बेळगाव : मकर संक्रांती दिवशी मुलीला भेटण्यासाठी आलेल्या सासूची जावयाने निर्घृण हत्या केल्याची घटना खासबाग येथील रयत गल्लीत घडली. ४३ वर्षीय रेणुका पदमुखी असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार, शुभम आणि रेणुका यांचा विवाह सात महिन्यांपूर्वी झाला होता. आरोपीची पत्नी तीन दिवसांपासून आजारी होती. मात्र, …
Read More »उद्या श्री स्वामी समर्थ आराधना केंद्रात पालखीनिमित्त विविध कार्यक्रम
बेळगाव : अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यांच्यातर्फे सुरू झालेली पालखी परिक्रमा महाराष्ट्राच्या विविध भागात फिरून दिनांक 13 रोजी दाखल झाले असून विविध ठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले. महाद्वार रोडला विशेष कार्यक्रम महाद्वार रोड येथील स्वामी समर्थ आराधना केंद्रात दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले …
Read More »मराठी भाषकांवरील अन्याय दूर व्हावा यासाठी पंतप्रधान मोदींशी चर्चा करावी
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे म. ए. समितीची मागणी बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सीमाप्रश्नाबाबत माहिती द्यावी आणि मराठी भाषकांवरील अन्याय दूर व्हावा तसेच सीमाप्रश्नाची लवकर सोडवणूक व्हावी यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी बेळगाव व खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे केली आहे. खानापूर …
Read More »मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या वाहनाला अपघात
बेळगाव : कर्नाटकच्या महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या कारला भीषण अपघात झाला आहे. लक्ष्मी हेब्बाळकर या बंगळुरूहून बेळगावला येत असताना आज पहाटे 6 वाजता त्यांच्या कारला अपघात झाला. हा अपघात अत्यंत भीषण होता. अपघातामुळे त्यांच्या पाठीवर दोन ठिकाणी फॅक्चर झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात …
Read More »जिल्हा पंचायत, तालुका पंचायत निवडणुका होणार बॅलेट पेपरवर!
बेळगाव : कर्नाटकात येत्या जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत निवडणुका ईव्हीएम मशीन ऐवजी मतपत्रिकेच्या (बॅलेट पेपर) माध्यमातून घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती कर्नाटक राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जी. एस. संग्रीशी यांनी दिली. आगामी जिल्हा पंचायत व तालुका पंचायत निवडणुकांच्या तयारीसंदर्भात बेळगाव भेटीवर आले असता बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सोमवारी सकाळी …
Read More »भारत विकास परिषदेतर्फे स्वामी विवेकानंद जयंती अपूर्व उत्साहात साजरी
बेळगाव : भारत विकास परिषदेतर्फे स्वामी विवेकानंद जयंती रविवारी सायंकाळी जीजीसी सभागृहात अपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सहव्यवस्था प्रमुख कृष्णानंद कामत व राष्ट्रसेविका समिती नगर कार्यवाहिका विद्या जोशी उपस्थित होत्या. प्रारंभी स्वामी विवेकानंद आणि भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली. …
Read More »नंदीहळ्ळीत लक्ष्मण भरमानी जाधव यांचा जाहीर सत्कार
बेळगाव : नंदीहळ्ळी व्यवसाय सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालकपदी निवडून आल्याबद्दल नंदीहळ्ळी (ता. जि. बेळगाव) येथील लक्ष्मण भरमानी जाधव यांचा गावातील प्रगतशील शेतकऱ्यांच्यावतीने नुकताच जाहीर सत्कार करण्यात आला. चक्क वयाच्या 76 व्या वर्षी सोसायटीची निवडणूक चुरशीने लढवून ती दुसऱ्यांदा जिंकल्याबद्दल या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. सत्काराप्रसंगी ॲड. मारुती …
Read More »सौंदत्ती यल्लमा डोंगरावर येळ्ळूरच्या भाविकांच्या वतीने सामूहिक परड्या भरण्याचा कार्यक्रम
येळ्ळूर : परंपरेनुसार शांकभरी पौर्णिमेला प्रतिवर्षी येळ्ळूरच्या भाविकाकडून सौंदत्ती यल्लमा डोंगरावर सामूहिक परड्या भरण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडत असतो. आज सोमवार (ता. 13) रोजी दुपारी बारा वाजता सौंदत्ती यल्लमा डोंगरावर येळ्ळूरच्या भाविकांकडून सामूहिक परड्या भरण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. सामूहिकरित्या ओला व सुका नैवेद्य परड्यामध्ये भरला जातो. …
Read More »अन्नोत्सवात रो. बसवराज विभूती स्मरणार्थ ‘सबको विद्या शिष्यवृत्ती’ कार्यक्रम सुरू
बेळगाव : अन्नोत्सवाचा मंगळवार हा शेवटचा दिवस असून रविवारी “रो. बसवराज विभूती मेमोरियल – सबको विद्या शिष्यवृत्ती कार्यक्रम” अधिकृतपणे सुरू केला, जो वंचित विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देणारे व्यावसायिक शिक्षण घेण्यास मदत करण्याच्या उद्देशाने सुरू केलेला एक परिवर्तनशील उपक्रम आहे. श्रीमती कविता बसवराज विभूती यांच्या हस्ते अन्नोत्सवात रविवारी लाभार्थ्यांना शिष्यवृत्ती …
Read More »ज्येष्ठ कामगार नेते, स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
बेळगाव : ज्येष्ठ कामगार नेते, स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे सोमवार दिनांक 13 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता निधन झाले. ते 97 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात दोन चिरंजीव प्रा. आनंद मेणसे, ऍड. संजय मेणसे, कन्या सौ. लता पावशे, श्रीमती नीता पाटील व नातवंडे आहेत. गेले काही …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta