Tuesday , July 28 2026
Breaking News

बेळगाव

रायबाग तालुक्यात भीषण अपघात होऊन चिमुकल्यासह तिघांचा दुर्दैवी मृत्यू

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील बोम्मनल गावाजवळ झालेल्या भीषण रस्ते अपघातात चिमुकल्यासह एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महंतेश, त्यांची पत्नी साक्षी आणि त्यांचे ९ महिन्यांचे बाळ हे तिघे दुचाकीवरून रायबाग रेल्वे स्थानक परिसरातून जात होते. यावेळी त्यांच्या दुचाकीची एका ऑटोरिक्षासोबत जोरदार …

Read More »

बेळगाव महापालिकेला २ जूनपर्यंतचा अल्टिमेटम; अन्यथा ‘कर्नाटक बंद’चा इशारा : वाटाळ नागराज

  बेळगाव : बेळगाव कर्नाटकचा अविभाज्य भाग आहे तसेच महाजन आयोग अहवालाच्या अंमलबजावणीचा ठराव २ जूनपर्यंत बेळगाव महानगरपालिकेत मंजूर करावा, अन्यथा ४ जून रोजी बंगळुरूत बैठक घेऊन अखंड कर्नाटक बंदची हाक दिली जाईल, असा इशारा ज्येष्ठ कन्नड चळवळीचे नेते वाटाळ नागराज यांनी दिला. बेळगाव येथे माध्यमांशी संवाद साधताना वाटाळ नागराज …

Read More »

महापालिकेला घेराव घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाटाळ नागराज यांच्यासह अनेक कन्नड समर्थक कार्यकर्ते ताब्यात

  बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेत कर्नाटकाच्या बाजूने ठराव मंजूर करण्याच्या मागणीसाठी विविध कन्नड समर्थक संघटनांनी आज महापालिकेवर घेराव घालण्यासाठी आंदोलन छेडले असता पोलिसांनी वाटाळ नागराज यांच्यासह शंभरहून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, वाटाळ नागराज यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या आंदोलनात अनेक कन्नड संघटनांचे समर्थक कार्यकर्ते सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी …

Read More »

बेळगाव महापालिकेला आज कन्नड संघटनांचा घेराव; बेळगावातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न

  बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेत कर्नाटक समर्थक ठराव मंजूर करण्यात यावा, या मागणीसाठी विविध कन्नड समर्थक संघटनांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आज मंगळवार दि. २६ रोजी बेळगाव महापालिका कार्यालयावर घेराव घालणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. कन्नड सेना–कर्नाटक, कित्तूर कर्नाटक सेना, गडीनाड कन्नडिगा सेना, कन्नड क्रिया …

Read More »

इंधन दरवाढ कायम; बेळगावात पेट्रोल ११०.७४ तर डिझेल ९८.६९ रुपयांवर

  बेळगाव : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढली आहे. सलग काही दिवसांपासून इंधनाच्या किमतींमध्ये वाढ होत असल्याने वाहनधारकांच्या खर्चात वाढ झाली असून, त्याचा परिणाम दैनंदिन जीवनावरही होताना दिसत आहे. सध्याच्या दरानुसार बेळगावात पेट्रोलचा दर प्रतिलिटर ११०.७४ रुपये, तर डिझेलचा दर ९८.६९ रुपये इतका झाला आहे. नव्या …

Read More »

कपिलेश्वर मंदिर परिसरात आता “ड्रेस कोड”; धार्मिक पवित्रता आणि शिस्त राखण्यासाठी निर्णय

  बेळगाव : कपिलेश्वर मंदिर परिसरातील धार्मिक पवित्रता, शिस्त आणि पारंपरिक वातावरण कायम राखण्यासाठी भाविकांसाठी आत्ता “ड्रेस कोड’ नियम लागू करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मंदिर प्रशासनाने अयोग्य पोशाखात येणाऱ्या भाविकांवर निर्बंध घालण्यासाठी परिसरात सूचना फलक उभारले असून यासंदर्भात जनजागृती मोहीमही सुरू केली आहे. अलीकडे काही भाविक पाश्चिमात्य पोशाखात मंदिरात येत …

Read More »

आयटी क्षेत्रातील नोकर कपातीवर शरद पवारांकडे निवेदन; कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याची मागणी

  मुंबई : माननीय खासदार शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) इंजिनिअर सेलचे प्रदेशाध्यक्ष अमित देसाई यांनी मुंबई येथे भेट घेऊन आयटी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील वाढत्या नोकरकपातीच्या गंभीर प्रश्नावर सविस्तर चर्चा केली. यावेळी अमित देसाई यांनी शरद पवार यांना निवेदन सादर करत देशातील आयटी आणि कॉर्पोरेट क्षेत्रात …

Read More »

शिंदोळी सरकारी शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात पालकांसह ग्रामस्थांचे आंदोलन!

  बेळगाव : शिंदोळी येथील सरकारी शाळा बंद करून ती ‘केपीएस मॅग्नेट’ योजनेअंतर्गत मास्तमरडी येथील शाळेत विलीन करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात आज शिंदोळी येथे पालकांनी, ग्रामस्थांनी आणि विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. ‘सार्कजनिक शिक्षण वाचवा’ समिती आणि ‘एआयडीएसओ’ (AIDSO) संघटनेच्या संयुक्त नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर …

Read More »

भारत विकास परिषदेतर्फे दहावी-बारावी परिक्षेत शहरात प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान व शिष्यवृत्ती प्रदान

  बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने दहावी व बारावीच्या बोर्ड परिक्षेत बेळगाव शहरात सर्वप्रथम आलेल्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन रविवारी सायंकाळी जीजीसी सभागृहात विशेष सन्मानित करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक आणि समाजसेवक सुहास चांडक उपस्थित होते. प्रारंभी स्वरा मोरे आणि पूर्णा प्रभू यांनी संपूर्ण वंदे मातरम् प्रस्तुत केले. मुख्य …

Read More »

ज्योती सेंट्रल स्कूलच्या दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

  बेळगाव : महाराष्ट्र राज्य मराठी भाषा विकास महामंडळ, मुंबई आणि शाहू प्रकाशन, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ज्योती कॉलेज, बेळगाव येथे बेळगाव शहर आणि शहरालगत असणाऱ्या दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या शाळांतील सी.बी.एस.ई. (CBSE) आणि स्टेट बोर्ड दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात पैकीच्या पैकी गुण प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ अत्यंत …

Read More »