Wednesday , December 17 2025
Breaking News

बेळगाव

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी २० जानेवारीला साखर मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन

  राजू पोवार; आंदोलन तात्पुरते स्थगित निपाणी(वार्ता) : डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करावी.शेतकऱ्यांची कर्जमाफीसह कर्ज वसुलीसाठी तगादा लावणाऱ्यांवर बंदी आणावी, ऊसाला योग्य दर द्यावा, यासह विविध मागण्यांसाठी बेळगांव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रयत संघटनेचे आमरण उपोषण सुरु होते. पण भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाल्यामुळे रयत संघटनेचे आंदोलन …

Read More »

उद्या बेळगावात होणारे सर्व कार्यक्रम रद्द

  बेळगाव : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे बेळगावात उद्या दि. 27 डिसेंबर रोजी होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बेळगाव काँग्रेस अधिवेशनाचा शतकमहोत्सवी कार्यक्रम उद्या दि. 27 डिसेंबर रोजी बेळगावात होणार होता. या पार्श्वभूमीवर देशभरातील काँग्रेस नेत्यांनी बेळगावात तळ ठोकला …

Read More »

कुस्ती वस्ताद व प्रसिद्ध पैलवान काशिराम पाटील यांचे निधन

  बेळगाव : कंग्राळी खुर्द येथील रहिवासी, प्रसिद्ध पैलवान कुस्ती वस्ताद काशिराम कल्लाप्पा पाटील (वय 54) यांचे अल्पशा आजाराने आज (दि. 26 रोजी) निधन झाले. त्यांनी भारतीय सैन्य दलात 22 वर्षे देशसेवा व कुस्ती कोच म्हणून सेवा बजावली होती. त्यांनी सैन्य दलातून तसेच खुल्या कुस्ती आखाड्यातून अनेक कुस्त्या जिंकून बेळगाव …

Read More »

पक्षाने तुम्हाला उभे केले, आता तुम्ही पक्षाला मजबूत करा : राहुल गांधी

  बेळगाव : बेळगावमध्ये होत असलेल्या काँग्रेस कार्यसमितीच्या अधिवेशनात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुढचा अजेंडा मांडला. पक्षाने तुम्हाला उभे केले, आता तुम्ही पक्षाला मजबूत करायला पाहिजे, असे म्हणत राहुल गांधींनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनाही जमिनीवर काम करण्याचा स्पष्ट संदेश दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस कार्यसमितीच्या अधिवेशनात बोलताना राहुल गांधी म्हणाले, …

Read More »

मराठी विद्यानिकेतन स्नेहसंमेलन कार्यक्रमांमध्ये ऐनवेळी बदल

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेचे स्नेहसंमेलन 27 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 4.00 वा. आयोजित करण्यात आले होते. पण बेळगाव येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचा शतकपूर्ती समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्याधिकाऱ्यांच्या आदेशानुसार इतर कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई करण्यात आली आहे.. त्यामुळे हे स्नेहसंमेलन शनिवार दिनांक 28 …

Read More »

बिम्समध्ये आणखी एका बाळंतिणीचा मृत्यू…

  बेळगाव : बेळगावच्या बिम्समध्ये रविवारी एका बाळंतिणीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज आणखी एका बाळंतिणीचा उपचाराअभावी मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील कुंदरगी गावातील पूजा अदिवेप्पा खडकबावी (२५) या महिलेला २४ डिसेंबर रोजी बेळगाव बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पूजाने काल एका …

Read More »

शतरंज ‘ऑल इंडिया फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेचे बेळगावात आयोजन

  बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेलगाम साऊथ आणि बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्यावतीने ‘शतरंज’ ऑल इंडिया फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रेल्वे ओव्हर ब्रिज नजिकच्या मराठा मंदिर येथे शनिवार दिनांक 28 आणि रविवार दिनांक 29 डिसेंबर अशी दोन दिवस ही स्पर्धा चालणार आहे. स्पर्धेतील पहिल्या …

Read More »

येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ शनिवारी

  येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने 20 वे येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन रविवार (ता. 5) जानेवारी रोजी होणार आहे. या संमेलनाची मुहूर्तमेढ शनिवार (ता. 28 ) रोजी प्राथमिक मराठी शाळा येळ्ळूरवाडीच्या पटांगणावर अभियंते व उद्योजक हणमंत कुगजी व त्यांच्या पत्नी उज्वला कुगजी यांच्या हस्ते रोवण्यात येणार …

Read More »

राहुल गांधी यांचे बेळगावात आगमन; जल्लोषात स्वागत

  बेळगाव : बेळगावात होणाऱ्या राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमासाठी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे गुरुवारी बेळगावात आगमन झाले. बेळगाव विमानतळावरून ते थेट टिळकवाडी येथील वीरसौध येथे जाऊन विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. एआयसीसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, केसी वेणुगोपाल हेही पोहोचले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी …

Read More »

कै. एम. डी. चौगुले व्याख्यानमालेस २९ डिसेंबरपासून सुरुवात

  बेळगाव : दरवर्षी मण्णूर येथील “कै. एम. डी. चौगुले सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठानच्या वतीने” इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. गरजु विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी तसेच मराठी भाषा संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या युवा नेते आर. एम. चौगुले यांच्या माध्यमातून नेहमीच खारीचा वाटा उचलणाऱ्या एम. डी. चौगुले प्रतिष्ठानतर्फे व्याख्यानमालेचे आयोजन करून दहावीच्या …

Read More »