Sunday , October 4 2026
Breaking News

चव्हाण वाड्यातून गलेफ घालून सरकार घराण्यातील शिळा उरूस साजरा

Spread the love

 

 

निपाणी (वार्त) : कर्नाटक, महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील संत बाबामहाराज चव्हाण प्रस्थापित श्री महान अवलिया हजरत पिराने पीर दस्तगीर साहेब यांचा शिळा उरूस गुरुवारी (ता.२४) पहाटे ३ वाजता पार पडला. त्यानिमित्त येथील चव्हाण वारस बाळासाहेब देसाई सरकार यांच्या चव्हाण वाड्यातून मानाचा गलेफ व गंध दर्गा मंडप मध्ये जाऊन दर्गा श्रीमंत संग्राम देसाई सरकार श्रीमंत रणजित देसाई सरकार श्रीमंत पृथ्वीराज चव्हाण, विवेक मोकाशी, श्रीमंत दादाराजे निपाणकर सरकार, श्रीमंत संताजीराजे घोरपडे नवलीहाळकर सरकार यांच्या प्रमुख उपस्थितीत बाशी उरुस साजरा करण्यात आला. मानकरी उपस्थित होते.
यावेळी चव्हाण वारस, उरूस कमिटी अध्यक्ष बाळासाहेब देसाई -सरकार, रणजित देसाई -सरकार, संग्रामसिंह देसाई सरकार, -पृथ्वीराज चव्हाण, राजूबाबा निपाणकर, संजय माने, विवेक मोकाशी, जयराम मिरजकर, प्रभाकर पठाडे, शरद माळगे, संजय पावले, बंडा गंथडे, संतोष गंथडे, सनी साळुंखे, आतिष सुतार, सचिन पावले, उरुस कमिटीचे पदाधिकारी व सदस्य मानकरी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

ऑक्टोबरमध्ये सण-उत्सवांची पर्वणी

Spread the love  सर्वपित्री अमावास्येपासून नवरात्र, दसरा, कोजागरी, करवा चौथ निपाणी (वार्ता) : ऑक्टोबर महिन्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *