Saturday , June 6 2026
Breaking News

शिल्पकार जयदीप आपटेला कल्याणमधून अटक

Spread the love

 

कल्याण : सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची उभारलेली मूर्ती कोसळल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली होती. या दुर्घटनेनंतर फरार असलेला प्रमुख आरोपी शिल्पकार जयदीप आपटेला रात्री कल्याणमधून अटक केली आहे. जयदीप आपटे हा अंधाराचा फायदा घेत पोलिसांची नजर चुकवत आपल्या पत्नी आणि आईला भेटण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. आता याप्रकरणी आणखी एक अपडेट समोर आली आहे. जयदीप आपटे हा सापडला असला तरी आता त्याचे कुटुंब गायब झाले आहे.
जयदीप आपटे याच्या घराला पुन्हा टाळे लावले आहे. त्यामुळे जयदीप आपटेच्या अटकेनंतर आता कुटुंब गायब झाल्याचे पाहायला मिळत आहे. जयदीप आपटेला अटक झाल्याची माहिती त्याच्या कुटुंबाला मिळाली होती. यानंतर पहाटे चारच्या सुमारास आपटे कुटुंब घराला टाळा लावून पुन्हा गायब झाले आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयदीप आपटे यांचे कुटुंब सध्या सिंधुदुर्ग येथे असल्याचे बोलले जात आहे. त्याचे कुटुंबिय न्यायालयीन लढाई लढण्यासाठी वकिलांशी चर्चा करत आहेत. आज जयदीप आपटे याला सिंधुदुर्ग न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यासाठी ते सिंधुदुर्ग येथे गेल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

About Belgaum Varta

Check Also

भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये एसआयटी समोर नोंदवला जबाब

Spread the love  नाशिक – भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे वादात अडकलेल्या रूपाली चाकणकर यांची नाशिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *