







बेळगाव : शहरातील किल्ला तलावाच्या विकासकामांना गती देण्याचे निर्देश महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी दिले. गुरुवारी त्यांनी किल्ला तलाव परिसराला भेट देऊन अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली.
यावेळी आयुक्तांनी तलाव व परिसरात सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच उपस्थित अभियंत्यांकडून कामांची सविस्तर माहिती जाणून घेत आवश्यक सूचना केल्या.
अमृत योजनेच्या मंजूर आराखड्यानुसार आणि निर्धारित वेळापत्रकानुसार सर्व कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत. कामांमध्ये कोणत्याही प्रकारचा विलंब होऊ नये, यासाठी कामांना अधिक गती देण्याच्या सूचना आयुक्त कार्तिक एम. यांनी संबंधित अधिकारी व कंत्राटदारांना दिल्या.
यावेळी महापालिकेच्या अभियंता लक्ष्मी निपाणीकर, अनूप, अमृत योजनेचे अभियंते, कंत्राटदार, विवेक मठद यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta