Saturday , October 19 2024
Breaking News

बेळगाव

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे : ज्येष्ठ विचारवंत आर. वाय. पाटील

  द. म. शि. मंडळ भाऊराव काकतकर महाविद्यालय व माजी विद्यार्थी संघटनेची बैठक बेळगांव : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आजची शिक्षण पद्धती ही केवळ पुस्तकी ज्ञानावर आधारलेली असून तिच्यामध्ये आमूलाग्र बदल करणे गरजेचे आहे. माणसाला जगण्यासाठी व जीवनासाठी शिक्षणामधून ज्ञान मिळाले पाहिजे, त्यासाठी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी पुढाकार …

Read More »

‘प्रगतिशील’च्या बैठकीत संमेलनाचा हिशोब सादर

बेळगाव : प्रगतिशील लेखक संघाच्या साप्ताहिक बैठकीत संघाने आयोजित केलेल्या पहिल्या मराठी साहित्य संमेलनाचा जमाखर्च सादर करण्यात आला. संघाचे कार्यवाह कॉ. कृष्णा शहापूरकर यांनी जमाखर्च सादर केला व संमेलन यशस्वी करण्यासाठी ज्या संस्था आणि व्यक्तींनी सहकार्य केले त्यांचे आभार मानले. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात साहित्य संमेलन आयोजित केले जाईल असे …

Read More »

प्रगतिशील लेखक संघात संतसाहित्यावर चर्चा

बेळगाव : प्रगतिशील लेखक संघाच्या गेल्या शुक्रवारी झालेल्या साप्ताहिक बैठकीत आषाढी एकादशीनिमित्त संतसाहित्य व चळवळ या विषयांवर चर्चा झाली. अध्यक्षस्थानी प्रा. आनंद मेणसे होते. मेणसे यांनी तुकाराम यांच्यापासून ते तुकडोजी महाराज यांच्या पर्यंतच्या भारतातील संत परंपरेची माहिती दिली. सर्वच संतानी अंधश्रद्धा अनिष्ट रुढी बुवाबाजी यावर आपल्या भजन किर्तनातून कठोर प्रहार …

Read More »

कृष्णा नदीतून कर्नाटक राज्यात ५ हजार क्‍युसेक पाण्याचा विसर्ग; ग्रामस्थांमध्‍ये महापुराची भीती

कुरुंदवाड : कृष्णा नदी क्षेत्रात सतत पाऊस सुरू असल्याने पाणी पातळीत दोन फुटांनी वाढ होऊन २९ फूट तीन इंच पाणी पातळी झाली आहे. राधानगरी धरण क्षेत्रात पावसाने थोडीशी उसंत घेतल्याने एक फुटाने पाणी पातळी कमी होऊन ३२ फूट सात इंच इतकी पाणी पातळी झाली आहे. आज सकाळी पाटबंधारे विभागाने दिलेल्या …

Read More »

जैन कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून कित्तूर राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयाला व्हील चेअर्सची देणगी

बेळगाव : वृद्ध आणि दिव्यांग पर्यटकांच्या सोयीसाठी जैन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी भूतरामनहट्टी येथील कित्तूर राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयाला व्हील चेअर्स देणगी दाखल दिल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते ॲलन विजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त उपक्रम राबविण्यात आला. कित्तूर राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयाला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये कांही वेळेला वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींचाही समावेश असतो. …

Read More »

बेळगावात बकरी ईद सण मोठ्या उत्साहात साजरा

बेळगाव : जोरदार पाऊस असूनही बेळगावात मुस्लिम बांधवांनी रविवारी बकरी ईद सण मोठ्या उत्साहात साजरा केला. बेळगावातील विविध मशिदींमध्ये सकाळी ईदच्या नमाजचे आयोजन करण्यात आले होते. अंजुमन संस्थेतर्फे शहरातील ईदगाह मैदानावर सकाळी ९ वाजता ईदची सामुहिक नमाज अदा करण्यात आली. पाऊस असूनही ईदगाह मैदानावर झालेल्या नमाजात मोठ्या संख्येने लोक सहभागी …

Read More »

ही ‘खावा समिती’ कोण?

  बेळगाव : खासदार संजय राऊत यांनी नाशिक येथे आपल्या भाषणात सीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करावी अशी जाहीर घोषणा केली. सदर घोषणा करण्यापूर्वी त्यांनी सांगितले की, मला सीमाभागातील एक शिष्टमंडळ नुकतेच भेटून गेले. आजवर सीमाप्रश्नासंदर्भात जे काही छोटे-मोठे कार्यकर्ते …

Read More »

पंढरपूरजवळ झालेल्या अपघातात बेळगावच्या दोघांचा मृत्यू

बेळगाव : बेळगावमधील अनगोळ येथील पाच भाविक सेल्टोस गाडीने पंढरपूरकडे येत असताना रविवारी पहाटे कासेगाव फाटा (ता. पंढरपूर) येथे अपघात झाला. या अपघातात दोन भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. या अपघातात राजू संभाजी शिंदोळकर (वय ४५, रा. अनगोळ, ता. बेळगाव), परशुराम संभाजी झंगरूचे (वय ५० …

Read More »

अमरनाथ येथील ढगफुटीतून बेळगावचे दोन भाविक बचावले

बेळगाव : अमरनाथ गुहेजवळ ढगफुटीच्या आपत्तीतून सांगलीचे रवींद्र काळेबेरे व बेळगावचे विनोद काकडे हे दोन यात्रेकरू बचावले आहेत. प्रसंगावधान राखत तंबूतून बाहेर पळत सुरक्षित ठिकाणी गेल्‍याने ते दुर्घटनेतून बचावले. सांगली, कोल्हापूर, शिरोळ, जयसिंगपूर तसेच सातारा, पुणे, बेंगलोर, बेळगाव येथील ५० यात्रेकरूंनी अमरनाथ यात्रा अर्ध्यावर सोडून परतीचा मार्ग धरला आहे, अशी …

Read More »

साई ज्योती सेवा संघाकडून गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण

बेळगाव : आज स्पंदनवन मक्कळधाम येथे कुमार धीरज दीपक चडचाळ याचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने साई ज्योती सेवा संघाकडून गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना ज्योती निलजकर म्हणाल्या की, साई ज्योती सेवा संघ ही नेहमीच सामाजिक बांधिलकी जपून कार्य करणारी संस्था आहे. यावेळी उपसंचालिका ज्योती बाके, …

Read More »