Saturday , October 19 2024
Breaking News

बेळगाव

भारतीय प्रजादलाच्या अध्यक्षपदी दीपक हळदणकर यांची निवड

बेळगाव : बेळगाव शहर आणि ग्रामीण भागातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांनी एकत्र येऊन भारतीय प्रजादल या नावाची सामाजिक संघटना स्थापन केली आहे. या भारतीय प्रजादलाच्या अध्यक्षपदी श्री. दीपक दत्तात्रय हळदणकर यांची नेमणूक करण्यात आली. या भारतीय प्रजादलाच्या माध्यमातून गरीब निराधार जनतेची सेवा करणे तसेच जनावरांची सेवा करणे, युवकांना व्यसनापासून …

Read More »

बिबट्याची दहशत कायम!: उद्याही “त्या” 22 शाळांना सुट्टी

  बेळगाव : बेळगाव शहरासह ग्रामीण भागातील २२ शाळांना उद्या गुरुवार दि. 11 रोजी पुन्हा सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जाधव नगरमध्ये आढळलेला बिबट्या जेरबंद न झाल्याने जाधव परिसरातील 22 शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. गोल्फ कोर्सवर कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला. मुलांच्या सुरक्षिततेसाठी सुट्टी वाढवण्यात आली आहे. डीडीपीआय बसवराज नलटवाडा …

Read More »

केवळ दैव बलवत्तर! बाळ-आई बचावली

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील भुतरामनहट्टी गावात आज सकाळी एका घराची भिंत कोसळली. मुसळधार पावसामुळे घडलेल्या या घटनेत सुदैवाने दोन महिन्यांचे बाळ व आई बचावली. आठवडाभरापासून संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे भीमराय पाटील यांच्या घराची भिंत कोसळली. त्यावेळी अवघ्या दोन महिन्यांचे बाळ आणि त्याची आई सुदैवानेच बचावली. ही घटना काकती पोलीस …

Read More »

फोर्ट रोडवरील पाण्याचा निचरा योग्य करण्यासंदर्भात आमदार अनिल बेनके यांचा अधिकार्‍यांना आदेश

  बेळगांव : दिनांक 10 ऑगस्ट 2022 रोजी बेळगांव उत्तर मतदारसंघाचे आमदार अनिल बेनके यांनी फोर्ट रोड येथे नाल्यांची तपासणी केली. पावसामुळे जे नाल्यामध्ये पाणी भरत आहे त्याला जाण्यासाठी वाट करुन दिली पाहिजेत व नाला स्वच्छ केला पाहिजेत. दरवर्षी ज्या समस्या निर्माण होतात त्यावर कायमस्वरुपी उपाय करावा असा संबंधित अधिकार्‍यांना …

Read More »

आजादी का अमृत महोत्सव निमित्त भाजपा युवा मोर्चातर्फे भव्य बाईक रॅली

  बेळगांव : आजादी का अमृत महोत्सव निमित्त हर घर तिरंगा भव्य बाईक रॅली बेळगांव उत्तर मतदारसंघात भाजपा युवा मोर्चा बेळगांव महानगर व भाजपा उत्तर मंडळ यांच्यातर्फे आयोजित करण्यात आली. यावेळी श्री. राजेश जी (राज्य संघटना प्रधान कार्यदर्शी) म्हणाले की, आता आम्ही 75 च्या वर्षाच्या अमृत महोत्सवात आहोत हे आमचे …

Read More »

मराठा सेवा संघातर्फे मराठा युवा, युवती, महिला उद्योजक मेळावा संपन्न

बेळगाव : मंगळवार दिनांक ०९/०८/२०२२ रोजी मराठा सेवा संघ वडगाव बेळगावच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त श्री तुकाराम महाराज सामाजिक सांस्कृतिक भवन (ओरिएंटल स्कूल), बेळगाव येथे मराठा युवा, युवती, महिला उद्योजक मेळावा घेण्यात आला. तरी या मेळाव्याला प्रमुख वक्ते म्हणून हजारो युवा उद्योजक निर्माण करणारे आणि लोकांच्या जीवनात टर्निंग पॉईंट ठरलेले …

Read More »

पावसाळ्यात घरे गमावलेल्यांना त्वरित मदत : आमदार लक्ष्मी हेब्बाळकर

  बेळगाव : काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तुम्मुरगुद्दी गावातील अनेक घरांची पडझड झाली असून बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तुम्मुरगुद्दी गावात 10-12 घरांची पडझड झाली असून रहिवाशांचे हाल होत आहेत. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घरे गमावलेल्या कुटुंबांचे सांत्वन करून त्यांना धीर …

Read More »

बस्तवाड (हलगा) येथे घर कोसळून आर्थिक नुकसान

  बेळगाव : नेताजी गल्ली बस्तवाड (हलगा) येथील रहिवासी परशराम काकतकर यांचे गेल्या चार दिवसांपासून पडणाऱ्या सततच्या पावसामुळे राहते घर कोसळले आहे. त्यामुळे या कुटुंबाचे बरेच आर्थिक नुकसान झाले आहे. काकतकर कुटुंबियांचे राहते घर कोसळल्यामुळे जीवनोपयोगी वस्तूंचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र राहते …

Read More »

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाची हिंडलगा येथे जागृती फेरी उत्साहात

हिंडलगा : हिंडलगा येथील महालक्ष्मी देवी यात्रोत्सव संघातर्फे दि. 10 रोजी सकाळी आठ वाजता हिंडलगा येथे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी प्रत्येक घरा घरात आपला तिरंगा राष्ट्रध्वज फडकवावा. शनिवार, रविवार व सोमवार दि. 15 ऑगस्ट 2022 असे तीन दिवस मोठ्या डौलाने फडकविण्यासाठी मोटरसायकल फेरी काढण्यात आली. या फेरीचे …

Read More »

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक राजेंद्र कलघटगी यांचा पालकमंत्र्यांकडून सत्कार

बेळगाव :  क्रांती दिन पार पडला. त्याचबरोबर संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्याचे प्रभारी पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी आज बुधवारी बेळगाव येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक राजेंद्र कलघटगी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान राजेंद्र कलघटगी यांनी स्वातंत्र्यसंग्रामातील आठवणींना उजाळा करून दिला. …

Read More »