Tuesday , July 28 2026
Breaking News

बेळगाव

पीएसआय, डीवायएसपी यांची नावे लिहून व्यक्तीची आत्महत्या

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील बेंडीगेरी गावात एका व्यक्तीने पीएसआय, डीवायएसपीसह काही जणांची नावे पत्रात नमूद करून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मृताची ओळख रवींद्र दानव्वगोळ अशी झाली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात आपणास जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने हा टोकाचा निर्णय घेत असल्याचे त्यांनी नमूद केल्याचे …

Read More »

व्हॅक्सिन डेपो प्लास्टिक मुक्त करण्याचा प्रयत्न

  बेळगाव : समर्थ भारत प्रतिष्ठान च्या वतीने सुभाष चंद्र नगरचे रहिवासी आणि उद्योजक आप्पासाहेब गुरव आणि सुरज नेतलकर यांनी आज सकाळी वॅक्सीन डेपो परिसर प्लास्टिक मुक्त करण्याचा प्रयत्न केला. त्या भागात पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या व इतर विखुरलेले साहित्य पाहून आप्पासाहेब गुरव व नेतलकर यांनी ते जमा करण्याचा प्रयत्न …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आंदोलनांना शिवसेना (उबाठा)चा जाहीर पाठिंबा

  बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिकांच्या प्रश्नांवर सुरू असलेल्या आंदोलनाला आता राजकीय पाठबळ मिळू लागले असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आंदोलनांना संपूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र एकीकरण समितीने कन्नड भाषा फलक सक्तीविरोधात २२ जून रोजी बेळगाव …

Read More »

माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री स्व. सुरेश अंगडी यांच्या जयंतीनिमित्त श्री गणेश मंदिरात विशेष प्रार्थना

  बेळगाव : माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री, साधेपणा, विनम्रता आणि जनसामान्यांशी कायम नाळ जपणारे लोकप्रिय नेते स्वर्गीय सुरेश अंगडी यांच्या जयंतीनिमित्त आज बेळगावातील कित्तूर राणी चन्नम्मा चौक येथील श्री गणेश मंदिरात विशेष प्रार्थना करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्व. सुरेश अंगडी यांच्या कार्याचा गौरवपूर्ण स्मरण करत कर्नाटकाच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा …

Read More »

शिवजयंती चित्ररथ स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याला शिवरत्न शेटे यांचे प्रेरणादायी व्याख्यान

  बेळगाव : बेळगाव शहर व उपनगरांमध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होणारा शिवजयंती उत्सव हा आज एक भव्य लोकोत्सव बनला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा, पराक्रमाचा आणि राष्ट्रनिर्मितीच्या कार्याचा जागर करणाऱ्या या उत्सवामध्ये विविध मंडळांकडून साकारण्यात येणारे चित्ररथ आणि ऐतिहासिक देखावे हे विशेष आकर्षण ठरतात. शिवचरित्रातील प्रसंग, स्वराज्याचा …

Read More »

‘युवा द चेंज मेकर’ उपक्रमाची यशस्वी सांगता

  बेळगाव : संस्कृती एज्युकेअरतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘युवा द चेंज मेकर’ या युवक विकास उपक्रमाची नुकतीच यशस्वी सांगता झाली. युवकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांना कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक तसेच व्यक्तिमत्त्व विकासाशी संबंधित विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. आजच्या बदलत्या आणि स्पर्धात्मक युगात युवकांचा …

Read More »

‘सरकारी वाढदिवस’चा जल्लोष; १ जूनला शुभेच्छांचा सोशल मीडियावर वर्षाव

    बेळगाव : वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा आणि विशेष दिवस मानला जातो. मात्र पूर्वी जन्मनोंदीची व्यवस्था सर्वत्र उपलब्ध नसल्याने अनेकांची जन्मतारीख शाळेत प्रवेश घेताना शिक्षकांनी ठरविलेली असायची. त्यातूनच ‘१ जून’ ही जन्मतारीख हजारो जणांच्या अधिकृत नोंदीत आली आणि कालांतराने तीच त्यांची ओळख व वाढदिवस ठरली. रविवार, १ जून …

Read More »

कर्तव्य ॲपच्या फेस रिडिंगमुळे शिक्षकांची वाढली डोकेदुखी

  बेळगाव : शिक्षण विभागाने शिक्षकांची उपस्थिती अधिक पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने नोंदविण्यासाठी सुरू केलेल्या कर्तव्य (सीएएमएस) ॲपमुळे शिक्षकांच्या अडचणी वाढल्या आहेत. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून फेस रिडिंगद्वारे ऑनलाइन उपस्थिती नोंदविणे बंधनकारक करण्यात आल्याने शाळेच्या पहिल्याच दिवशी अनेक शिक्षक मोबाईलवर हजेरी नोंदविण्यात गुंतलेले दिसून आले. मात्र, ॲपमधील तांत्रिक त्रुटी, सर्व्हरची …

Read More »

पावसाची दडी; पेरणीच्या तोंडावर शेतकरी चिंताग्रस्त

  बेळगाव : मान्सूनपूर्व पावसाने यंदा अपेक्षित साथ न दिल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. सोमवारी दिवसभर पावसाची शक्यता निर्माण होऊनही अखेर पावसाने हुलकावणी दिल्याने बळीराजाची चिंता अधिकच वाढली आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून सर्वांनाच आता मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. सोमवारी सकाळपासून कडक उन्हाचा तडाखा जाणवत …

Read More »

शारदा विद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षाला उत्साहात प्रारंभ

  बेळगाव : शाहापूर येथील शारदा विद्यालय (इंग्रजी माध्यम) येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ला १ जूनपासून उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्टीनंतर विद्यार्थ्यांच्या आगमनाने शाळा परिसर पुन्हा एकदा गजबजून गेला. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आनंद पाहायला मिळाला. वर्षारंभानिमित्त शाळेत सरस्वती पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात …

Read More »