Wednesday , December 17 2025
Breaking News

बेळगाव

बस रस्त्यालगतच्या शेतात घुसली : ६० प्रवासी सुखरूप

  बेळगाव : रस्त्यालगतच्या शेतात सरकारी बस घुसली. पण चालकाच्या समजूतदारपणामुळे ६० प्रवाशांचा जीव वाचला. सुमारे ६० प्रवाशांना गोकाक येथून सावळगी गावाकडे घेऊन जात असताना हा अपघात झाला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून त्याला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची घटना गोकाक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

Read More »

राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचे निधन

  लखनौ : राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ८५ व्या वर्षी लखनऊ पीजीआय येथे अखेरचा श्वास घेतला. ३ फेब्रुवारी रोजी मेंदूत रक्तस्त्राव झाल्यानंतर आचार्य सत्येंद्र दास यांना गंभीर अवस्थेत लखनौ पीजीआयच्या न्यूरोलॉजी वॉर्डच्या एचडीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. आचार्य सत्येंद्र दास यांचे आज …

Read More »

मराठा युवक संघातर्फे शरीरसौष्ठव स्पर्धा २५ मार्च रोजी

  बेळगाव : बेळगाव येथील सुप्रसिद्ध असलेल्या मराठा युवक संघाच्यावतीने मंगळवार दि. २५ रोजी ‘बेळगाव श्री’ अशी प्रतिष्ठेची शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती अध्यक्ष बाळासाहेब काकतकर यांनी दिली. मराठा युवक संघाची बैठक आज मंगळवारी मराठा मंदिर येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीत इंडियन बॉडी बिल्डिंग फेडरेशन …

Read More »

श्री समादेवी उत्सवानिमित्त नवचंडीका होम; महाप्रसाद उत्साहात

  बेळगाव : वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना आणि वैश्यवाणी महिला मंडळ आणि श्री समादेवी संस्थान समादेवी गल्ली बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सव सोहळालातील शेवटच्या दिवशी मंगळवारी सकाळी नव चंडिकाहोम आणि महाप्रसाद उत्साहात पार पडला. सकाळी श्री. समादेवी मूर्तीला महाअभिषेक केल्यानंतर संदीप कडोलकर, सौ. स्मिता कडोलकर, …

Read More »

बेळगावात शिवकालीन शस्त्रे आणि भारताच्या पहिल्या नौदलंच्या वस्तूंचे प्रदर्शन

  बेळगाव : बेळगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शस्त्रे आणि भारतातील पहिल्या नौदलाच्या उपकरणांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. रोटरी क्लब ऑफ बेळगाव साउथतर्फे बेळगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शस्त्रास्त्रांचे आणि भारताच्या पहिल्या नौदलातील वस्तूंचे प्रदर्शन आयोजित केले आहे. आज शहरातील गोवावेस सर्कल येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही …

Read More »

हिंदवाडी श्री महालक्ष्मी मंदिराचा वार्षिकोत्सव, विविध धार्मिक कार्यक्रम महाप्रसादासह भक्तिभावात

  बेळगाव : बेळगाव परिसरातील हिंदवाडी येथील श्री महालक्ष्मी मंदिराच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाला आज मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. मंदिराच्या वार्षिकोत्सवा निमित्ताने आज विविध धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसाद सोहळा आयोजित करण्यात आला होता. हिंदवाडी येथील श्री महालक्ष्मी मंदिराचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. हे मंदिर हिंदवाडी महिला मंडळाच्या महिला भगिनींनी …

Read More »

लवकरच सीमाभागात उपमुख्यमंत्री सहायता निधीद्वारे गरजू रुग्णांना मदत चालू होणार

  बेळगाव : मुंबई येथे उपमुख्यमंत्री माननीय श्री. एकनाथजी शिंदे व श्री. मंगेश चिवटे यांच भेट घेऊन सीमा भागातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी संबंधित चर्चा करण्यात आली. या भेटीदरम्यान श्री. चिवटे यांनी येणाऱ्या दिवसात लवकरात लवकर उपमुख्यमंत्री सहायता निधी कक्ष सुरुवात होईल व महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत मदत सुद्धा चालू …

Read More »

श्री सरस्वती वाचनालयातर्फे आयोजित ‘स्वरांजली’ मैफलीने रसिक श्रोते मंत्रमुग्ध

  बेळगाव : एकाहून एक प्रस्तुत सदाबहार, हृदयस्पर्शी, सुश्राव्य, सुमधूर, सुरेल भावगीते, सोबतीला वाद्यांची अप्रतिम साथसंगत, ध्वनिसंयोजन आणि वेळोवेळी मनस्वी उत्स्फूर्त दाद देणारे रसिक श्रोते यामुळे रविवारची रम्य संध्याकाळ स्वरांजलीच्या संगीताने न्हाऊन गेली. निमित्त होते श्री सरस्वती वाचनालयाच्या 150 व्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त वाचनालयाच्या संगीत कला मंच आयोजित गायक विनायक …

Read More »

लहान वयापासून स्पर्धेत सहभागी व्हा : शंकर चौगले

  कावळेवाडी : पुस्तक वाचल्याने नकळत आपलं आयुष्य घडत जाते. कथा सादर करताना, स्वतः अभिनय‌ करणं आवश्यक आहे. शिक्षक व पालकांनी मार्गदर्शन करावे. शब्दफेक चढउतार, भाव- भावना मनात रुजलेली हवी. ऐकणाराच्या हृदयात भिडायला हवं विद्यार्थीदशेत धिटपणे बोलण्याची बिज‌ पेरायला हवे साने गुरुजी होऊन जिवंतपणा आणायला हवा. शिवाजी महाराज बनून इतिहास …

Read More »

येळ्ळूर येथील कलमेश्वर गल्ली कॉर्नर जवळील धोकादायक टीसी अन्यत्र हटवण्याची मागणी

  बेळगाव : येळ्ळूर येथील युनियन बँकेसमोरील शिवसेना चौकात कलमेश्वर गल्ली कॉर्नर वर असलेला धोकादायक ट्रान्सफॉर्मर तात्काळ अन्यत्र सुरक्षित जागी हटविण्यात यावा, अशी मागणी श्रीराम सेना हिंदुस्थान, येळ्ळूर शाखा आणि स्थानिक नागरिकांनी एका निवेदनाद्वारे हेस्कॉमच्या सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे. श्री राम सेना हिंदुस्थान संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत दादा कोंडूसकर …

Read More »