Sunday , October 4 2026
Breaking News

सार्व. गणेशोत्सव मंडळ व येळ्ळूर म. ए. समितीतर्फे आकाश जोगानीचा सत्कार

Spread the love

 

येळ्ळूर : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ छ. व्यायाम शाळा विराट गल्ली, शिवाजी नगर आणि येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने ‘गणेश श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेत 55 किलो गटात ग्रामीणमध्ये द्वितीय आणि बेळगाव जिल्ह्यात 5 वा क्रमांक पटकावल्याबद्दल कु. आकाश जोगानी याचा सत्कार करण्यात आला.
सदर समारंभ येळ्ळूर म. ए. समितीचे अध्यक्ष वामन पाटील, सेक्रेटरी प्रकाश अष्टेकर, कार्याध्यक्ष दुद्दापा बागेवाडी, उपाध्यक्ष राजू पावले, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष नागराज दौलत कुगजी, गणेश अष्टेकर, सतीश कुगजी आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. प्रकाश अष्टेकर यांनी आकाश जोगानीला पुढील वाटचालीस सर्वांच्यावतीने शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी श्रीगणेश मूर्तिची आरती करून हिंदुस्थानाचे आराध्यदैवत छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने समिती नेत्यांचे श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक गणेश अष्टेकर आणि आभार मधु कुगजी यांनी मांडले.
यावेळी सुरज गोरल, प्रकाश पाटील, नेताजी गोरल, कृष्णा शहापूरकर, दौलत पाटील, नंदकुमार पाटील, सतीश देसूरकर, बाळकृष्ण धामणेकर, रामा पाखरे, यलुप्पा पाटील, कृष्णा बिजगरकर, नागेश बोबाटे, मोहन मारुती कुगजी, गोविंद बापूसाहेब पाटील, रमेश पाटील, रविदास धामणेकर, भीमराव पुण्याणावर, बाळकृष्ण पाटील, सौरभ जाधव, ओमकार धामणेकर, शुभम जाधव, गणेश कुगजी, शुभम टक्केकर, मंथन कुगजी, मंथन खादरवाडकर, हणमंत कुगजी, नितीन कुगजी, मुकुंद शिंदे, कुमार मासेकर, सौरभ कुगजी आदि गणेश मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

ई-केवायसीमध्ये बेळगाव जिल्हा राज्यात अव्वल

Spread the love  १७.७१ लाख लाभार्थ्यांची प्रक्रिया पूर्ण; १० ऑक्टोबरपर्यंत उर्वरित ४.७३ लाख जणांचे ई-केवायसी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *