Tuesday , July 28 2026
Breaking News

बेळगाव

श्री मळेकरणी सौहार्द सहकारी संघ नि, उचगाव सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

  बेळगाव : श्री मळेकरणी सौहार्द सहकारी संघ नि, उचगाव या सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा शंकर – पार्वती मंगल कार्यालयात सोसायटीचे संस्थापक- चेअरमन श्रीमान जवाहरराव शंकरराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. श्री मळेकरणी देवीच्या फोटोचे पूजन संचालक श्री. मारूती सावंत यांनी केले. दीपप्रज्वलन संचालक श्री. सुरेश राजूकर, चंद्रकांत …

Read More »

मलप्रभा धरण काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

  बेळगाव : मलप्रभा धरणाच्या वरच्या भागात जोरदार पाऊस पडत असल्याने, धरणाची पातळी २०७९.५० फूट आणि पूर्ण भरली आहे. मलप्रभा धरणात सध्या १५०० क्युसेकची आवक आहे. धरणाची पातळी योग्य राखण्यासाठी आज शनिवार दि. २७.०९.२०२५ रोजी सकाळी ८.०० वाजेपासून मलप्रभा नदीला पाणी ३०० क्युसेकवरून १५०० क्युसेकपर्यंत वाढवून खबरदारीचा उपाय म्हणून हळूहळू …

Read More »

न्यायालय आवारात आपत्कालीन वैद्यकीय पथकाची नियुक्ती करण्याची मागणी

  बेळगाव : जिल्हा न्यायालय आवारात आपत्कालीन वैद्यकीय पथकाची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी ऍड. शामसुंदर पत्तार आणि ऍड. मारुती कामाण्णाचे यांनी बार असोसिएशन बेळगाव यांच्याकडे केली आहे. जिल्हा न्यायालय आवारात वकील, आरोपी, पोलीस, साक्षीदार, अशिलांचा वावर असतो. नेहमीच हा परिसर गजबजलेला असतो. न्यायालय आवारात एखाद्याच्या प्रकृतीत बिघाड झाल्याच्या घटना …

Read More »

श्री मलप्रभा साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस दारू विक्रीवर बंदी

  बेळगाव : श्री मलप्रभा सहकारी साखर कारखाना नियमित एम. के. हुबळीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या शनिवार दि. 27 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून सोमवार दि. 29 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत कित्तूर तालुक्यातील एम. के. हुबळी, होस काद्रोळी आणि खानापूर तालुक्यातील इटगी गावाच्या व्याप्तीतील दारू दुकाने व …

Read More »

येळ्ळूर परिसरात जातीय जनगणतीला सुरुवात; सतीश पाटील यांनी दिली सकल मराठा समाजाच्या भूमिकेबद्दल माहिती

  बेळगाव : कर्नाटक सरकारच्या वतीने 22 सप्टेंबर पासून 10 ऑक्टोबर दरम्यान जातीय शैक्षणिक सामाजिक जनगणना सुरु करण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षकांना या जनगणतीची जबाबदारी देण्यात आली आहे. बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर येथेही जनगणती सुरू करण्यात आली. माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी गणतीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना सकल मराठा समाजाच्या …

Read More »

अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्येप्रकणी प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील रायबाग येथील कुडची पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला बेळगाव जिल्हा पॉक्सो न्यायालयाने जन्मठेपेसह फाशीची शिक्षा सुनावली आहे. सहा वर्षांच्या सुनावणीनंतर हा महत्त्वपूर्ण न्याय मिळाला आहे. १५ ऑक्टोबर २०१९ रोजी रायबाग पोलिस ठाण्यात ८ वर्षीय मृत बालिका बेपत्ता असल्याची …

Read More »

अनिल गुरुनाथ अंबरोळे यांची आयबीबीएफच्या सदस्यपदी नियुक्ती

  बेळगाव : मागील 34 वर्षांपासून शरीरसौष्ठव पट्टू, शरीरसौष्ठव राष्ट्रीय पंच व सामान्य कार्यकर्ता म्हणून कार्यरत असलेले अनिल गुरुनाथ अंबरोळे यांना नुकतेच आयबीबीएफचे सचिव सुरेश कदम यांनी आयबीबीएफचे सदस्यपद प्रमाणपत्र सुपूर्द केले. अनिल अंबरोळे यांना हे सदस्यपद मिळाले ही एक बेळगांवच्या शरीरसौष्ठव क्षेत्राला मिळालेली नवसंजीवनी आहे. 1989 ते 90 या …

Read More »

देसूर काँग्रेस कमिटीकडून नवनिर्वाचित काडा अध्यक्ष युवराज कदम यांचा सन्मान!

  बेळगाव : कर्नाटक राज्याच्या मंत्री महोदया सौ. लक्ष्मीताई हेब्बाळकर यांचे जवळचे विश्वासू श्री. युवराज कदम यांचा देसूर काँग्रेस कमिटीकडून सत्कार करण्यात आला. यावेळी नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले ह.भ.प. सुभाष परीट (विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ अध्यक्ष), भरत लक्ष्मण पाटील (सार्वजनिक गणेशोत्सव पाटील गल्ली अध्यक्ष), सुनील पाटील (माजी ग्राम पंचायत …

Read More »

अनिसच्या चार कार्यकर्त्यांना ग्रंथमित्र पुरस्काराने सन्मानित

  बेळगाव : महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या, बेळगाव शाखेच्या चार कार्यकर्त्यांना ग्रंथमित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये बेळगाव शाखेचे सचिन जोतिबा अगसीमनी, एस.जी. पाटील, सूर्याजी पाटील आणि शिवाजी हसनेकर या चार कार्यकर्त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. लातूर येथील ओम लॉन्स मंगल कार्यालयाच्या सभागृहात महाराष्ट्र अनिसच्या राज्य कार्यकारिणीची सभा …

Read More »

‘जय किसान’ भाजी मार्केट असोसिएशनची स्थगितीची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली

  बेळगाव : जय किसान भाजी मार्केटचा परवाना रद्द करण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निर्णयावर स्थगिती मिळावी, अशी मागणी जय किसान भाजी मार्केट असोसिएशनने न्यायालयाकडे केली होती, ती न्यायालयाने फेटाळली. सरकारी एपीएमसीच्या वतीने वरिष्ठ वकील अनंत मंडगी, शोभा एच., आणि नितीन बोलबंदी यांनी जोरदार युक्तिवाद केला. सुनावणीदरम्यान सरकारी एपीएमसीने कोल्ड स्टोरेजचे …

Read More »