Tuesday , July 28 2026
Breaking News

बेळगाव

पेरणी हंगामात खत-बियाण्यांच्या तुटवड्यावर शेतकरी आक्रमक; काळाबाजार रोखण्याची मागणी

  बेळगाव : पेरणीच्या तोंडावर बी-बियाणे आणि खतांच्या तुटवड्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले असून, युरियासह विविध खतांचा काळाबाजार सुरू असल्याचा आरोप करत शेतकरी नेते प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त जिल्हाधिकारी (एडीसी) यांना निवेदन सादर केले. निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले आहे की, अनेक ठिकाणी खतांचा पुरेसा साठा उपलब्ध नसून काही विक्रेते …

Read More »

डॉक्टरांच्या घरातील कोट्यवधींच्या दागिन्यांची चोरी उघड; केअरटेकर अटकेत

  बेळगाव : बेळगावातील एका नामांकित डॉक्टरांच्या घरातून कोट्यवधी रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून फरार झालेल्या केअरटेकरला कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात चोरीचा माल विक्रीसाठी मदत करणाऱ्या आणखी एका संशयितालाही ताब्यात घेण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राहुल सतीश कांबळे (वय २७, मूळ रा. कागवाड) असे असून, …

Read More »

पोक्सो प्रकरणातील साक्षीदाराला धमकी देणारा युवक गजाआड

  बेळगाव : पोक्सो प्रकरणातील साक्षीदाराला जीवे मारण्याची धमकी देऊन न्यायालयात साक्ष देण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिरनवाडी येथील एका युवकाला उद्यमबाग पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रोहित विठ्ठल गणाचारी (वय 20, रा. सिद्धेश्वर गल्ली, पिरनवाडी, बेळगाव) असे असून, त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या …

Read More »

जयनगर-हुंचेनहट्टी खूनप्रकरणी २४ तासांत पोलिसांची मोठी कारवाई; ५ आरोपी गजाआड

  बेळगाव : बेळगावजवळील हुंचेनहट्टी गावाच्या शिवारात सेकंड हँड कारच्या पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादाचे रूपांतर थेट खुनात झाले असून, या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी अवघ्या २४ तासांत ५ आरोपींना अटक करत मोठी कारवाई केली आहे. या घटनेत मजगाव येथील राहुल तळवार (वय २२) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, …

Read More »

शहापूरच्या शिवा लोहार यांना पुन्हा मिळाली दृष्टी

  बेळगाव : अडीच महिन्यांपूर्वी फटाक्यांच्या भीषण दुर्घटनेत दोन्ही डोळ्यांची दृष्टी गमावलेल्या शहापूर येथील भारतनगरमधील शिवा नारायण लोहार यांना उपचारांनंतर एका डोळ्याची दृष्टी पुन्हा प्राप्त झाली आहे. या सकारात्मक घडामोडीमुळे कुटुंबीयांसह परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. दुर्घटनेनंतर शिवा लोहार यांच्यावर बेळगाव येथील केएलई हॉस्पिटल, मुंबईतील जे. जे. हॉस्पिटल तसेच …

Read More »

उद्यमबाग रोडवरील रस्ते कामामुळे नागरिकांमध्ये संताप

  बेळगाव : उद्यमबाग रोडवरील सुरू असलेल्या रस्ते कामादरम्यान लोखंडी सळ्या उघड्या अवस्थेत ठेवण्यात आल्याने नागरिक आणि वाहनचालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. वर्दळीच्या रस्त्यावर योग्य सुरक्षाव्यवस्था नसल्यामुळे हा प्रकार गंभीर अपघाताला आमंत्रण देणारा ठरत असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या मार्गावरून दररोज विद्यार्थी, कारखाना कामगार, दुचाकीस्वार तसेच …

Read More »

पोक्सो प्रकरणातील साक्षीदाराला जीवे मारण्याची धमकी; दोघांविरोधात उद्यमबाग पोलीस स्थानकात तक्रार

  बेळगाव : पोक्सो प्रकरणात साक्ष देऊ नये म्हणून साक्षीदाराला जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना बेळगावमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोघांविरोधात उद्यमबाग पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. संजय परशुराम नेकनार (वय ३६, रा. शांतीसागर कॉलनी, मजगाव, बेळगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे पिरनवाडी क्रॉस परिसरात ‘परशुराम किचन वेअर’ …

Read More »

डी. के. शिवकुमार सरकारमध्ये बेळगावला किती मंत्रिपदे मिळणार? आमदारांची मंत्रिपदावर नजर..!

  बेळगाव : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्यानंतर कर्नाटकात सत्तेच्या नव्या समीकरणांची चर्चा रंगली असून, नव्या मंत्रिमंडळात बेळगाव जिल्ह्याला किती प्रतिनिधित्व मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील अनेक काँग्रेस आमदारांनी मंत्रीपदासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. बैलहोंगल मतदारसंघाचे तीन वेळा आमदार महंतेश कौजलगी आणि रामदुर्गचे आमदार अशोक पट्टण यांनी मंत्रीपदासाठी जोरदार …

Read More »

उत्तर विभाग आयजीपी संदीप पाटील यांनी स्वीकारला पदभार

  बेळगाव : वरिष्ठ पोलीस अधिकारी संदीप पाटील यांनी गुरुवारी उत्तर विभागाचे नवीन आयजीपी म्हणून अधिकृतपणे पदभार स्वीकारला. यापूर्वी या पदावर कार्यरत असलेले आयजीपी चेतन सिंग राठोड यांनी संदीप पाटील यांच्याकडे पदभार सुपूर्द केला. बेळगाव मुख्यालय असलेल्या उत्तर विभागाच्या पोलीस प्रशासनातील हा महत्त्वपूर्ण बदल मानला जात आहे. आपल्या कार्यकाळात उल्लेखनीय …

Read More »

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक 30 रोजी

  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची महत्त्वपूर्ण बैठक शनिवार दिनांक 30 मे 2026 रोजी दुपारी 3.30 वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलवण्यात आली आहे. या बैठकीस मध्यवर्तीच्या सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.

Read More »