बेळगाव : लोकशाहीचा सण असलेली निवडणूक शांततेत पार पडली असून चिक्कोडी लोकसभा मतदारसंघ 78.51 टक्के तर बेळगाव लोकसभा मतदारसंघ 71.38 टक्के तसेच बेळगाव जिल्ह्यातील खानापूर विधानसभा मतदारसंघात 73.87 टक्के आणि कॅनरा लोकसभा मतदारसंघातील कित्तूर विधानसभा मतदारसंघात 73.87 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. एकूण गतवेळच्या तुलनेत …
Read More »सिद्धरामय्या, परमेश्वर यांची सीडी बाहेर आल्यास आश्चर्य वाटणार नाही : माजी मंत्री आ. रमेश जारकीहोळी
गोकाक : प्रज्वल रेवण्णा प्रकरण ही कोणाला अभिमान वाटेल अशी गोष्ट नाही. हे प्रकरण अत्यंत वाईट असल्याची नाराजी माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी व्यक्त केली आहे. स्थानिक आमदार रमेश जारकीहोळी यांनी मतदान केंद्रावर जाण्यापूर्वी गोकाक येथील लक्ष्मीदेवी मंदिरात पूजा केल्यानंतर मतदान केले. त्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना आमदार रमेश जारकीहोळी …
Read More »एस. आर. मोरे यांचा नागरी सन्मान
बिजगर्णी : येथील पश्चिम विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष एस. आर. मोरे यांच्या ८१ व्या यशस्वी कारकीर्दबद्दल नागरी सत्कार सोहळा आयोजन समिती बिजगर्णी -कावळेवाडी यांच्यावतीने १५ मे रोजी बिजगर्णी हायस्कूल येथे सकाळी दहा वाजता नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला अध्यक्ष गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी (माजी आमदार), मालोजीराव अष्टेकर …
Read More »बेळगाव मतदारसंघात ४०.७८ तर चिक्कोडी मतदारसंघात ४५.६९ टक्के मतदान
बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज मंगळवारी सकाळी ७ वाजता बेळगावसह राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये प्रारंभ झाला असून दुपारी १ वाजेपर्यंत बेळगाव लोकसभा मतदारसंघात ४०.७८ तर चिक्कोडी मतदारसंघात ४५.६९ मतदान झाले. बेळगाव जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आज सकाळी सर्वप्रथम मतदानाचा हक्क बजावला. विश्वेश्वरय्यानगर येथील …
Read More »बेळगावात २४.०२ तर चिक्कोडीत २७.२३ टक्के मतदान
बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत २४.०२ टक्के तर चिक्कोडीत २७.२३ टक्के मतदान झाले आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघातील बेळगाव शहर परिसरात विविध ठिकाणी मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी मतदानाला सुरुवात केली आहे. मतदारांनी मतदानासाठी सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला आहे. वाढत्या उन्हामुळे वयोवृद्ध तसेच महिलांना मतदान केंद्राकडे जाण्यास त्रास …
Read More »“त्या” बँकेचा जनरल मॅनेजर सुद्धा विकृत मनोवृत्तीचा!
गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने “त्या” तथाकथित बँकेच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे वाचली. आत्ता आणखीन एक किळसवाणा प्रकार सध्या चर्चिला जात आहे. मुळात बेकायदेशीरपणे निवड केलेला हा जनरल मॅनेजर अध्यक्षांच्या नात्यातला आहे. आणि या नात्यातील माणसाला नोकरी बहाल करण्यासाठी त्यांनी आधीच्या मॅनेजरला त्रास देवून राजीनामा देण्यास भाग पाडले. अध्यक्ष आणि या …
Read More »फेसबुक फ्रेंड्स सर्कलतर्फे गोशाळेला पशुखाद्याचे वितरण
बेळगाव : बेळगावच्या फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या वतीने आज शिवापूर येथील मुप्पीन काडसिद्धेश्वर स्वामी मठाच्या गोशाळेला पशुखाद्याचे वितरण करण्यात आले. अतिउष्णतेमुळे जनावरांसाठी पाणी आणि अन्नाची टंचाई निर्माण झाली असून कूपनलिका आणि विहिरींच्या पाण्यानेही तळ गाठला आहे. अशावेळी मूक जनावरांच्या पाण्याचा आणि अन्नाचा तुटवडा भासत असून या पार्श्वभूमीवर बेळगावच्या फेसबुक फ्रेंड्स …
Read More »मतदानासाठी ४ हजार ५२४ मतदान केंद्रे सज्ज
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची ईव्हीएम मशीन व साधनसामग्री वितरण केंद्राला भेट बेळगाव : कर्नाटक राज्यातील उत्तर कर्नाटकातील १४ जिल्ह्यात उद्या मंगळवारी मतदान होत आहे. यामध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत बेळगाव व चिक्कोडी लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवार, दि. ७ मे रोजी मतदान होणार आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहा या …
Read More »पायोनियर बँकेतर्फे बुधवारी ज्येष्ठ सभासदांचा गौरव
बेळगाव : 118 वर्षाची परंपरा असलेल्या येथील पायोनियर अर्बन बँकेच्या सभासदांचा गौरव समारंभ बुधवार दि. 8 मे रोजी संपन्न होत आहे. बँकेच्या ज्या सभासदांचे वय 75 वर्षे झाले आहे आणि ज्यांनी बँकेकडे आपली नावे नोंदवली आहेत अशा सुमारे 80 सभासदांना या कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे. कलमठ रोड येथील बँकेच्या …
Read More »सागर बी. एड. महाविद्यालयातर्फे शहरात मतदान जनजागृतीपर प्रभातफेरी
बेळगाव : सागर शिक्षण महाविद्यालयाच्यावतीने (बी. एड.) नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले. प्राचार्य राजू हळब यांच्या हस्ते धर्मवीर संभाजी चौकात प्रभातफेरीचे उदघाटन कऱण्यात आले. त्यानंतर किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, मारुती गल्ली, गणपत गल्ली, खडेबाझार, शनिवार खुट मार्गे कित्तूर चन्नम्मा चौकात सागर बी.एडच्या प्रशिक्षणार्थींनी फेरीचा समारोप केला. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta