








ओमकार पाटील ठरला ‘बेस्ट पोझर’; जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
बेळगाव : बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव असोसिएशनतर्फे आयोजित २२ व्या ‘श्री गणेश २०२६’ जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत प्रवीण मजुकर याने उत्कृष्ट कामगिरी करत ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ हा मानाचा किताब पटकावला. उदयोन्मुख शरीरसौष्ठवपटू ओमकार पाटील याने प्रभावी सादरीकरण करत ‘बेस्ट पोझर’चा बहुमान मिळविला.
अनगोळ येथील रामनाथ मंगल कार्यालयात झालेल्या या स्पर्धेत विविध वजनी गटांतील शरीरसौष्ठवपटूंनी सहभाग घेतला. आकर्षक शरीरयष्टी, पोजिंग आणि प्रभावी सादरीकरणाने स्पर्धकांनी उपस्थित क्रीडाप्रेमींची दाद मिळवली.
५५ किलो गटात ऋत्विक लाखे, ६० किलो गटात श्रीहरी बेळगावकर, ६५ किलो गटात विकास शहापूरकर, ७० किलो गटात सुनील भातकांडे, ७५ किलो गटात प्रवीण मजुकर, तर ७५ किलोवरील गटात राहुल कुलाल यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
‘श्री गणेश २०२६’च्या अंतिम फेरीत ऋत्विक लाखे, श्रीहरी बेळगावकर, विकास शहापूरकर, सुनील भातकांडे, प्रवीण मजुकर आणि राहुल कुलाल यांच्यात चुरस पाहायला मिळाली. सर्व स्पर्धकांनी एकापेक्षा एक सरस पोझिंग सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली. अखेर उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर प्रवीण मजुकरने ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’चा किताब आपल्या नावावर केला.
स्पर्धेतील विजेत्यांना बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश पोतदार, श्रीधर शेट्टी, माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल, उद्योजक मिहीर पोतदार, गौतम सामंत, नवीनकुमार, सुहास चांडक, ईश्वर घाडी, विजय तलवार, सचिन उसुलकर, सदानंद शिरोडकर, शेखर नागरडोळेकर, राकेश कलघटगी, ‘मिस्टर इंडिया’ सुनील आपटेकर, किशोर आगा, पुरस्कर्ते सचिन हंगिरगेकर, अमित किल्लेकर, गंगाधर व हेमंत हावळ तसेच आशिया पंच अजित सिद्दण्णावर यांच्या हस्ते रोख पारितोषिके व पदके देऊन गौरविण्यात आले.

अंतिम निकाल
५५ किलो :
१) ऋत्विक लाखे (रॉयल फिटनेस)
२) केतन भातकांडे (रॉ फिटनेस)
३) पांडुरंग पाटील (रुद्रा जिम)
४) रोहित संपले (फ्लेक्स जिम)
५) आकाश जोगणी (मेंनसे फिटनेस)
६० किलो :
१) श्रीहरी बेळगावकर
२) रोहित माळवी (ब्रो नॉट फिट)
३) गणेश सानोलकर (रॉयल फिटनेस)
४) तुकाराम पाटील (ओम फिटनेस)
५) मंजुनाथ कलघटगी (हेक्स जिम)
६५ किलो :
१) विकास शहापूरकर (रॉ फिटनेस)
२) पंकज गुरव (ओम फिटनेस)
३) अक्षय मधुकर (रॉ फिटनेस)
४) इरेश प्रभावळकर (नेक्स्ट फिटनेस)
५) आफताब किल्लेकर (गोल्ड लाईफ)
७० किलो :
१) सुनील भातकांडे (पॉलीहायड्रॉल जिम)
२) विशाल (आयुर जिम)
३) ओम पाटील (गोल्ड जिम)
४) रितिक पाटील (रुद्रा जिम)
५) आकाश साळुंखे (रॉयल फिटनेस)
७५ किलो :
१) प्रवीण मजुकर (एमएलआयआरसी)
२) नागेंद्र मडिवाळ (रुद्रा जिम)
३) गजानन पाटील (ईवाय फिटनेस)
४) पवन सावंत (बोलेरो फिटनेस)
५) बसाप्पा कोणकरी (हिंडलगा क्लब)
७५ किलोवरील :
१) राहुल कुलाल (नेक्स्ट फिटनेस)
२) अमर गुरव (फिटनेस फॉर)
३) गजानन काकतीकर (बाल हनुमान जिम)
४) संगप्पा ए. (रॉयल फिटनेस)
५) ओलीस मेनसे (फ्लेक्स जिम)

Belgaum Varta Belgaum Varta