Monday , October 5 2026
Breaking News

कर्मवीरांचे विचार आचरणात आणणे हीच खरी आदरांजली : शिवाजी हसनेकर

Spread the love

 

बेळगाव : रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी समाजातील सर्वसामान्य, गरीब आणि ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. ‘कमवा आणि शिका’ या विचारातून त्यांनी स्वावलंबन, श्रमप्रतिष्ठा आणि शिक्षण यांचा सुंदर संगम घडवून आणला. आजच्या पिढीने कर्मवीरांचे विचार केवळ ऐकून न घेता ते आपल्या आचरणात आणणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष शिवाजी हसनेकर यांनी केले.

गोजगे (ता. बेळगाव) येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूलमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून हसनेकर बोलत होते.

विद्यालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष शिवाजीराव येळगे होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक जे. बी. मुतगेकर यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. तसेच उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. श्रीमती एन. पी. हुंदरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

शिवाजीराव येळगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तर शिवाजी हसनेकर यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी जे. डी. बिर्जे यांनी समयोचित मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास शाळा सुधारणा समितीचे उपाध्यक्ष खाचू चलवेटकर, कृष्णा कणबरकर, कलाप्पा बामणे, भावकू बामणे, एस. आर. पाटील, यू. एम. जाधव, एस. वाय. मुतगेकर, ए. बी. बामणे, आर. एस. चिकलमठ आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती एस. एल. कंग्राळकर यांनी केले, तर श्रीमती एस. वाय. खण्णूकर यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

आयएमएच्या बेळगाव शाखाध्यक्षपदी डॉ. सविता कद्दू, सचिव पदी डॉ. माधव प्रभू

Spread the love  बेळगाव : इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) च्या बेळगाव शाखेच्या नूतन अध्यक्षपदी डॉ. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *