Tuesday , November 24 2026
Breaking News

बेळगाव

सेंट झेवियर्सला फुटबॉलमध्ये दुहेरी मुकुट

  बेळगाव : लेले मैदानावर झालेल्या शहर तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत सेंट झेवियर्स हायस्कूलच्या १४ वर्षांखालील मुले आणि १७वर्षांखालील मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावले. दोन्ही संघांनी जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी पात्रता मिळवली असून ते बेळगाव शहराचे प्रतिनिधित्व करणार आहेत. १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने उपांत्य फेरीत बेन्सन्स स्कूलचा ३-० असा पराभव केला. या सामन्यात …

Read More »

बाप्पाच्या चरणी सेवा; भोई गल्ली मंडळातर्फे महाप्रसाद

  बेळगाव : गणरायाच्या चरणी सेवा म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. याच भावनेतून भोई गल्ली येथील श्री सार्वजनिक बाल गणेशोत्सव मंडळातर्फे रविवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी गणहोम, महापूजा तसेच महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. गणरायाच्या आगमन सोहळ्यापासूनच मंडळातर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे …

Read More »

मराठी शाळा क्र. ५ मध्ये कै. अॅड. किसनराव यळ्ळूरकर गुणवत्ता पुरस्कारांचे वितरण

  बेळगाव : चव्हाट गल्ली येथील मराठी शाळा क्रमांक ५ मध्ये माजी विद्यार्थी संघाच्या वतीने कै. अॅड. किसनराव यळ्ळूरकर यांच्या स्मरणार्थ गुणवत्ता पारितोषिक वितरण समारंभ सोमवारी (दि. २१) उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. अमर यळ्ळूरकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून तुकाराम को-ऑप. बँकेचे चेअरमन प्रकाश मरगाळे, दीपक किल्लेकर, शितल यळ्ळूरकर, …

Read More »

तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेचे विजेतेपद

बेळगाव : टिळकवाडी येथील सुभाषचंद्र बोस लेले मैदानावर सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने आयोजित बेळगाव शहर तालुकास्तरीय मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत अनगोळ येथील संत मीरा शाळेने बलाढ्य सेट पाल्स शाळेचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. १७ वर्षांखालील मुलांच्या गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात संत मीरा शाळेने भरतेश इंग्लिश मीडियम स्कूलचा ३-० असा पराभव केला. …

Read More »

‘सर्व धर्म समभाव’ समाजाला एकत्रित करणारा उचगाव येथील शिवज्योत युवक मंडळ : बाळु देसुरकर

  बेळगाव : समाजातील सर्व समाजाच्या युवकांना एकत्रित करून आजच्या श्री गणेशाच्या महाआरतीचे निमंत्रण देऊन समाजामध्ये एकीची भावना निर्माण करण्याचे कार्य शिवज्योत युवक मंडळ आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणपत गल्ली उचगाव या युवक मंडळांनी करून दाखविले आहे, असे प्रतिपादन उचगाव ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष बाळू देसुरकर यांनी यांनी व्यक्त केले. येथील …

Read More »

दोन सरकारी बसची भीषण धडक; २५ हून अधिक प्रवासी जखमी

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल शहरातील आश्रय नगर येथे सोमवारी दोन सरकारी बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात विद्यार्थ्यांसह २५ हून अधिक प्रवासी जखमी झाले. जखमींना तातडीने बैलहोंगल सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बैलहोंगलहून बेविनकोप्पकडे जाणारी सरकारी बस पुढे जात असलेल्या दुसऱ्या सरकारी बसला …

Read More »

यल्लम्मा डोंगरावर सलग दुसऱ्या दिवशी कारवाई; ९ दुकानदारांसह मंदिराच्या दोघांना नोटिसा

  सौन्दत्ती : सौन्दत्ती तालुक्यातील प्रसिद्ध यल्लम्मा डोंगरावर येथे अन्न सुरक्षा व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी तपासणी मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत विविध अनियमितता आढळून आल्याने ९ दुकानदारांसह मंदिरातील दोन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तपासणीदरम्यान डोकेदुखी, सर्दी, उलटी, जुलाब आदी आजारांसाठी वापरल्या जाणाऱ्या …

Read More »

मनापासून केलेली भक्ती हाच खरा देव; अर्जुनराव चौगुले

बेळगाव : मनापासून केलेली भक्ती हाच खरा देव आहे. केवळ माणसांतच नव्हे, तर पशू, पक्षी आणि प्राण्यांमध्येही देव आहे, असा मानवतेचा संदेश संतांनी दिला, असे प्रतिपादन निवृत्त माध्यमिक शिक्षक अर्जुनराव चौगुले यांनी केले. राज्य विकास मराठी संस्था, मुंबईच्या प्रेरणेने प्रगतिशील लेखक संघ व अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने रविवारी (२० सप्टेंबर) आयोजित …

Read More »

कै. राजाबाई राठोड यांच्या निधनाने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे शोक

    बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती, बिदर जिल्ह्याचे अध्यक्ष श्री. रामराव राठोड यांच्या धर्मपत्नी सौ. राजाबाई रामराव राठोड यांचे अल्पशा आजाराने सोमवारी (दि. २१ सप्टेंबर २०२६) दुपारी २ वाजता निधन झाले. सौ. राजाबाई राठोड यांच्या निधनाने राठोड परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनाबद्दल मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने …

Read More »

उत्तर परिक्षेत्राचे आयजीपी संदीप पाटील यांची ‘बेळगावचा राजा’ला सदिच्छा भेट

  बेळगाव : उत्तर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी चव्हाट गल्ली येथील ‘बेळगावचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रीमंडपाला सदिच्छा भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संदीप पाटील यांचे स्वागत करून सत्कार केला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्सवातील सुरक्षा व्यवस्था, शांतता आणि नियोजनाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. गणेशोत्सव काळात …

Read More »