Sunday , December 14 2025
Breaking News

बेळगाव

कंडक्टर पत्नीच्या खून प्रकरणातील आरोपी पती अटकेत!

  बेळगाव पोलिसांनी सौन्दत्ती येथे कंडक्टर पत्नीचा खून करून फरार झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलला अटक करण्यात यश मिळवले आहे. सौन्दत्ती येथे घटस्फोट घेतलेल्या पत्नीचा पोलीस कॉन्स्टेबलने निर्घृण खून केल्याच्या प्रकरणासंदर्भात आज बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, सौन्दत्ती येथे कंडक्टर म्हणून काम करणाऱ्या काशव्वावर …

Read More »

बेळगावात धोकादायक मांजा विक्रीवर पोलिसांची कारवाई

  बेळगाव : बेळगाव शहरात बेकायदेशीर कृत्यांविरुद्ध पोलिसांनी मोहीम अधिक तीव्र केली आहे. ऑक्टोबर महिन्यात पोलिसांनी हानीकारक मांजा धाग्याच्या विक्रीवर कायदेशीर कारवाई केली आहे. पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हानीकारक मांजा धाग्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांच्या गळ्याला गंभीर दुखापत होण्याची शक्यता लक्षात घेऊन, शहरातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना या धाग्याच्या विक्रीवर कारवाई करण्याचे …

Read More »

कुद्रेमानीत सीमाकवी रवींद्र पाटील यांचा ग्रामस्थातर्फे सत्कार

  कुद्रेमानी ( प्रतिनिधी ) : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे कर्नाटक राज्याध्यक्ष, पत्रकार, उपक्रमशील शिक्षक आणि सीमाकवी म्हणून ओळखले जाणारे रवींद्र मारूती पाटील यांचा नुकताच पुणे आणि मिरज येथील साहित्य संमेलनात ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी कुद्रेमानी ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष …

Read More »

डीसीसी बँकेवर जारकीहोळी-जोल्ले गटाचे वर्चस्व

  बेळगाव : अत्यंत चुरशीने झालेल्या बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर जारकीहोळी-जोल्ले गटाने अखेर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. काल रविवारी सात जागांसाठी मतदान झाले असून यामध्ये अथणीमधून आमदार लक्ष्मण सवदी, रायबागमधून मावळते अध्यक्ष आप्पासाहेब कुलगुडे आणि रामदुर्गमधून मल्लाप्पा यादवाड यांनी विजय संपादित केला. पण, चर्चेचा विषय बनलेल्या हुक्केरी, निपाणी, …

Read More »

“देह दान हे श्रेष्ठ दान” या विषयावर डॉ. महान्तेश रामन्नावर यांचे व्याख्यान

  बेळगाव : बेळगाव अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि प्रगतीशील लेखक संघ बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागर विवेकाचा, या मालिकेत डॉ. महान्तेश रामन्नावर यांचे “देह दान हे श्रेष्ठ दान” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. गिरीश संकुलनाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंधश्रद्धा निर्मूलन बेळगाव शाखेचे अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे हे …

Read More »

मिनी अलिंपिक अथलेटिक्स स्पर्धेची निवड चाचणी संपन्न

  बेळगाव : बेळगाव जिल्हा अथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने 14 वर्षांखालील मुलां-मुलींसाठी जिल्हा अथलेटिक्स संघ निवड चाचणी व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. ही निवड चाचणी जिल्हा स्टेडियम, नेहरू नगर, बेळगाव या ठिकाणी संपन्न झाली. या स्पर्धेत जिल्ह्यातून एकूण 100 हून अधिक खेळाडूनी सहभाग घेतला होता त्यात एकूण 10 खेळाडूंना निवडले …

Read More »

मराठी विद्यानिकेतन जागृती मंचतर्फे पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात

  बेळगाव : यावर्षी देशातील अनेक राज्यात महापुरामुळे शेती, घरे, जनावरे यांचे प्रचंड नुकसान झाले. अन्न, वस्त्र, निवारा यासारख्या मुलभूत गरजांपासून माणसे दुरावली गेली. अशा संकटग्रस्त, पूरग्रस्त परिस्थितीतील बांधवांसाठी मदतीचा हात देण्यासाठी दिनांक २ ऑक्टोबर 2025 रोजी महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्ताने मराठी विद्यानिकेतन जागृती मंचतर्फे पूरग्रस्त मदतनिधीसाठी शाळा ते …

Read More »

आधार शिक्षण संस्थेमध्ये धन्वंतरी पूजन सोहळा संपन्न

  बेळगाव : विद्यानगर बॉक्साईट रोड येथील आधार शिक्षण संस्थेमध्ये श्री धन्वंतरी पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते .यामध्ये संस्थेतील वैद्यकीय अभ्यासक्रम विभागांच्या वतीने धन्वंतरी पूजन करून याचे महत्त्व सांगण्यात आले. संस्थेचे चेअरमन डॉ. डी. टी. बामणे यांनी यावेळी धन्वंतरी पूजनाचे महत्त्व सांगितले. धनत्रयोदशीचा दिवस हा धनाची पूजा करण्याचा दिवस …

Read More »

रामकृष्ण मिशन आश्रमतर्फे विविध कार्यक्रम

  बेळगाव : स्वामी विवेकानंदानी भारत भ्रमण करताना बेळगावला भेट दिली होती. या घटनेला १३३ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रामकृष्ण मिशन आश्रमतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. स्वामी विवेकानंदानी बेळगावातील रिसालदार गल्लीतील भाते यांच्या निवासस्थानी तीन दिवस वास्तव्य केले होते. आता भाते यांच्या निवासस्थानी स्वामी विवेकानंद स्मारक उभारण्यात आले आहे.स्वामीजीनी …

Read More »

बेळगावात राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा भरणाऱ्या मिशन ऑलंपिक संघटनेविषयी

  बेळगाव : ‘मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशन, कर्नाटक’ यांच्या वतीने बेळगाव येथे भव्य ‘मिशन ऑलिम्पिक अखिल भारतीय कुस्ती स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २५ व २६ ऑक्टोबर २०२५ रोजी रामनाथ मंगल कार्यालय, अनगोळ, बेळगाव येथे होणार आहे. विविध खेळांतील खेळाडूंना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ‘मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशन …

Read More »