बेळगाव : अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यांच्यातर्फे सुरू झालेली पालखी परिक्रमा बुधवारी सायंकाळी पाच वाजता स्वामी समर्थ आराधना केंद्र त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स, महाद्वार रोड येथे आल्यावर भव्य स्वागत करण्यात आले याप्रसंगी पालखीचे स्वागत उपमहापौर आनंद चव्हाण, नगरसेवक नितीन जाधव, नगरसेविका नेत्रावती भागवत, पायोनियर बँकेचे चेअरमन प्रदीप अष्टेकर …
Read More »काॅम्रेड कृष्णा मेणसे यांच्या स्मरणार्थ उद्या सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन
बेळगांव : ज्येष्ठ नेते काॅम्रेड कृष्णा मेणसे यांचे दि. १३ जानेवारी रोजी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गुरुवार दि. १६ जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. तुकाराम सांस्कृतिक भवन (ओरिएंटल हायस्कूल) रेल्वे ओव्हर ब्रिज, खानापूर रोड बेळगांव येथे ही शोकसभा होणार आहे. सर्वांनी …
Read More »हुतात्मा दिन गांभीर्याने पाळावा; महिला आघाडीच्या बैठकीत आवाहन
बेळगाव : महिला आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक महिला आघाडीच्या कार्यालयात आज पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी उपमहापौर रेणू किल्लेकर या होत्या. 17 जानेवारी रोजी आपले सर्व बंद ठेवून हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यात यावा व सर्व महिलांनी हुतात्मा चौक येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी सकाळी 8.30 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन …
Read More »मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा अपघात “हिट अँड रन प्रकरण”
बेळगाव : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या वाहनाचा अपघात हिट अँड रन प्रकरण आहे. कँटेर वाहनाच्या चालकाने हिट अँड रन करून ते पळून गेले असून, त्याचा शोध घेण्यासाठी दोन पथकांची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती बेळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक एसपी डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली. कँटर वाहनासमोर आलेल्या कुत्र्यांना …
Read More »बेळगाव तालुका युवा आघाडीतर्फे सैन्यदलात निवड झालेल्या युवक – युवतींचा सत्कार
बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा आघाडीतर्फे आयोजित सैन्यात निवड झालेल्या बेळगाव तालुक्यातील युवक – युवतींचा सत्कार समारंभ आज बुधवारी दुपारी मोठ्या दिमाखात पार पडला. रेल्वे ओव्हर ब्रिज येथील मराठा मंदिर सभागृहामध्ये तालुका म. ए. युवा आघाडीचे अध्यक्ष राजू किणयेकर यांच्या अध्यक्षतेखाली या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले …
Read More »दोन मुलींवर सामूहिक अत्याचार करून ब्लॅकमेल करणाऱ्या तिघांना अटक
बेळगाव : रायबाग तालुक्यातील सवसुद्दी गावाजवळील डोंगराळ भागात दोन मुलींवर सामूहिक अत्याचार झाला असून तिघांनी मिळून अत्याचार केला आहे. या अमानुष घटनेची माहिती पोलिसांना मिळताच अभिषेक, आदिल जमादार आणि चालक कौतुक बडिगेर या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाबाबत बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद म्हणाले, आरोपी …
Read More »महिला आघाडीतर्फे राजमाता जिजाऊ जयंती साजरी
बेळगाव : महिला आघाडीतर्फे आज राजमाता जिजाऊ जयंती महिला आघाडीच्या कार्यालयात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला आघाडीच्या अध्यक्षा माजी उपमहापौर सौ. रेणू किल्लेकर होत्या. कार्यक्रमाच्या सुरवातीला अध्यक्षा रेणू किल्लेकर यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात रेणू किल्लेकर यांनी जिजाऊंच्या कार्याचा …
Read More »शहर म. ए. समितीची उद्या बैठक
बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समिती पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक यांची बैठक बुधवार दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी पाच वाजता रंगुबाई भोसले पॅलेस रामलिंग खिंड गल्ली बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. या बैठकीस पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीक यांनी उपस्थित रहावे, अशी विनंती शहर महाराष्ट्र एकीकरण समिती …
Read More »शिवाजी विद्यालय येळ्ळूर येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अभिप्रेरणा कार्यक्रम संपन्न
येळ्ळूर : येथील श्री शिवाजी विद्यालयामध्ये जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालय बेळगाव दक्षिण व गटशिक्षणाधिकारी कार्यालय बेळगाव ग्रामीण यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी विद्यार्थ्याकरिता प्रेरणा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वभारत सेवा समितीचे अध्यक्ष विजय नंदीहळ्ळी होते. प्रेरणा कार्यशाळेत परिसरातील विविध शाळांच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. …
Read More »युवा आघाडीतर्फे उद्या सैन्यात भरती झालेल्या जवांनाचा सत्कार
बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा आघाडीच्या वतीने उद्या बुधवार दिनांक १५ रोजी दुपारी ठीक २.०० वाजता मराठा मंदिर मंगल कार्यालय (रेल्वे ओव्हर ब्रिज) येथे भारतीय सैन्य दलामध्ये नव्याने रुजू झालेल्या तरुण, तरुणींचा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. तरी या सत्कार समारंभाला बेळगाव …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta