बेळगाव : मराठा समाजाने लग्नाचा मुहूर्त साधण्याचा प्रयत्न करत वेळेत लग्न लावावे. त्याचप्रमाणे हल्ली दोन दोन वेळा अक्षतारोपण करण्याची नवी प्रथा मराठा समाजामध्ये पडली आहे. त्यामुळे मराठा समाजाबद्दल चुकीचा संदेश इतर समाजात पसरत आहे. मुहूर्तावर आणि एकदाच वधू-वरांचे लग्न लावण्याची जबाबदारी वधूवरांच्या पालकांनी घ्यावी, असे मत मराठा समाजाचे अध्यक्ष …
Read More »बस खाली सापडून वृद्ध महिला जागीच ठार; चन्नम्मा सर्कल जवळील घटना
बेळगाव : रस्ता ओलांडताना परिवहन मंडळाच्या बस खाली सापडून एक वृद्ध महिला जागीच ठार झाल्याची घटना आज सोमवारी सकाळी शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे घडली. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, ग्रामीण भागातून बेळगाव शहरात आलेली ही 60 वर्षीय महिला चन्नम्मा सर्कल येथे डावीकडून उजवीकडे रस्ता ओलांडत होती. …
Read More »चलवेनहट्टी येथे पाणी पुरवठा समितीसह पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांची निवड
बेळगाव : चलवेनहट्टी येथील कायमस्वरूपी पाणी पुरवठा कर्मचाऱ्याला ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून बढती मिळाल्याने गावात पाणी पुरवठा कर्मचाऱ्याची कमतरता प्रकर्षाने जाणवत होती. तसेच पाणी पुरवठा समितीचीर फेर निवड करण्यात आली असून तीन वर्षांपूर्वी घाईगडबडीत ग्रामस्थांना विश्वासात न घेता पाणी पुरवठा समितीचे निवड करण्यात आली होती तरी सदर निवडीबद्दल गावातील युवकांनी …
Read More »पोहण्यासाठी गेलेल्या वडिलाचा दोन मुलांसह पाण्यात बुडून मृत्यू
बेळगाव : शेत तलावात पोहण्यासाठी गेलेल्या पिता आणि दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रायबाग तालुक्यातील निडगुंदी गावात रविवारी घडली. कल्लाप्पा बसप्पा गानिगेर (वय 36) आणि मुलगे मनोज कल्लाप्पा गानिगेर (वय 11) आणि मदना कल्लाप्पा गानिगेर (वय 9) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मित्राच्या शेत तलावात आपल्या मुलांना घेऊन …
Read More »“त्या” उद्योजकाच्या शिनोळी येथील अस्थापनावर समितीच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले!
शिनोळी : महाराष्ट्राचे वावडे असणाऱ्या उद्योजक श्रीकांत देसाई यांच्या व्यावसायिक अस्थापनांवर तसेच शिनोळी चंदगड येथील त्यांच्या फलकांवर आज रविवारी सकाळी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासत “जय महाराष्ट्र” असे लिहिले. “जय महाराष्ट्र” म्हणावयास नको आणि महाराष्ट्रात उद्योग का हवेत असा प्रश्न उपस्थित करत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी …
Read More »शहर समितीची विस्तारित यादी जाहीर; उद्या होणार बैठक
बेळगाव : शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पुनर्रचनेला अखेर मुहूर्त आला असून जवळपास ५०० कार्यकर्त्यांची जम्बो यादी जाहीर करण्यात आली आहे. मागील बैठकीत मदन बामणे यांच्याकडे विस्तारित यादी बनवण्याची जबाबदारी देण्यात आली होती त्यानुसार या सदस्यांची बैठक रविवार दि. १० मार्च २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता मराठा मंदिर येथे बोलाविण्यात …
Read More »बेळगाव तहसील कार्यालयाशेजारी काळ्या जादूचा प्रकार
बेळगाव : बेळगाव तहसीलदार कार्यालयाच्या आवारातील एका झाडाला काळी बाहुली बांधल्याचा अंधश्रद्धेचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. बेळगावातील पूर्वीची रिसालदार गल्ली व आताच्या स्वामी विवेकानंद मार्गावर महानगर पालिकेच्या जुन्या इमारतीत काही वर्षांपूर्वी बेळगाव तहसील कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आले आहे. या कार्यालयाच्या डाव्या बाजूने पार्किंगसाठी शेड …
Read More »तिर्थकुंडे येथे उद्या निकाली जंगी कुस्त्यांचे मैदान
बेळगाव : मौजे तीर्थकुंडे कौलापूरवाडा ता खानापूर येथील श्री रामलिंग मंदिर शेजारील कुस्ती आखाड्यात श्री रामलिंगेश्वर देवस्थान कमिटी तिथकुंडे कौलापूरवाडा महाशिवरात्री उत्सवानिमित्त रविवार ता. 10 मार्च रोजी दुपारी 3.00 वाजता निकाली जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे, या मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती पंजाब केसरी शांतीकुमार वि उपमहाराष्ट्र केसरी किरण …
Read More »जागा झालेला मराठी स्वाभिमान विझू देवू नका…
(३) सीमाभागात एकीकडे कर्नाटक सरकारच्या वरदहस्ताने कानडी उच्छाद वाढला असताना कर्नाटकची गुलामी करण्यात धन्यता मानणाऱ्या लाचार लोकांची सुद्धा मिजास वाढली आहे. त्याचाच परिणाम की काय हजारो लोकांच्या समक्ष अश्याच एका लाचाराची मराठी माणसाला अपमानित करण्याची मजल गेली. पण ज्या मातीत आणि लोकांच्या मनामध्ये मराठी आणि महाराष्ट्र नांदतो ती मने …
Read More »शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नव्या कार्यकरिणीची रविवारी बैठक
बेळगाव : गेल्या अनेक दिवसापासून कार्यकर्त्यांची शहर म. ए. समितीच्या पुनर्रचनेबाबत असलेल्या मागणीला मूर्त स्वरूप येणार असून येत्या रविवार दि. १० मार्च रोजी सायंकाळी ठीक चार वाजता मराठा मंदिर येथे कार्यकारणी सदस्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. शहर समितीच्या बैठकीत मदन बामणे यांना कार्यकारिणी निवडीचे आणि बैठक घेण्याचे सर्वाधिकार देण्यात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta