Sunday , September 20 2026
Breaking News

श्री आधार मल्टी-पर्पज सौहार्द सह. संघाला 16.48 लाखाचा नफा

Spread the love

 

बेळगाव : श्री आधार मल्टी-पर्पज सौहार्द सहकारी संघ नियमित, महाद्वार रोड बेळगाव या संस्थेला गेल्या आर्थिक वर्षात 16 लाख 48 हजाराचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती अध्यक्ष श्री. सुभाष देसाई यांनी दिली.

संस्थेची चौदावी वार्षिक सर्वसाधारण सभा दि.04/09/2024 रोजी श्री. सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या कार्यालयात खेळीमेळीत पार पडली.
प्रथम गेल्या वर्षभरात राज्यातील व देशातील काही महनीय व्यक्तीचे तसेच संस्थेचे काही सभासद यांचे निधन झाले त्याना श्रद्धांजली वाहण्यात आली.
श्री. सुभाष देसाई यांनी स. न. 2023-24 च्या अहवालाचे वाचन केले. संस्थेचे एकूण सभासद 654 असून भागभांडवल रु.23,76,200/-, राखीव निधी रु.1,32,95,249/- आहे. संस्थेमध्ये रु.4 कोटी 90 लाखाच्या ठेवी असून संस्थेने रु.4,22,77,320/- कर्जे दिली आहेत. विविध बँकांमध्ये रुपये 2 कोटी ची गुंतवणूक केलेली आहे, असे त्यांनी सांगितले.
सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये रु. 16,48,000/- नफा झाला असून सभासदांना15% लाभांश मंजूर करण्यात आला.
संस्थेचे व्यवस्थापक श्री. कल्लाप्पा संकन्नावर यांनी मागील वर्षाच्या सभेच्या कामकाजाचे वाचन तसेच ताळेबंद, नफा-तोटा पत्रक, नफ्याची विभागणी व अंदाज पत्रकाचे वाचन केले.
सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.
यावेळी संस्थेचे संस्थापक संचालक श्री. अनंत लाड, श्री. प्रदीप अष्टेकर व संचालक श्री. सुनील चौगुले, यांनी चर्चेत भाग घेतला. तसेच संचालक श्री. अनंत पाटील, श्री. भोमाणी बिर्जे श्री. आनंद बाचूळकर, श्री. विकास मजूकर, श्री. महादेव ठोकणेकर, श्री. बाळकृष्ण दंडगलकर, श्री. अशोक अमरगोळ, श्रीमती. कल्पना मोहिते व सौ. पूजा गुरव या संचालकांसह सोसायटीचे कर्मचारी पिग्मी कलेक्टर्स व इतर सभासद उपस्थित होते. उपाध्यक्ष
श्री. बाळासाहेब चोपडे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *