Monday , October 5 2026
Breaking News

ऊसाला प्रतिटन ५,५०० रुपये दरासाठी २९ सप्टेंबरला राज्यव्यापी आंदोलन

Spread the love

 

बेळगाव : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, तसेच साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांची कथित फसवणूक होत असल्याच्या निषेधार्थ २९ सप्टेंबर रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी नेते चुनप्पा पूजारी यांनी दिली.

ऊसाला प्रतिटन ५,५०० रुपये वैज्ञानिक दर द्यावा आणि इथेनॉल खरेदीचे प्रमाण वाढवावे, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शशिकांत गुरुजी, माजी खासदार राजू शेट्टी, किशन नंदी यांच्यासह राज्यातील ३१ जिल्ह्यांतील शेतकरी नेत्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार असल्याचे पूजारी यांनी सांगितले. ऊसाची आधारभूत किंमत वाढवून प्रतिटन ५,५०० रुपये दर निश्चित करावा, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, श्रीमंत पाटील यांच्या मालकीच्या कारखान्यांसह बैलहोंगल आणि बागलकोट परिसरातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची थकीत देणी तातडीने अदा करावीत. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पूजारी यांनी मुख्यमंत्री आणि साखर मंत्र्यांना दिला.

माजी खासदार राजू शेट्टी यांनीही साखरेच्या दराचा मुद्दा उपस्थित केला. गेल्या नऊ वर्षांत साखरेचे दर वाढले नसताना सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आवाज का उठवला नाही, असा सवाल त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास एकही साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

About Belgaum Varta

Check Also

आयएमएच्या बेळगाव शाखाध्यक्षपदी डॉ. सविता कद्दू, सचिव पदी डॉ. माधव प्रभू

Spread the love  बेळगाव : इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) च्या बेळगाव शाखेच्या नूतन अध्यक्षपदी डॉ. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *