मच्छे : येथील सरकारी मराठी प्राथमिक केंद्र शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षी शासनाच्या वतीने नव्याने सुरू करण्यात आलेल्या एलकेजी वर्गाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ३२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन शाळेवर विश्वास व्यक्त केला आहे. प्रवेश घेतलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे सातवीच्या विद्यार्थ्यांनी, एसडीएमसी सदस्यांनी व …
Read More »पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती गणवेश व पाठ्यपुस्तके; शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण
बेळगाव : मागील शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होऊन महिना उलटल्यानंतरही विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व गणवेश उपलब्ध झाले नव्हते. मात्र यंदाच्या २०२६-२७ या नूतन शैक्षणिक वर्षात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आल्याने शालेय परिसरात आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बेळगाव शहरासह परिसरातील सर्व सरकारी शाळांमध्ये …
Read More »बेळगावचे सुपुत्र दिनेश ओऊळकर आरबीआय समितीच्या अध्यक्षपदी
बेळगाव : बेळगावचे मूळ रहिवासी, महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न तज्ञ समितीवर कार्यरत असलेले आणि सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी दिनेश ओऊळकर यांची भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक (UCB) क्षेत्रासाठी आदर्श उपविधी (Model Bye-Laws) तयार करणाऱ्या उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. आरबीआयच्या १ जून २०२६ रोजीच्या आदेशानुसार, देशभरातील …
Read More »बालवीर विद्यानिकेतनमध्ये विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत
बेळगाव : बेळगुंदी येथील बालवीर सोशल फाउंडेशन संचलित बालवीर विद्यानिकेतन शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात, फुलांची उधळण करत उत्साहपूर्ण वातावरणात जंगी स्वागत करण्यात आले. स्वागत समारंभासाठी प्राथमिक विभाग प्रमुख रेखा शहापूरकर, माध्यमिक विभाग प्रमुख मंगल पाटील, शिक्षकवृंद तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रमुख अतिथी …
Read More »कंग्राळी (खुर्द) मराठी शाळेला 1989 ते 96 बॅचच्या विद्यार्थ्यांनी दिल्या पन्नास खुर्च्या भेट
बेळगाव : कंग्राळी (खुर्द) येथील उच्च प्राथमिक सरकारी मराठी शाळेचा शतकोत्तर वर्धापन दिनाचा कार्यक्रम गेले दोन दिवस मोठ्या उत्साहात पार पडला, या दरम्यान दोन दिवस अनेक कार्यक्रम पार पडले, विविध प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमानी हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेच्या शतकमहोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय …
Read More »किमान वेतनवाढीचा दुरुस्ती आदेश रद्द करण्यासाठी उद्योजकांचा मोर्चा
बेळगाव : कर्नाटक सरकारने कामगारांच्या किमान वेतनात केलेल्या वाढीच्या दुरुस्ती आदेशाविरोधात बेळगावातील उद्योजक आणि व्यापाऱ्यांनी सोमवारी तीव्र निषेध व्यक्त केला. चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून सरकारला निवेदन सादर करण्यात आले. वेतनवाढीचा निर्णय लघु व मध्यम उद्योगांसाठी आर्थिकदृष्ट्या घातक असल्याचा दावा करत हा आदेश …
Read More »आयजीपी संदीप पाटील यांचा वकिलांकडून सत्कार
बेळगाव : उत्तर परिक्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षक (आयजीपी) पदावर नियुक्ती झाल्याबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकारी संदीप पाटील यांचा बेळगाव येथील वकिलांकडून सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी उपस्थित वकिलांनी संदीप पाटील यांच्या कार्यक्षम, कर्तव्यदक्ष आणि जनाभिमुख कार्यपद्धतीचा गौरव केला. बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून कार्यरत असताना त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच …
Read More »सीमाप्रश्न सुटेपर्यंत लढा सुरूच; कन्नडसक्ती आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन
बेळगाव : सीमाप्रश्नाची कायमस्वरूपी सोडवणूक होईपर्यंत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचा लढा सुरूच राहणार असून मराठी भाषिकांच्या न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने निर्णायक संघर्ष उभारला जाईल, असा ठाम निर्धार समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी व्यक्त केला. १ जून १९८६ च्या कन्नड सक्तीविरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी सोमवारी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकावर …
Read More »सार्वजनिक वाचनालयातर्फे मुख्याध्यापकांना आवाहन
बेळगाव : सार्वजनिक वाचनालय, बेळगाव या संस्थेच्यावतीने सालाबादप्रमाणे यंदाही राजर्षी शाहू छत्रपती महाराज जयंतीचे औचित्य साधून दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षामध्ये मराठी माध्यम दहावी (एस.एस.एल.सी.) परीक्षेत बेळगाव शहर आणि बेळगाव तालुका या विभागात सर्वप्रथम आलेल्या एका विद्यार्थी/विद्यार्थिनीस …
Read More »कावळेवाडीत विद्यार्थी गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
बेळगाव : कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही दहावी उत्तीर्ण व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी.एस. मोरे होते. प्रारंभी स्वागत गीतांनी सुरूवात केली. श्री संत ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta