Tuesday , July 28 2026
Breaking News

बेळगाव

जातनिहाय सर्वेक्षणाबाबत सकल मराठा समाजाच्या वतीने वडगाव भागात जनजागृती!

  बेळगाव : कर्नाटक सरकारने प्रस्तावित केलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण 2025 संबंधित सर्वेक्षणात मराठा समाजाने कशा पद्धतीने नोंद करावी या संदर्भात मार्गदर्शन व जनजागृती करण्यासाठी सकल मराठा समाज वडगाव विभागाची बैठक गणेश मंदिर संभाजीनगर वडगाव येथे पार पडली. बैठकीला मराठा समाजाचे नेते मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते. जयराज हलगेकर यांनी …

Read More »

खून प्रकरणी दोघांना जन्मठेप आणि एक लाख रुपयांचा दंड

    बेळगाव : काही वर्षांपूर्वी बेळगावात एका पार्टीदरम्यान डीजेचा आवाज कमी करण्याच्या मुद्द्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाचा खून झाला होता. याप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यांतर्गत दोघांना द्वितीय जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून, प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. शशिकुमार रामाप्पा उद्दाप्पगोळ (वय २१, रा. हिडकल डॅम, हुक्केरी) …

Read More »

मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने “फार्मासिस्ट डे” उत्साहात साजरा

  बेळगाव : येथील मराठा मंडळ फार्मासी कॉलेजमध्ये आज “फार्मासिस्ट डे” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कॉलेजचे माजी विद्यार्थी मा. दत्ता तरळे उपस्थित होते. या प्रसंगी त्यांच्या हस्ते प्राध्यापकांना स्कील इंडिया सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले. उपस्थित विद्यार्थ्यांना कौशल्यविकासाचे महत्त्व पटवून देत कॉलेजचे प्राचार्य डॉ. विष्णू …

Read More »

जायंट्स सोशल वेल्फेअर असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

  बेळगाव : जायंट्स सोशल वेल्फेअर असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच कपिलेश्वर रोड येथील जायंट्स भवन येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी शिवराज पाटील होते तर व्यासपीठावर उपाध्यक्ष संजय पाटील व ज्येष्ठ कार्यकारिणी सदस्य मोहन कारेकर उपस्थित होते. प्रारंभी शिवराज पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी माजी खजिनदार …

Read More »

उत्तर बेळगाव इंडस्ट्रीज असोसिएशनच्या अध्यक्षपदी एन. जे. शिवकुमार यांची तिसऱ्यांदा निवड

  बेळगाव : नंदगुडी ऑइल्स एलएलपीचे व्यवस्थापकीय संचालक आणि नामवंत उद्योगपती एन. जे. शिवकुमार यांची उत्तर बेळगाव इंडस्ट्रीज असोसिएशन (NBIA)च्या अध्यक्षपदी तिसऱ्यांदा एकमताने निवड करण्यात आली. बेळगाव क्लब येथे झालेल्या असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड झाली. असोसिएशनचे संस्थापक सदस्य असलेले शिवकुमार यांची बिनविरोध निवड होऊन उद्योग क्षेत्रातील त्यांच्या नेतृत्वावरील …

Read More »

पंडित दीनदयाळ उपाध्याय : एकात्म मानवतावादाचे प्रवर्तक

  भारतीय राजकारणात, समाजजीवनात व विचारविश्वात पंडित दीनदयाळ उपाध्याय हे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व मानले जाते. अल्पायुष्यात त्यांनी जे विचार मांडले ते आजही देशाच्या राजकीय व सामाजिक प्रवाहाला दिशा देत आहेत. जन्म व बालपण 25 सप्टेंबर 1916 रोजी उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील नगला चंद्रभान या गावी त्यांचा जन्म झाला. लहानपणीच आई-वडिलांचे …

Read More »

नवहिंद को-ऑप क्रेडिट सोसायटी (आंतरराज्य) लि, येळ्ळूरची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

  सभासदांना 12% लाभांश, चेअरमन श्री. प्रकाश अष्टेकर यांची माहिती येळ्ळूर : दि. 22/9/2025 नवहिंद क्रीडा केंद्र येळ्ळूर संचलित नवहिंद को-ऑप क्रेडिट सोसायटीची 33 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नवहिंद भवन येळ्ळूर येथे संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन श्री. प्रकाश अष्टेकर होते. प्रारंभी नवहिंदचे क्रीडा केंद्राचे सेक्रेटरी श्री. आनंद पाटील यांनी …

Read More »

दुर्गामाता महिला मंडळांमध्ये जातनिहाय जनगणनेबाबत जनजागृती

  समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांचा पुढाकार बेळगाव : कर्नाटक सरकारतर्फे २२ सप्टेंबरपासून राज्यात जातनिहाय जनगणना सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील नागरिकांनी जनगणना फॉर्म भरताना धर्म – हिंदू, जात – मराठा, उपजात – कुणबी आणि मातृभाषा – मराठी असा तपशील नोंदवावा, याबाबत सकल मराठा समाजातर्फे जनजागृती मोहीम राबवली …

Read More »

विविध कार्यक्रमांनी मराठा सेवा संघाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

  बेळगाव : मराठा सेवा संघ बेळगांव जिल्ह्याच्या 7 व्या आणि मराठा सेवा संघ भारतच्या 35 व्या वर्धापन दिनानिमित्त गडहिंग्लजचे प्रा. पी. डी. पाटील यांचे व्याख्यान, भव्य वक्तृत्व स्पर्धा आणि मराठा समाज स्नेहमिलन मेळावा असा संयुक्त कार्यक्रम येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) येथे उत्साहात पार पडला. शिवाजी विद्यालय येळ्ळूर बेळगांव येथे …

Read More »

विद्याभारती राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेला दुहेरी मुकुट

  बेळगाव : अनगोळ, बेळगाव येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या प्राथमिक व माध्यमिक मुलींच्या फुटबॉल संघाने कुरुक्षेत्र हरियाणा येथे झालेल्या विद्याभारती अखिल भारतीय राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेतील प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या विजेतेपदासह दुहेरी मुकुट संपादन केला आहे. त्यामुळे या संघांची रांची झारखंड येथे होणाऱ्या एसजीएफआय राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली …

Read More »