गर्दी नियंत्रणासाठी भव्य प्रेक्षक गॅलरी; सुरक्षितता, वाहतूक व्यवस्थेवर प्रशासनाचा भर बेळगाव : गणेशभक्तांच्या उत्साहाचा कळस गाठणाऱ्या ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी बेळगाव महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे. शुक्रवार, २५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या विसर्जन मिरवणुकीत शहरासह परिसरातील हजारो नागरिक सहभागी होणार असल्याने गर्दीचे नियोजन आणि सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे. मिरवणुकीतील …
Read More »कर्मवीरांचे विचार आचरणात आणणे हीच खरी आदरांजली : शिवाजी हसनेकर
बेळगाव : रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी समाजातील सर्वसामान्य, गरीब आणि ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. ‘कमवा आणि शिका’ या विचारातून त्यांनी स्वावलंबन, श्रमप्रतिष्ठा आणि शिक्षण यांचा सुंदर संगम घडवून आणला. आजच्या पिढीने कर्मवीरांचे विचार केवळ ऐकून न घेता ते आपल्या आचरणात आणणे, हीच त्यांना …
Read More »ऊसाला प्रतिटन ५,५०० रुपये दरासाठी २९ सप्टेंबरला राज्यव्यापी आंदोलन
बेळगाव : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, तसेच साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांची कथित फसवणूक होत असल्याच्या निषेधार्थ २९ सप्टेंबर रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी नेते चुनप्पा पूजारी यांनी दिली. ऊसाला प्रतिटन ५,५०० रुपये वैज्ञानिक दर द्यावा आणि इथेनॉल खरेदीचे प्रमाण वाढवावे, …
Read More »‘श्री गणेश २०२६’चा मानकरी प्रवीण मजुकर
ओमकार पाटील ठरला ‘बेस्ट पोझर’; जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद बेळगाव : बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव असोसिएशनतर्फे आयोजित २२ व्या ‘श्री गणेश २०२६’ जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत प्रवीण मजुकर याने उत्कृष्ट कामगिरी करत ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ हा मानाचा किताब पटकावला. उदयोन्मुख शरीरसौष्ठवपटू ओमकार पाटील याने प्रभावी सादरीकरण करत ‘बेस्ट पोझर’चा बहुमान …
Read More »सार्व. गणेशोत्सव मंडळ व येळ्ळूर म. ए. समितीतर्फे आकाश जोगानीचा सत्कार
येळ्ळूर : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ छ. व्यायाम शाळा विराट गल्ली, शिवाजी नगर आणि येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने ‘गणेश श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेत 55 किलो गटात ग्रामीणमध्ये द्वितीय आणि बेळगाव जिल्ह्यात 5 वा क्रमांक पटकावल्याबद्दल कु. आकाश जोगानी याचा सत्कार करण्यात आला. सदर समारंभ येळ्ळूर म. ए. समितीचे अध्यक्ष वामन पाटील, …
Read More »गणेश विसर्जन तयारीची महापौर, उपमहापौर, आयुक्तांकडून पाहणी
तलावांसह मिरवणूक मार्गावरील कामे अंतिम टप्प्यात; अधिकाऱ्यांना वेळेत तयारी पूर्ण करण्याच्या सूचना बेळगाव : प्रतिनिधी गणेशमूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव महानगरपालिका आणि विविध विभागांकडून सुरू असलेल्या अंतिम टप्प्यातील तयारीची महापौर प्रीती कामकर, उपमहापौर हणमंत कोंगाळी आणि पालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी अधिकाऱ्यांच्या पथकासह पाहणी केली. कपिलेश्वर मंदिर परिसरातील जुना व …
Read More »श्री चांगळेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड
बेळगाव : भगतसिंग हायस्कूल आंबेवाडी मैदानात पार पडलेल्या बेळगांव ग्रामीण तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री चांगळेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी 14 वर्षाखालील खो खो स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे तसेच 17 वर्षाखालील मुलींच्या खो-खो संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. वैयक्तिक खेळात शाळेचा विद्यार्थी शयन जोतिबा चौगुले 200 मीटर धावणे मध्ये प्रथम, दुर्वा …
Read More »परदेशातही जपली भारतीय संस्कृती; केनियातील वेस्ट व्हॅली शुगर कंपनीत गणेशोत्सव उत्साहात साजरा
केनिया : भारतीय सण आणि संस्कृतीला सातासमुद्रापार घेऊन जाण्याचा अनोखा उपक्रम केनिया स्थित वेस्ट व्हॅली शुगर कंपनीत पाहायला मिळाला. या कंपनीमध्ये विविध तांत्रिक विभागात कार्यरत असलेल्या भारतीय कर्मचाऱ्यांनी एकत्र येत सालाबादप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला. कंपनीच्या निवासी कॅम्पसमध्ये श्री गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली होती. सात दिवस …
Read More »अनंत चतुर्दशीच्या दिवशी परीक्षा न घेता 28 सप्टेंबरला घेण्याची महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची मागणी
बेळगाव : शिक्षण विभागातर्फे 25 सप्टेंबर 2026 रोजी शुक्रवारपासून सहामाही / मध्यावधी परीक्षा सुरू होणार आहेत. मात्र, 25 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असून याच दिवशी बेळगाव शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात गणपती विसर्जन मिरवणुका काढण्यात येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होण्याची शक्यता लक्षात घेऊन परीक्षेची तारीख बदलण्याची मागणी महाराष्ट्र एकीकरण …
Read More »‘बेळगावचा कैवारी’ मंडपात आज भव्य सामूहिक अथर्वशीर्ष पठण
बेळगाव : गणेशोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात केळकर बाग येथील ‘बेळगावचा कैवारी’ गणरायाच्या मंडपात गुरुवारी (२४ सप्टेंबर) भव्य सामूहिक अथर्वशीर्ष पठण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ठीक ४ वाजता हा भक्तिमय सोहळा होणार असून, गणरायाच्या चरणी सामूहिक अथर्वशीर्ष पठण करण्यासाठी बेळगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta