Tuesday , July 28 2026
Breaking News

बेळगाव

अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला

  बेळगाव : कृष्णा उपखोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात होणारा जोरदार पाऊस, कृष्णा नदी (कल्लोळ बॅरेज) आणि घटप्रभा नदी (लोळासूर पूल) मधून होणारा विसर्ग आणि स्थानिक पाणलोट क्षेत्राचा वाटा लक्षात घेता, अलमट्टी धरणात येणारा पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. याची खबरदारी घेऊ आज रविवारी २८.०९.२०२५ रोजी दुपारी ३:०० वाजता नदीकडे …

Read More »

सरस्वती नगर पाईपलाईन रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य!

  बेळगाव : बेनकनहळ्ळी ग्रामपंचायत क्षेत्रातील सरस्वती नगर पाईपलाईन रस्त्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक, कचरा टाकला जात आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्या शेजारी अनधिकृत पावभाजी, ऑम्लेट पावच्या गाड्या लागलेल्या असतात. या ठिकाणी खवय्यांची गर्दी नेहमीच होत असते. रस्त्याच्या कडेला या गाड्यांवरील टाकाऊ पदार्थ, मोठ्या प्रमाणात घरगुती …

Read More »

चैतन्यमय वातावरणात मराठी संस्कृतीचे दर्शन!

  दुर्गामाता दौडीच्या सातव्या दिवशी आनंदवाडीत पारंपरिक वेशभूषेतील बालचमू ठरले आकर्षण बेळगाव : शहापूर येथे श्री दुर्गामाता दौडीचा सातवा दिवस देवी कालरात्रीच्या पूजेसह उत्साहात साजरा झाला. विशेषतः आनंदवाडी परिसरातील पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या चिमुकल्यांनी उपस्थितांचे मन वेधून घेतले. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे सातव्या दिवसाची सुरुवात श्री अंबाबाई देवस्थान (नाथ पै चौक, …

Read More »

बाल गणेश उत्सव मंडळ, समादेवी संस्थान नार्वेकर गल्ली शहापूरच्यावतीने नवचंडी होम व महाप्रसादाचे आयोजन

  बेळगाव : मंगळवार दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी समादेवी मंदिर समोर नार्वेकर गल्ली शहापूर येथे भव्य नवचंडी होम व महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. सर्व भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन बाल गणेश उत्सव मंडळ व समादेवी संस्थाने केले आहे. बाल गणेश उत्सव मंडळ नार्वेकर गल्ली शहापूर, समादेवी संस्थान नार्वेकर …

Read More »

युवा समितीच्या वतीने ४ ऑक्टोबर रोजी “वक्तृत्व स्पर्धेचे” आयोजन….

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे औचित्य साधून “वक्तृत्व स्पर्धेचे” आयोजन शनिवार दिनांक ४ ऑक्टोबर २०२५ रोजी लोकमान्य रंगमंदिर कोनवाळ गल्ली बेळगाव येथे करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमधील व्यासपीठ धैर्य वाढावे, त्यांचा आत्मविश्वास वाढावा, वक्तृत्व कला जोपासावी आणि आपले विचार श्रोत्यांसमोर प्रभावीपणे मांडता यावेत यासाठी …

Read More »

सरपंच चषक फौंडेशन, मोदगे, ता. हुक्केरी यांच्या वतीने भव्य बैलगाडा पळविण्याची जंगी शर्यत 4 व 5 ऑक्टोबरला

  दड्डी : सरपंच चषक फौंडेशन, मोदगे, ता. हुक्केरी, जि. बेळगाव येथे भव्य बैलगाडा पळविण्याची जंगी शर्यत शनिवार दि. २ सप्टेंबर २०२५ ते रविवार २८ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित केली होती. पावसातील व्यत्ययामुळे (जसे की सततचा पाऊस) रद्द करून पुढे ढकलण्यात आलेली आहे. हीच शर्यत श्री. बाळूमामा जन्मोत्सव निमित्त दिनांक …

Read More »

जायंट्स सोशल वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यक्षपदी शिवकुमार हिरेमठ तर सचिव म्हणून मदन बामणे यांची निवड

  बेळगाव : जायंट्स सोशल वेल्फेअर असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच कपिलेश्वर रोड येथील जायंट्स भवन येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी २०२५-२६ सालासाठी अध्यक्षपदी शिवकुमार हिरेमठ तर सचिव म्हणून मदन बामणे यांची निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष म्हणून उमेश पाटील तर खजिनदार म्हणून संजय पाटील यांची निवड झाली आहे. …

Read More »

हिंदवाडी महिला मंडळाच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात

  बेळगाव : हिंदवाडी महिला मंडळातर्फे हिंदवाडी येथील श्री महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे. सोमवार दि. 22 सप्टेंबरपासून सुरू झालेला नवरात्रोत्सव गुरुवार दि. 2 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. यानिमित्त दररोज सकाळी आठ वाजता अभिषेक, पूजा, आरती कुमारीका पूजन असे धार्मिक कार्यक्रम नित्यनेमाने होत आहेत. तसेच दररोज सायंकाळी पाच वाजता …

Read More »

बेळगाव जिल्ह्यात संततधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतीत मोठे नुकसान झाले आहे. नदीच्या पाण्यामुळे शेती पूर्णपणे जलमय झाली असून, पिके वाहून गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. सौंदत्ती तालुक्यातील एका शेतकऱ्याची ८ एकर जमीन पूर्णपणे पाण्याखाली गेली असून, शासनाकडून कोणतीही मदत न मिळाल्याने त्यांनी तीव्र असंतोष …

Read More »

पोलिसाचा प्रामाणिकपणा; रस्त्यात पडलेली रक्कम परत!

  बेळगाव : शुक्रवारी रात्री बेळगाव शहरात मोटरसायकलवरून जाणाऱ्या तरुणाच्या खिशातून तब्बल दीड लाख रुपये रस्त्यात पडले होते. ती रक्कम बेळगाव उत्तर रहदारी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी वाय. वाय. तळेवाड यांच्या निदर्शनास येताच त्यांनी ती रक्कम परत करून प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, वाय. वाय. तळेवाड …

Read More »