Saturday , October 19 2024
Breaking News

बेळगाव

टिळकवाडी येथील सरकारी शाळांमध्ये पंतप्रधान पोषण योजनेचा शुभारंभ

बेळगाव : टिळकवाडी विभागात पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत टिळकवाडी येथील सरकारी प्राथमिक शाळा क्रमांक 20, शाळा क्रमांक 36, शाळा क्रमांक 38 व गजानन महाराज नगर प्राथमिक शाळा या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आहाराचे वितरण करण्यात आले. बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी या …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक मंगळवारी

बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची व कार्यकर्ते यांची महत्वपूर्ण बैठक मंगळवार दि. 2 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता रंगूबाई भोसले पॅलेस रामलिंगखिंड गल्ली बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. सर्वांनी वेळेवर हजर राहावे, असे आवाहन अध्यक्ष श्री. दीपक दळवी यांनी केले आहे.

Read More »

मैत्रिदिनी शेतकऱ्याने वाचवले नागसापाचे प्राण!

  बेळगाव : सापाला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात कारण शेतपिकातील उंदीर खाऊन साप शेतकऱ्याला एकप्रकारे मदतच करतो. मात्र आज मैत्रिदिनी एका शेतकऱ्याने नागसापाचे प्राण वाचवून खऱ्या अर्थाने मैत्रीचे नाते निभावले असे म्हणावे लागेल. याबाबतची सविस्तर महिती अशी की, हंदिगनूर येथील शिवारात एक नाग साप विहिरीत पडल्याचे निदर्शनास आले. लागलीच त्या शेतकऱ्याने …

Read More »

मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ शहापूर विभागाची बैठक संपन्न

  बेळगाव : कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्ष सार्वजनिक गणेशोत्सव निर्बंधांमध्ये साजरा करण्यात आला. त्यानंतर आता यावर्षी प्रशासनाने सार्वजनिक गणेशोत्सवाला परवानगी दिली आहे. मात्र पीओपी मूर्ती आणि डॉल्बीवर प्रशासनाने बंदीचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाच्या ऐनवेळीच्या निर्णयामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. याकडे लक्ष देऊन जिल्हा प्रशासनाने गणेशोत्सवासंदर्भात महत्त्वाचे निर्णय …

Read More »

बेळगावात जगन्नाथ तथा नाना शंकर शेठ यांची 157 वी पुण्यतिथी

बेळगाव : बेळगावात दैवज्ञ ब्राह्मण समाज शिक्षण संस्थेतर्फे प्रख्यात समाजसेवक, आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ तथा नाना शंकर शेठ यांची 157 वी पुण्यतिथी रविवारी संयुक्त महाराष्ट्र चौकात गांभीर्याने पाळण्यात आली. बेळगावातील नाना शंकर शेठ मार्ग, खडेबाजार येथील संयुक्त महाराष्ट्र चौकात आज रविवारी प्रख्यात समाजसेवक, आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ तथा नाना शंकर …

Read More »

बेळगावसह तीन ठिकाणी एनआयएचे छापे; तीन संशयित दहशतवाद्यांना अटक

  बेंगळुरू: एनआयए (राष्ट्रीय तपास संस्था) ने राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी छापे टाकले आणि तीन संशयित दहशतवाद्यांना अटक केली. आज पहाटे उत्तर कन्नडमधील बेळगाव, तुमकूर आणि भटकळ येथे छापे टाकणाऱ्या एनआयएच्या पथकाने तीन ठिकाणी प्रत्येकी एक अशा तीन संशयित दहशतवाद्यांना अटक केल्याची माहिती आहे.

Read More »

क्रेडाई शिष्टमंडळाने घेतली जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांची भेट

  बेळगाव : क्रेडाई बेळगाव संस्थेच्या शिष्टमंडळाने शनिवारी जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांची भेट घेऊन शहरातील विविध समस्यांबाबत त्यांच्याशी चर्चा केली. क्रेडाई बेळगावचे अध्यक्ष पी. एस. हिरेमठ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सर्वप्रथम बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉ. संजीव पाटील यांचे अभिनंदन व स्वागत केले. त्यानंतर त्यांना क्रेडाईच्या …

Read More »

बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचा वर्धापन दिन उद्या

  बेळगाव : बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचा वर्धापन दिन सोमवार दिनांक १ ऑगस्ट रोजी आहे. वर्धापन दिनानिमित्त पत्रकार संघाच्या कुलकर्णी गल्ली येथील पद्मावती चेंबर्स येथील पत्रकार भवन येथे सकाळी साडे दहा वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रा. दत्ता नाडगौडा हे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. वर्धापन …

Read More »

जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम प्राइड सहेलीची नीता किड्सला भेट

  बेळगाव : प्राइड सहेलीच्या सेक्रेटरी जिग्ना शहा यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त नीता किड्समध्ये छोट्या मुलांच्या rhymes अँड स्टोरी टेलिंगच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. नीता किड्स वर्ल्डमध्ये साधारण 30 छोटी मुले आहेत. या मुलांच्यातील कलागुणांना समोर आणण्यासाठी या स्पर्धा अध्यक्ष आरती शहा यांच्या अध्यक्षतेखाली भरवण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली. …

Read More »

अंत्यविधीस चक्क वानराची हजेरी!

  बेळगाव : शहापूर स्मशाभूमीत अंत्यविधीच्या वेळी चक्क एका वानराने हजेरी लावली. इतकेच नव्हे तर ते वानर भावुक देखील झाले. हिंदू धर्मात वानराला बजरंगबली मारुतीरायचे प्रतिरूप मानले जाते. आज शनिवार आणि मृत व्यक्तीचे नाव देखील मारुती असल्यामुळे शहापूर स्मशानभूमीत घडलेला प्रकार चांगलाच चर्चेत आहे. याबाबत समजलेली हकीकत अशी की, जोशी …

Read More »