Tuesday , July 28 2026
Breaking News

बेळगाव

खडेबाजार पोलिसांची मटका अड्ड्यावर धाड; एक आरोपी अटकेत

  बेळगाव : खडेबाजार पोलीस ठाण्याच्या पथकाने मटका जुगार विरोधात कारवाई करत एका आरोपीला अटक केली असून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जून रोजी सदाशिवनगर येथील कार्तिक प्रल्हाद होळेन्नवर (वय ३०) हा बसवण गल्लीतील बंगी बोळ परिसरात सार्वजनिक ठिकाणी अंकांवर पैसे लावून ओसी …

Read More »

विद्यार्थ्यांचीही फेस रिडिंगद्वारे हजेरी; शिक्षकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

  बेळगाव : शिक्षकांची उपस्थिती कर्तव्य ॲपद्वारे फेस रिडिंगच्या माध्यमातून नोंदविली जात असतानाच आता विद्यार्थ्यांची हजेरीदेखील फेस रिडिंगद्वारे नोंदविण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. याबाबतचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले असून, यामुळे शिक्षकांच्या कामाच्या ताणात आणखी भर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या शिक्षकांना स्वतःची उपस्थिती कर्तव्य ॲपवर नोंदविताना …

Read More »

कोर्ट परिसर आहे की दारूचा अड्डा; जिल्हाधिकारी लक्ष देतील का?

  बेळगाव : न्यायदानाचे पवित्र केंद्र मानल्या जाणाऱ्या कोर्ट परिसरातच मद्यपान करून बाटल्या इतरत्र टाकल्याचे चित्र समोर आले आहे. कोर्ट परिसरात येणारे पक्षकार, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी यांना अशा प्रकारामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी मद्याच्या बाटल्या, प्लास्टिकचे ग्लास आणि इतर कचरा आढळून येत असल्याने परिसराच्या स्वच्छतेवरही …

Read More »

डी. के. शिवकुमार मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच बेळगावात काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष

  मृणाल हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली विजयोत्सव; राणी चन्नम्मा चौकात फटाक्यांची आतषबाजी, मिठाई वाटप बेळगाव : कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी डी. के. शिवकुमार यांनी शपथ घेतल्यानंतर बेळगावात काँग्रेस कार्यकर्त्यांनी उत्साहात विजय उत्सव साजरा केला. युवा काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे शहरात उत्सवी वातावरण निर्माण झाले. शहरातील काँग्रेस …

Read More »

श्रीरामजन्म म्हणजे काळोखावर प्रकाशाने मिळवलेल्या विजयाचा आरंभ होय : डॉ. शेवडे

  बेळगाव : पराक्रमी असूनही क्रूरकर्मा असलेल्या रावणाने देव, यक्ष, गंधर्व आणि राक्षस यांच्या हातून वध न होण्याचा वर मिळवला होता. अति आत्मविश्वासाने त्याने यातून मनुष्याला वगळले होते. भगवंतांनी मनुष्यावतार घेऊन त्याचा नाश केला. रामजन्म म्हणजे अमंगलावर मांगल्याने, अभद्रावर भद्राने आणि काळोखावर प्रकाशाने मिळवलेल्या विजयाचा आरंभ होता असे प्रतिपादन ख्यातनाम …

Read More »

वैश्यवाणी समाजातर्फे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच शैक्षणिक साहित्य वाटप

  बेळगाव : श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना व वैश्य वाणी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील 200 अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले व इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतच्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. गोवावेस येथील चिदंबर पांडुरंग व राजाराम महाराज गुरु मठात …

Read More »

मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी, बेळगावचा बी.फार्म प्रथम सत्राचा निकाल जाहीर

  बेळगाव : राजीव गांधी युनिव्हर्सिटी आँफ हेल्थ सायन्स, बेंगलोर या विद्यापिठातर्फे घेण्यात आलेल्या बी.फार्म (प्रथम सत्र) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाविद्यालयातील बगेइरम मुल्ला यांनी 84.5% गुणांसह प्रथम क्रमांक, उम्मेहानी ओलमनी यांनी 82.7% गुणांसह द्वितीय क्रमांक, तर मुबीना डबाडी यांनी 81.8% गुणांसह …

Read More »

नामफलकांवरील ६०-४० नियमासाठी जिल्हा प्रशासनाला मध्यवर्ती म. ए. समितीकडून निर्वाणीचा इशारा

  बेळगाव : सरकारी व खासगी आस्थापनांच्या नामफलकांवर ६० टक्के कन्नड आणि ४० टक्के इतर भाषांचा नियम लागू करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने प्रशासनाला २२ जूनपर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. या कालावधीत मागणी मान्य न झाल्यास मराठी भाषिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मध्यवर्ती म. ए. समितीच्या नेत्यांनी दिला. …

Read More »

भातकांडे शाळेसमोरील रस्त्याने घेतला मोकळा श्वास; दुरुस्तीच्या कामास प्रारंभ

  बेळगाव : शहरातील भातकांडे स्कूल रस्ता दुरुस्तीच्या कामास अखेर बुधवारी प्रारंभ झाला. गेल्या अनेक महिन्यांपासून खड्डे, धुळीचे साम्राज्य आणि वाहतूक कोंडीच्या समस्यांनी त्रस्त झालेल्या या मार्गाला अखेर दिलासा मिळाल्याने व्यापारी, वाहनधारक आणि नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. भातकांडे शाळेसमोरील या रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. व्यापारी व्यवहारांसाठी चारचाकी …

Read More »

मराठी शाळा कंग्राळी खुर्दच्या शताब्दी महोत्सवात 1981-88 बॅचची विक्रमी देणगी

  बेळगाव : मराठी शाळा, कंग्राळी खुर्द (ता. व जि. बेळगाव) शतक महोत्सवी सोहळ्याला माजी विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ३० व ३१ मे रोजी संपन्न झालेला हा सोहळा “न भूतो न भविष्यति” असा अविस्मरणीय ठरला. शाळेच्या 1981 ते 1988 या बॅचमधील सुमारे 53 माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी …

Read More »