Sunday , September 20 2026
Breaking News

रयत गल्लीत घरगुती गणेश देखाव्यांची पर्वणी

Spread the love

 

विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक विषयांचे देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

बेळगाव : दरवर्षीप्रमाणे यंदाही वडगाव येथील रयत गल्लीमध्ये घरगुती श्री गणेशोत्सवानिमित्त विविध आकर्षक देखावे साकारण्यात आले आहेत. गल्लीतील हौशी युवकांनी कल्पकतेने सादर केलेले धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवरील देखावे भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

यंदा रोहित सप्ले यांनी सुंदर कारंज्याचा देखावा साकारला आहे. आनंद होसुरकर यांनी संत सावता माळी, विनायक तारिहाळकर यांनी बेळगावमधील प्रसिद्ध कपिलेश्वर मंदिर, जतिन बिर्जे यांनी श्रीकृष्णलीला, तर गजानन तारिहाळकर यांनी विकासाच्या नावाखाली होणाऱ्या बेकायदा भूसंपादनाचा विषय देखाव्यातून मांडला आहे.

ज्ञानेश्वर तारिहाळकर यांनी श्री जगन्नाथ रथयात्रा, प्रशांत काजोळकर यांनी कुंभार शाळा, गोविंद मठकर यांनी आदिवासी वसाहत, अमित काजोळकर यांनी पंढरपूरची वारी, तर तानाजी हालगेकर यांनी धर्मवीर संभाजी महाराजांचा देखावा साकारला आहे. याशिवाय अनेक घरांमध्येही विविध विषयांवरील देखावे उभारण्यात आले आहेत.

हे देखावे पाहण्यासाठी बेळगावसह कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र तसेच इतर राज्यांतून भाविक येत आहेत. गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवसापासूनच लहान मुले आणि भाविकांची मोठी गर्दी होत असून, पुढील दिवसांत गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन युवक मंडळाने आवश्यक दक्षता घेतली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *