







बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे औचित्य साधून गेल्या दहा वर्षांपासून सोसायटीला बहुमोल सहकार्य करणाऱ्या डॉ. नीता देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. सोसायटीचे अध्यक्ष विश्वास धुराजी यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. नीता देशपांडे यांनी ज्येष्ठ नागरिक सोसायटीला भविष्यातही आवश्यक ते सहकार्य कायम ठेवण्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमात सेट्रा केअरतर्फे डॉ. शाहनाज पटेल यांनी हृदयविकाराचा झटका येण्याची कारणे, घ्यावयाची काळजी, प्राथमिक उपचार तसेच वैद्यकीय उपचार याबाबत सखोल मार्गदर्शन केले. उपस्थितांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे देऊन शंकांचे निरसन केले.
यावेळी के. एल. मजूकर व शोभा हतरकी यांनी ७५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल, तसेच एन. जी. गाडगीळ (सीए), खजिनदार विनिता बाडगी, नूतन कार्यकारिणी सदस्य उल्हास पानसे व बाळकृष्ण बिर्जे, माजी उपाध्यक्ष जवाहर देसाई आणि डॉ. शाहनाज पटेल यांचा अध्यक्ष विश्वास धुराजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
व्यासपीठावर उपाध्यक्ष के. एल. मजूकर, कार्यवाह सुरेंद्र देसाई, सहकार्यवाह शिवराज पाटील, खजिनदार विनिता बाडगी, कार्यकारिणी सदस्य विजय वाईगडे, विठ्ठल पोलो, वनिता जोशी, स्नेहलता जुवळी, उल्हास पानसे, बाळकृष्ण बिर्जे आणि प्रकाश कुडतरकर उपस्थित होते.
सुरेंद्र देसाई यांनी स्वागत केले, तर शिवराज पाटील यांनी आभार मानले.

Belgaum Varta Belgaum Varta