बेळगाव : गेल्या एप्रिलमध्ये संतिवस्तावाड गावात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. लक्ष्मण यल्लाप्पा उचवाडे (30), मुथप्पा भरमा उचवाडे (26), लक्ष्मण नागप्पा नाईक (30) आणि शिवराज यल्लाप्पा गुदली (29) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत, असे पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांनी सांगितले.
संतिबस्तवाड येथील ईदगाहचे चार मिनार आणि घुमट पाडण्यात आल्याने मुस्लिम समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल १३ एप्रिल रोजी येथील गौसाबा तहसीलदार यांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून चार जणांना अटक करण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले. मात्र अद्याप कुराण जाळल्याप्रकरणी कोणालाही अटक केली नसून अजून सखोल तपास करण्याची गरजही व्यक्त केली. पत्रकार परिषदेला उत्तरचे आमदार असिफ सेठ देखील उपस्थित होते.