बेळगाव : पेट्रोल, डिझेल आणि खतांच्या वाढत्या किमतींमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत असून केंद्र व राज्य सरकारने तातडीने इंधन आणि खतांचे दर नियंत्रणात आणावेत, अशी मागणी भारतीय कृषक समाजाचे जिल्हाध्यक्ष बसवराज मोकाशी यांनी केली. बेळगाव शहरातील कन्नड साहित्य भवन येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. युद्धजन्य परिस्थितीचे …
Read More »कर्नाटक काँग्रेसमध्ये नेतृत्वबदलाच्या चर्चा; प्रदेशाध्यक्षपदासाठी सतीश जारकीहोळी यांच्या नावाची चर्चा
बेळगाव : कर्नाटकातील काँग्रेस राजकारणात पुन्हा एकदा नेतृत्वबदलाच्या चर्चांना उधाण आले असून, दिल्लीतील पक्षश्रेष्ठींच्या बैठकींमुळे राज्यातील सत्तासमीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा जाण्याची शक्यता व्यक्त होत असताना, कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीच्या (KPCC) अध्यक्षपदासाठी बेळगावचे पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांचे नाव …
Read More »बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात पोलिसांचे पथसंचलन
बेळगाव : बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बेळगाव शहर पोलिसांकडून बुधवारी बाजारपेठ परिसरात व्यापक पथसंचलन काढण्यात आले. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या पथसंचलनात पोलीस उपायुक्त नारायण बरमनी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. खडेबाजार, किर्लोस्कर रोड, …
Read More »कन्नडसक्ती आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे आवाहन बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची बैठक युवा समिती कार्यालय कावळे संकुल टिळकवाडी बेळगाव येथे अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीच्या सुरवातीला मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, ज्येष्ठ नेते अर्जुन गोरल तसेच इतर समिती कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अध्यक्ष अंकुश केसरकर म्हणाले, …
Read More »अल्पवयीन नवतेजचा विश्वविक्रम
बेळगाव : सावगाव रोड, बेळगाव येथील कुमार नवतेज भूषण पालकर (वय ३) याने “चित्रांशिवाय टेक्स्टमधून १५ फळे व प्राण्यांची नावे सर्वात जलद वाचणे” या प्रकारात अवघ्या ३० सेकंदांत कामगिरी पूर्ण करून जागतिक विक्रमाची नोंद केली आहे. या यशामुळे नवतेजची नोंद Worldwide Book of Records मध्ये करण्यात आली असून त्याच्यावर …
Read More »शिवानंद निलण्णावर यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
बेळगाव : बहुचर्चित ४,५०० कोटी रुपयांच्या कथित फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी शिवानंद निलण्णावर यांना बुधवारी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीआयडी अधिकाऱ्यांनी निलण्णावर यांना दुसऱ्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले होते. तपास यंत्रणेच्या मागणीचा विचार करून न्यायाधीश गंगाधर के. यांनी निलण्णावर यांना …
Read More »मराठी विद्यानिकेतनला माजी विद्यार्थी व ज्येष्ठ शिक्षक यांची उदार देणगी
बेळगाव : मराठी विद्यानिकेतनच्या सावित्रीबाई फुले विद्यार्थी दत्तक योजनेसाठी शाळेचे माजी विद्यार्थी प्रा. बळवंत पाटील तसेच ज्येष्ठ निवृत्त शिक्षक एस. आर. पाटील यांनी प्रत्येकी रोख रुपये २५,००० इतकी देणगी देऊन सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला आहे. प्रा. बळवंत पाटील हे मराठी विद्यानिकेतनचे माजी विद्यार्थी असून सध्या जी.आय.टी महाविद्यालयात प्राध्यापक …
Read More »दिवसाढवळ्या घरफोडी करणारा सराईत चोरटा जेरबंद; 23 लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त
बेळगाव : मारिहाळ पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घरफोडीच्या मालिकेमागील सराईत चोरट्याला अटक करून तब्बल 23 लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात मोठे यश मिळवले आहे. या कारवाईमुळे परिसरातील घरफोडीच्या घटनांवर आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दि. 10 मे 2026 रोजी शिंदोळी गावातील महालक्ष्मीपूरम नगर येथे कुलूप लावलेल्या घराचा दरवाजा …
Read More »४,५०० कोटी घोटाळा प्रकरण : आलिशान कार भेट प्रकरणी करवे जिल्हाध्यक्ष आर. अभिलाष सीआयडीसमोर हजर
बेळगाव : बेळगावमध्ये प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या तब्बल ४,५०० कोटी रुपयांच्या कथित ठेवधारक फसवणूक प्रकरणाचा सीआयडी तपास अंतिम टप्प्यात पोहोचला असून या प्रकरणातील तपासाची व्याप्ती वाढत आहे. मुख्य आरोपी शिवानंद नीलण्णावर याच्याकडून आलिशान कार भेट म्हणून स्वीकारल्याच्या आरोपावरून ‘कर्नाटक रक्षण वेदिके’ (प्रवीण शेट्टी गट) चे जिल्हाध्यक्ष तथा अभिनेते आर. …
Read More »महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक उद्या
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगावची महत्त्वपूर्ण बैठक बुधवार दिनांक २७/०५/२०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता युवा समिती कार्यालय कावळे संकुल टिळकवाडी बेळगाव येथे बोलाविण्यात आली असून बैठकीला सर्व पदाधिकारी, संघटक, कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी केले आहे.
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta