Monday , December 15 2025
Breaking News

बेळगाव

श्री समादेवी वार्षिक उत्सवानिमित्त नवचंडिका होम, महाप्रसाद उत्साहात संपन्न

  बेळगाव : बेळगाव शहरातील जागृत देवस्थान असलेल्या समादेवी गल्लीतील श्री. समादेवी वार्षिक जन्मोत्सवाच्या शुक्रवारी चौथ्या दिवशी श्रीला महाअभिषेक आणि नवचंडिका होम मोठ्या भक्तिभावाने करण्यात आला. श्री समादेवी मूर्तीला गौतम भटजी रामकृष्ण भटजी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीला महाभिषेक घालण्यात आला. सकाळी ६:३० ते सकाळी 11 पर्यंत नागेश शास्त्री हेर्लेकर, निळकंठ हेर्लेकर, …

Read More »

इरटीगा आणि शेवरोलेट समोरासमोर धडक; तिघांचा जागीच मृत्यू

  यरगट्टी तालुक्यातील भीषण घटना बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील यरगट्टी तालुक्यातील कुरुबगट्टी क्रॉसजवळ इरटीगा आणि शेवरोलेट यांच्यात समोरासमोर धडक झाल्याची भीषण घटना घडली आहे. या घटनेत एक महिला आणि एका मुलासह तिघांचा मृत्यू झाला. या अपघातात मुथ्थू नाईक (8), गोपाळ नाईक (45) आणि अन्नपूर्णा (53, रा. धारवाड) यांचा जागीच मृत्यू …

Read More »

क्रेडाई आयोजित बेल्काॅन व ऑटो एक्सपो प्रदर्शनास बेळगावकरांची प्रचंड दाद

  बेळगाव : येथील सीपीएड मैदानावर गुरुवारपासून सुरू झालेल्या क्रेडाईच्या बेल्कॉन या घरबांधणी संदर्भातील वस्तू प्रदर्शनास आणि यश कम्युनिकेशन्स आयोजित ऑटो एक्स्पो प्रदर्शनास समस्त बेळगावकरांनी काल व आज भेट देऊन समाधान व्यक्त केले. अशा प्रकारचे क्रेडाईतर्फे आयोजित करण्यात आलेले हे सातवे प्रदर्शन असले तरीही असे भव्य प्रदर्शन पहिल्यांदाच भरले आहे. …

Read More »

रायबाग तालुक्यात कार- दुचाकी अपघात; 6 जण ठार

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील मुगळखोडा जवळ जत-जांबोटी राज्य महामार्गावर कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 6 जण जागीच ठार झाल्याची घटना आज शुक्रवारी दि. 23 रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, मुडलगी तालुक्यातील गुर्लापूर येथून हारुगेरी शहराकडे जाणारी शिफ्ट कार, होंडा …

Read More »

खेलो इंडियात दोन सुवर्णपदकाची मानकरी ठरली अनुमती चौगुले

  बेळगाव- बेळगावची होतकरू जलतरणपटू अनुमती अनिल चौगुले हिने गुवाहाटी येथे झालेल्या खेलो इंडिया जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णपदक आणि एक कास्यपदक पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे. खेलो इंडिया ही राष्ट्रीय स्तरावरची जलतरण स्पर्धा गुवाहाटी येथे नुकतीच पार पडली. या स्पर्धेत बेंगलोरच्या जैन विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनुमती चौगुले हिने दोन …

Read More »

सखी सह्याद्री मंडळाचा उद्घाटन समारंभ आणि हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न

  बेळगाव : खडक गल्ली येथे सर्व महिलांनी एकत्रित येत सखी सह्याद्री या मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळाचा उद्घाटन समारंभ आणि हळदी कुंकू कार्यक्रम खडक गल्ली येथील वेताळ मंदिर मध्ये पार पडला. याप्रसंगी मंडळाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्यांनी एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा मीनाताई बेनके यांनी केले. तसेच यावेळी व्यासपीठावर माजी …

Read More »

मच्छे बाल शिवाजी वाचनालयात मराठी राज्यभाषा दिनी मराठीचा जागर

  बेळगाव : मराठी भाषेचा सुगंध हा न संपणारा व कायमस्वरूपी दरवळणारा आहे. तेव्हा आपल्या दैदीप्यमान, श्रीमंत मराठी भाषेचे अनंत पैलू जमतील तसे व जमतील तेव्हा उलघडत राहावे. व मराठीचा आनंद लुटत राहावा व तो मराठी जनांना देत राहावा. व हे कार्य अहोरात्र करत आहे. मच्छे येथील श्री बाल शिवाजी …

Read More »

चौथ्या मजल्यावरून पडून तरुणीचा मृत्यू

  बेळगाव : बेळगाव सदाशिव नगरमध्ये चौथ्या मजल्यावरून पडून तरुणीचा मृत्यू झाला. ओशाना रोनाल्डो पाशेको (21) असे मृत तरुणीचे नाव आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, सदाशिव नगर येथील ओम रेसिडेन्सी अपार्टमेंटमध्ये आपल्या पाळीव कुत्र्यासह तरुणी वरच्या मजल्यावर चढत असताना तिचा ताबा सुटला आणि ती खाली पडली. भावाच्या डोळ्यासमोर ही …

Read More »

कराटे स्पर्धेत आराध्या निवास सावंतला ब्लॅकबेल्ट

  बेळगांव : येथील लोकमान्य रंगमंदिरच्या सभागृहात फ्लाईंग फिट स्पोर्ट्स कराटे अकादमी आयोजित कराटे ब्लॅक बेल्ट परिक्षेत सेंट झेवियर्स शाळेची विद्यार्थिनी आराध्या निवास सावंत हिने मानाचा ब्लॅक बेल्ट किताब पटकाविला. प्रमुख पाहुणे लेफ्टनंट कर्नल पवनकुमार शर्मा, संत संस्कार इंटरनॅशनल शाळेचे मुख्याध्यापक इरगौडा पाटील, प्रशिक्षक विनायक मोरे, चेतन मोरे यांच्याहस्ते आराध्या …

Read More »

क्रेडाई बेल्काॅन व ऑटो एक्स्पोचा भव्य शुभारंभ

  बेळगाव- क्रेडाई बेळगाव, यश इव्हेंट व बेळगाव कॉस्मो राउंड टेबल 237 आयोजित बेल्काॅन व ऑटो एक्स्पो प्रदर्शनाचा शुभारंभ गुरुवारी सायंकाळी 5.30 वा सीपीएड मैदानावर संपन्न झाला. कर्नाटक क्रेडाईचे अध्यक्ष प्रदीप रायकर आणि क्रेडाईचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल कटारियाजी यांच्या हस्ते प्रवेशद्वारावरील बेल वाजवून वेगळ्या पद्धतीने प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. …

Read More »