बेळगाव : दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर विद्यार्थ्यांच्या आनंदाला पुन्हा उधाण आले असून सोमवार, १ जूनपासून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ला प्रारंभ होत आहे. नव्या आशा, नव्या आकांक्षा आणि उज्ज्वल भवितव्याची स्वप्ने उराशी बाळगून विद्यार्थी पुन्हा एकदा शाळेच्या प्रांगणात दाखल होणार आहेत. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले …
Read More »संपत्तीच्या हव्यासापोटी मुलाचा कळस; वृद्धापवेतन, दागिने बळकावून 78 वर्षीय आईला घराबाहेर काढले
रायबाग : आईने आयुष्यभर कष्ट करून वाढवलेल्या मुलानेच वृद्धापकाळात तिचा आधार बनण्याऐवजी छळ करत घराबाहेर काढल्याची हृदयद्रावक घटना रायबाग तालुक्यातील माडलगी येथे घडली आहे. वृद्धापवेतन, गृहलक्ष्मी योजनेचे पैसे आणि दागिने बळकावून 78 वर्षीय आईला बेघर केल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हालप्पा खांडेकर असे संबंधित मुलाचे नाव …
Read More »ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये सी.बी.एस्.ई शालेय शिक्षकांकरिता कार्यशाळा
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प येथे सी.बी.एस्.ई. शाळेच्या शिक्षकांसाठी दोन दिवसीय विशेष ‘क्षमता विकास कार्यक्रम’ कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. शाळेचे प्राचार्य श्री. प्रदीप पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली २९ आणि ३० मे २०२६ रोजी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षी …
Read More »सीमाप्रश्नाच्या सुनावणीसाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घ्यावा; उदय सामंतांकडे समितीची मागणी
बेळगाव : महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी रविवारी बेळगाव दौऱ्यात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. यावेळी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या बेळगाव सीमाप्रश्नाच्या खटल्याची लवकर सुनावणी व्हावी आणि त्यासाठी महाराष्ट्र सरकारने सक्रिय भूमिका घ्यावी, अशी मागणी समितीच्या शिष्टमंडळाने …
Read More »मराठा लाईट इन्फंट्रीच्या ७ व्या अग्निवीर तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा दिमाखात
बेळगाव : अग्निपथ योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या सातव्या अग्निवीर तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा शनिवारी मोठ्या उत्साहात आणि लष्करी शिस्तीच्या वातावरणात पार पडला. २४ आठवड्यांचे कठोर सैनिकी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या ७६५ अग्निवीरांनी यावेळी देशसेवेसाठी स्वतःला समर्पित करण्याची शपथ घेतली. बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री …
Read More »गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक यश हेच उज्ज्वल भविष्यासाठी भक्कम पाऊल : डॉ. शोभलता उदपीडी
बेळगाव : एसएसएलसी आणि पीयूसी परीक्षांमधील यश हे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भक्कम पाया ठरते. या परीक्षांमध्ये मिळविलेले यश केवळ गुणांचे मोजमाप नसून उच्च शिक्षण आणि करिअरच्या नव्या संधींचे प्रवेशद्वार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चिकाटी, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर पुढील शैक्षणिक वाटचाल यशस्वी करावी, असे प्रतिपादन बेल्लद लॉ कॉलेज तसेच गुजरात …
Read More »सीमाभागातील मराठी बांधवांसोबत आम्ही ठामपणे उभे आहोत : मंत्री उदय सामंत
बेळगाव (नरेश पाटील) : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना सीमाभागातील मराठी बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांना महाराष्ट्र शासनाची नैतिक साथ कायम असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे मराठी भाषा तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. मराठी सन्मान यात्रा, सीमाप्रश्नावरील एक लाख स्वाक्षरी मोहीम आणि महाराष्ट्रातील विविध भागांतून मिळणारा …
Read More »केएचएमए बेळगाव शाखेच्या नव्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा व वैज्ञानिक परिसंवाद उत्साहात संपन्न
बेळगाव : कर्नाटक होमिओपॅथिक मेडिकल असोसिएशन (KHMA), बेळगाव शाखेच्या नव्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा व वैज्ञानिक परिसंवाद रविवारी गांधी भवन, बेळगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास होमिओपॅथी क्षेत्रातील नामवंत डॉक्टर, वैद्यकीय महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, पदव्युत्तर विद्यार्थी, इंटर्न तसेच विविध जिल्ह्यांतील वैद्यकीय व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन …
Read More »बिजगर्णीत 2 व 3 जून रोजी श्री भावकाई देवी यात्रोत्सव; धार्मिक कार्यक्रमांची जय्यत तयारी
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी येथे प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही श्री भावकाई देवी यात्रोत्सवाचे आयोजन मंगळवार, दि. 2 जून ते बुधवार, दि. 3 जून 2026 या कालावधीत करण्यात आले आहे. यात्रोत्सवाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक समितीने केले आहे. बिजगर्णी येथील श्री भावकाई देवी मोरे …
Read More »हाजगोळी येथे बुडालेल्या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात एचईआरएफ रेस्क्यू टीमला यश
बेळगाव : हाजगोळी येथील डॅम परिसरात पाण्यात बुडालेल्या बेळगावच्या २२ वर्षीय तरुणाचा मृतदेह तब्बल १८ ते २० फूट खोल पाण्यातून बाहेर काढण्यात हेल्पलाइन इमर्जन्सी रेस्क्यू फाउंडेशन (HERF) च्या पथकाला यश आले. रात्रभर सुरू असलेल्या अथक शोधमोहीमेनंतर ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार नामदेव पाटील (वय २२) …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta