Sunday , September 20 2026
Breaking News

केएसआरटीसी बस-ट्रक धडकेत महिलेचा मृत्यू

Spread the love

 

गोकाक : गोकाक तालुक्यातील बेनचिनमरडी गावाजवळ केएसआरटीसी बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून १५ हून अधिक जण जखमी झाले आहेत.

गोकाक तालुक्यातील बेनचिनमरडी गावाजवळ केएसआरटीसी बस आणि ट्रकची धडक होऊन भीषण अपघात झाला. ट्रकच्या धडकेमुळे बस पलटी झाली. पलटी झालेल्या बसखाली अडकून येल्लव्वा बीरनगड्डी (७०, रा. कोळवी गाव) या महिलेचा मृत्यू झाला. पलटी झालेल्या बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना स्थानिकांनी काचा फोडून बाहेर काढले. जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच गोकाक ग्रामीण पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाहणी केली. गोकाक ग्रामीण पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *