Wednesday , December 17 2025
Breaking News

बेळगाव

जायंटस ग्रुप ऑफ बेळगाव आयोजित जागतिक तंबाखू विरोधी दिन

    बेळगाव : दरवर्षी जागतिक तंबाखू विरोधी दिनासाठी नवीन घोषवाक्य ठेवली जातात. 2024 चे घोषवाक्य म्हणजे “तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून मुलांचे संरक्षण करणे जेणे करून भावी पिढ्यांचे संरक्षण केले जाऊ शकते” या राष्ट्रीय हेतूचा उद्देश साधून जायंटस ग्रुप ऑफ बेळगाव (मेन) व शहापूर येथील गोवावेस स्थित न्यू गर्ल्स हायस्कूलच्या सहकार्यातून …

Read More »

महांतेश नगर येथील विकासकामाला प्रारंभ

  बेळगाव : महांतेश नगर भागात पावसाळ्यात रस्त्यांवर तुंबणारे पाणी आणि पिण्याच्या समस्यांशी संबंधित समस्यांवर तोडगा काढण्यासाठी बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार असिफ सेठ यांनी अलीकडेच सर्वे केला होता. यानंतर या भागातील समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. यानुसार आज आमदारांच्या अनुपस्थितीत आमदारांचा मुलगा अमन सेठ यांनी स्थानिक नगरसेवक आणि …

Read More »

बेळगाव – गोकाक बसचा खनगावजवळ अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील खनगाव के.एच. गावाजवळ बेळगाव-गोकाक बसला झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. सुळेभावी गावातील दुचाकीस्वार विठ्ठल दत्ता लोकरे (२९) याचा मृत्यू झाला. दुचाकीला धडकलेली बस काही अंतरावर जाऊन शेतात पलटी झाली. बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले. बस बेळगावहून गोकाककडे जात होती. समोरून येणाऱ्या एका दुचाकीने …

Read More »

बैलहोंगल तालुक्यात पावसाचा जोर; जनजीवन विस्कळीत

  बैलहोंगल : बैलहोंगल शहरात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे रायण्णा सर्कलमधील रस्त्यावर पाणीच पाणी झाले, त्यामुळे काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली. शुक्रवारीही पाऊस सुरूच राहिल्याने रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाल्याने वाहनधारक बऱ्याच ठिकाणी अडकून पडले. काही काळ वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती. पाणी गुडघ्यापर्यंत आल्याने दुकानदारांनी पाणी बाहेर काढण्यासाठी धडपड …

Read More »

मराठा समाजातील दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना आवाहन

  बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे बेळगाव व खानापूर तालुक्यातील मराठा समाजातील यंदाच्या दहावी व बारावी परीक्षेत 90 टक्के गुण घेतलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. जे विद्यार्थी पात्र आहेत त्यानी गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत, एक आयडेटिटी कार्डं फोटो, पूर्ण पता व व्हाट्स अप नंबरसह मराठा समाज सुधारणा मंडळाच्या …

Read More »

मच्छे येथे शिवराज्याभिषेक दिन विविध उपक्रमांनी साजरा

  बेळगाव : मच्छे (तालुका बेळगाव) येथे शिवराज्याभिषेक दिन विविध उपक्रमाद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या महिलांच्या हस्ते करण्यात आले. गावच्या विकासासाठी झटणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. गावच्या स्मशानभूमीमध्ये संपूर्ण स्वच्छता करून पाण्याची सोय, वृक्षारोपण व सुंदर बाग …

Read More »

अपघात घडवून केला खून; पाच जणांना अटक

  बेळगाव : खुन करण्याच्या उद्देशाने रस्त्याने पायी जाणाऱ्या बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमधील चीफ डेप्युटी फार्मासिस्ट वीरुपाक्षप्पा हर्लापूर यांचा कारने धडक देऊन ठार केल्याच्या गुन्ह्याचा छडा बेळगाव शहर रहदारी आणि एपीएमसी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी लावला असून खुनाच्या गुन्ह्याखाली 5 जणांना अटक केली आहे. गदग जिल्ह्यातील बेटगेरी येथील रहिवासी असलेल्या सुरेश हर्लापूर …

Read More »

बेळगुंदी येथील हुतात्म्यांना भावपूर्ण अभिवादन!

  बेळगाव : 1986 मध्ये झालेल्या कन्नड सक्ती आंदोलनप्रसंगी पोलिसांच्या गोळीबारात 6 जून रोजी बेळगुंदी येथील मारुती गावडा, भावकु चव्हाण व कल्लाप्पा उचगावकर या तिघा तरुणांनी हौतात्म्य पत्करले होते. सालाबादप्रमाणे बेळगुंदीवासीय आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी संयुक्तिकरित्या अभिवादन केले. बेळगुंदी येथील हुतात्मा स्मारकाला पुष्पहार अर्पण करून दोन मिनिटे मौन पाळून अभिवादन …

Read More »

होनगाजवळील मार्कंडेय नदीपात्रात कचऱ्याचे साम्राज्य

  बेळगाव : होनगाजवळील मार्कंडेय नदी परिसरात विविध देवी देवतांचे फोटो, निर्माल्य, वैद्यकीय कचरा, प्लास्टिक बाटल्या तसेच इतर कचरा व जादूटोणा करण्यासाठी वापरण्यात येणारे नारळ, लिंबू आदी वस्तू नदीपात्रात टाकल्यामुळे नदीपात्राला गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे जवळच असलेल्या वाहन सर्व्हिसिंग सेंटरचे साबणमिश्रित पाणी नदीपात्रात सोडल्यामुळे नदीचे पाणी दूषित बनत …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५१ वा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

  बेळगाव : बेळगाव येथे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५१ वा शिवराज्याभिषेक दिन गुरुवार दिनांक ६ जून रोजी छत्रपती शिवाजी उद्यान शहापूर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सुरुवातीला मध्यवर्ती श्री शिवजयंती उत्सव मंडळाचे प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विधिवत …

Read More »