठी अंकलखोप येथे आयोजित करण्यात आला …
Read More »वैश्यवाणी समाजातील गुणवंतांचा गौरव
बेळगाव : नार्वेकर वैश्य समाज शिक्षण फंड संस्थेतर्फे वैश्यवाणी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव तसेच शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम समादेवी मंगल कार्यालय येथे नुकताच पार पडला. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष रोहन जुवळी, सचिव विक्रांत कुदळे, विश्वस्त मोतीचंद दोरकाडी, महिला मंडळ अध्यक्षा अंजली किनारी, समादेवी संस्थानचे उपाध्यक्ष सुयश पानारी, सचिव अमित कुडतूरकर, …
Read More »चन्नम्मा सर्कलजवळ आरसीबी चाहत्यांना पांगवण्यासाठी किरकोळ लाठीचार्ज
बेळगाव : आरसीबी संघाने आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर आनंद साजरा करण्यासाठी चन्नम्मा सर्कल जवळ जमलेल्या हजारो आरसीबी चाहते जमले होते त्यांना पांगवण्यासाठी किरकोळ लाठीचार्ज करण्यात आला. चन्नम्मा सर्कलजवळ लावलेल्या मोठ्या स्क्रीनवर सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते. आरसीबी जिंकताच, लोकांचा जल्लोष आणि नाच मर्यादेपलीकडे गेला. हे बराच वेळ चालू राहिल्याने …
Read More »जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्या बढतीची शक्यता
बेळगाव : कर्नाटक राज्य पोलिस विभागाने केंद्र सरकारकडे एकाच वेळी २० उपमहानिरीक्षक (डीआयजी) पदे व एक डीजीपी पद नव्याने निर्माण करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. यामुळे सेवेंत वरिष्ठतेनुसार अनेक एसपी अधिकाऱ्यांना एकाचवेळी बढती मिळण्याची शक्यता आहे. या प्रस्तावात जिल्हा पोलिसप्रमुख भीमाशंकर गुळेद यांचे नाव आहे. तसेच यापूर्वी बेळगावला पोलिसप्रमुख …
Read More »असोसिएशन ऑफ फिजिकली हॅंडीकॅपड संस्थेमध्ये आर्थिक गैरव्यवहार; ऑडिट होईपर्यंत हंगामी कार्यकारिणी जाहीर
बेळगाव : शहापूर आळवण गल्ली येथील असोसिएशन ऑफ फिजिकली हॅंडीकॅपड या संस्थेमध्ये जमिनीचा गैरव्यवहार तसेच आर्थिक भ्रष्टाचार होत असल्याने संघटनेचे सभासद रस्त्यावर उतरले आहेत. असोसिएशन ऑफ फिजिकल हॅंडीकॅपड या संस्थेचे पदाधिकारी व सभासदानी जमिनीच्या गैरव्यवहारासंदर्भात माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. मात्र या निवेदनाचा फारसा परिणाम न झाल्याने संस्थेच्या काही …
Read More »संजीवीनी विद्याआधाराने दिला विद्यार्थिनीला शैक्षणिक आधार अश्विनी पुजारीला घेतले दत्तक
बेळगाव : वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांतून सतत मदतीचा हात पुढे करणाऱ्या संजीवीनी फौंडेशनच्या वतीने संजीवीनी विद्याआधारच्या माध्यमातून निपाणी तालुक्यातील ढोणेवाडी या गावची विद्यार्थिनी अश्विनी पुजारी हिला तिच्या शैक्षणिक वाटचालीसाठी दत्तक घेण्यात आले आहे. अश्विनी पुजारी हिने दहावीच्या परीक्षेत ६२० गुण घेतले असून पुढे आय आय टी मधून अभियंता होण्याचे स्वप्न …
Read More »“आमचे पाणी आमचा हक्क” घोषणा देत पर्यावरणवाद्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा
बेळगाव : “आमचे पाणी आमचा हक्क” घोषणा देत पर्यावरणवाद्यांचा भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. म्हादई नदीचे पाणी वळविण्याचा सरकारचा घाट थांबवावा या प्रमुख मागणीसह सर्वच नद्यांचे रक्षण व्हावे, अशी मागणी भव्य मोर्चाद्वारे पर्यावरणवाद्यांकडून करण्यात आली. विशेष म्हणजे पाणी हक्काच्या मागणीसाठी उद्योजक, शिक्षणतज्ञ, प्राध्यापक, व्यावसायिक यांच्यासह ग्रामीण भागातील असंख्य …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta