Friday , September 13 2024
Breaking News

चंदगड तालुका विश्वकर्मा कामगार युनियनची बैठक संपन्न

Spread the love

 

चंदगड : चंदगड तालुका विश्वकर्मा कामगार युनियनच्या वतीने आज बैठक तांबुळवाडी कार्यालयामध्ये संपन्न झाली. बैठकीमध्ये तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली. तसेच संघटित- असंघटित कामगारांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. चंदगड तालुका कार्याध्यक्ष मा. जॉनी फर्नांडिस, सचिवपदी मा. आनंद पाटील, खजिनदार पदी मा. वैजनाथ कांबळे व उपाध्यक्षपदी मा. दीपक पवार यांची निवड करण्यात आली। त्याचबरोबर तालुका कमिटी सदस्य यांची निवड करण्यात आली. या निवडी प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे संघटक मा. विजय राजिगरे उपस्थित होते.
नोंदीत बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस दहा हजार मिळावा, शिष्यवृत्तीचे स्लॉट त्वरित ओपन करावे, घरकुलसाठी तीन वर्षाची नोंदणीचे आठ शिथिल करावी, नोंदीत कामगारांचे साठ वर्षा पूर्ण झालेल्या कामगारांना दरमहा पाच हजार रुपये पेन्शन चालू करावी, बांधकाम कामगारांची हक्काची मेडिकल योजना चालू करावी. या व इतर मागणीसाठी भविष्यात आपल्याला संघर्ष करावा लागेल व चालू असलेल्या सर्व योजनेचा लाभ प्रत्येक वंचित बांधकाम कामगारापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सर्वांनी करावे, अशी या बैठकीमध्ये चर्चा झाली.
या बैठकीस तालुका कमिटी सदस्य अनिल गावडे, भावकु जाधव, सोमनाथ मंडलिक, मनोहर गावडे, शाहू भोसले, सागर चिखलकर, मारयान फर्नांडिस, परशराम नागरदळेकर, संजय कांबळे, कृष्णात नाईक, पुनम गोरल, रेखा तरवाळ, माधुरी पाटील, पुष्पा नाईक, अश्विनी कांबळे, रोहिणी पाटील, कार्यालयातील सदस्य रेश्मा दळवी, दिपाली शिरगावकर, सविता बुरुड, सागर कांबळे इतर सभासद उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

शिक्षक समाज घडवतात : राघवेंद्र इनामदार यांना मराठी प्रेरणा पुरस्काराने सन्मानित

Spread the love  चंदगड : “शिक्षक समाज घडवतात, मुलांवर संस्कार करून चारित्र्यवान पिढी तयार करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *