Sunday , July 26 2026
Breaking News

भारत विकास परिषदेतर्फे स्वामी विवेकानंद जयंती अपूर्व उत्साहात साजरी

Spread the love

 

बेळगाव : भारत विकास परिषदेतर्फे स्वामी विवेकानंद जयंती अपूर्व उत्साहात जीजीसी सभागृहात साजरी करण्यात आली. प्रारंभी स्वामी विवेकानंद आणि भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. अक्षता मोरे यांनी संपूर्ण वंदे मातरम् प्रस्तुत केले.
परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषण केले. राष्ट्रीय महिला कार्यकारिणी सदस्य स्वाती घोडेकर यांनी, स्वामी विवेकानंद यांना आदर्श मानून भारत विकास परिषद संपूर्ण देशात कार्यरत असल्याचे सांगितले. प्राचार्य व्ही. एन्. जोशी यांनी स्वामी विवेकानंद यांचे जीवनचरित्र कथन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुखद देशपांडे यांनी केले. खजिनदार डी. वाय. पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्रांत संघटन सचिव विनायक घोडेकर, डॉ. व्ही. बी. यलबुर्गी, सुहास गुर्जर, व्ही. आर. गुडी, सुभाष मिराशी, कुमार पाटील, रामचंद्र तिगडी, गणपती भुजगुरव, चंद्रशेखर इटी, पी. एम्. पाटील, प्रिया पाटील, चैत्रा पाटील, ॲड. बना कौजलगी, विद्या इटी, शुभांगी मिराशी, लक्ष्मी तिगडी, उमा यलबुर्गी, पूजा पाटील, स्मिता भुजगुरव, रश्मी गुडी, ज्योत्स्ना गिलबिले, नंदिनी पाटील आदी उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *