Monday , December 15 2025
Breaking News

बेळगाव

छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५१ वा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

  बेळगाव : बेळगाव येथे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५१ वा शिवराज्याभिषेक दिन गुरुवार दिनांक ६ जून रोजी छत्रपती शिवाजी उद्यान शहापूर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सुरुवातीला मध्यवर्ती श्री शिवजयंती उत्सव मंडळाचे प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विधिवत …

Read More »

लाख मोलाची मते हजारांवर…

  (१) कालच जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता समिती उमेदवाराला पडलेली मते ही चिंताजनक आहेत. आजपर्यंत महाराष्ट्र एकीकरण समितीने अनेक निवडणुका लढविल्या पण यावेळी समिती उमेदवाराला पडलेली मते पाहता चिंतेचा विषय आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती निवडणुका लढवते तो लढ्याचा एक भाग म्हणून. समितीच्या राजकारणाला एक वैभवशाली इतिहास आहे. एक काळ असा …

Read More »

विमल फाउंडेशनच्यावतीने वृक्षारोपण

  बेळगाव : पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भाजप नेते आणि विमल फाउंडेशन या सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किरण जाधव यांनी परिसरात वृक्षारोपण करून ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश दिला. जीवनात प्रत्येकाने एक तरी रोपटे लावून ते जगावावे. पर्यावरण ढासळत चालले असून समतोल राखण्यासाठी संघ-संस्थानी किमान आपापल्या भागात झाडे लावावीत आणि …

Read More »

वाढदिवसाच्या निमित्ताने पार्टीला बोलावून मित्राचा खून

  बेळगाव : वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने मित्राला घरी बोलावून त्याचा निर्घृणपणे खून केल्याची घटना यरगट्टी तालुक्यातील नुगानट्टी गावामध्ये घडली आहे. सदर घटना मंगळवारी घडली असून या खूनाचा उलगडा बुधवारी सकाळी झाला. मृत युवकाचे नाव बसवराज गुरुलिंगप्पा मुद्दण्णवर (वय 23) असे आहे. वैयक्तिक भांडणांमधून हे कारस्थान करण्यात आल्याची माहिती देण्यात …

Read More »

मराठा इन्फन्ट्रीमध्ये अग्निवीर जवानांचा दीक्षांत समारोह

  बेळगाव : मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटरमधून अग्निवीर जवानांची तिसरी तुकडी देशसेवेसाठी सज्ज झाली असून आज अग्निवीर जवानांचा दीक्षांत समारंभ उत्साहात पार पडला. ३१ आठवड्यांच्या प्रशिक्षणानंतर बेळगावमधील मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटरमधून ५६० अग्निवीर प्रशिक्षणार्थींना देशसेवेची शपथ देण्यात आली. यावेळी दीक्षांत संचलन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ब्रिगेडियर जॉयदीप …

Read More »

श्री सद्गुरु सदानंद महाराज पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांना सुरुवात

  बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्थान राजहंस गल्ली, अनगोळ यांच्यातर्फे श्री सद्गुरु सदानंद महाराज यांच्या 93 व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त उद्या बुधवार दि. 5 ते शुक्रवार दि. 7 जून 2024 या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. श्री सद्गुरु सदानंद महाराज …

Read More »

मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्यावतीने ३५०वा शिवराज्याभिषेक दिन गुरुवारी

  बेळगाव : स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५०वा शिवराज्याभिषेक दिन गुरुवार दि. ६ जून २०२४ रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त छत्रपती शिवाजी उद्यान शहापूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विधीवत पूजा करून आरती करण्यात येणार आहे तरी सर्व शिवभक्तांनी सकाळी ठीक ९ वाजता छत्रपती शिवाजी उद्यानात उपस्थित राहावे, …

Read More »

बेळगाव लोकसभा मतदारसंघ निहाय उमेदवारांना पडलेली मते!

  बेळगाव : लोकसभा मतदारसंघाचा निकाल आज जाहीर झाला. एकूण 21 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी पार पडली. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी सुरवातीपासूनच आघाडी राखत विजय संपादन केला आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघात एकूण 13,75,285 इतके मतदान झाले होते. त्यापैकी जगदीश शेट्टर यांना 7,56,471 मते मिळाली तर काँग्रेस उमेदवार मृणाल …

Read More »

बेळगावमधून जगदीश शेट्टर, उत्तर कन्नडमधून विश्वेश्वर हेगडे- कागेरी तर चिक्कोडीमधून प्रियंका जारकीहोळी विजयी

  बेळगाव : संपूर्ण कर्नाटकाचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव, चिक्कोडी आणि कारवार लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला असून बेळगावमधून भाजपचे जगदीश शेट्टर, चिक्कोडीतून काँग्रेसच्या प्रियांका जारकीहोळी तर उत्तर कन्नड मतदारसंघातून भाजपचे विश्वेश्वर हेगडे कागेरी निवडून आले आहेत. बेळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जगदीश शेट्टर 173730 मतांनी विजयी झाले. चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून मोठा …

Read More »

बेळगाव ग्रामीण मतदारसंघात जगदीश शेट्टर यांची आघाडी

  बेळगाव : लोकसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या बेळगाव लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांनी आपली पकड मजबूत केली आहे. सुरवातीला आयात केलेला उमेदवार म्हणून शेट्टर यांना कार्यकर्त्यांसह मतदारांच्या नाराजीला सामोरे जावे लागले होते परंतु त्यांनी 1 लाख 77 हजारांचे मताधिक्य घेत विजय मिळवला. …

Read More »