Sunday , December 14 2025
Breaking News

बेळगाव

गौरवधनाचे ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना बोनस स्वरूपात वाटप

  बेळगांव : तालुक्यातील दिवाळीनिमित्त कंग्राळी बुद्रुक गावचे ग्राम पंचायत सदस्य यल्लोजीराव पाटील यांनी एक आदर्श सर्वांसमोर ठेवला. सरकारकडून ग्राम पंचायत सदस्यांना देण्यात येणारे गौरवधन स्वतः न वापरता ग्राम पंचायतीमध्ये काम करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोनस स्वरूपात वाटप केले. आज लक्ष्मीपूजनच्या दिवशी यल्लोजीराव पाटील यांनी ग्राम पंचायत कार्यालयामध्ये जाऊन ग्राम पंचायत …

Read More »

चंदगड तालुका मराठी अध्यापक संघ व बेळगाव मिडीया असोसिएशन यांची वंचितासोबत दिवाळी साजरी

  चंदगड : दिवाळी म्हणजे अंधार दूर करणाऱ्या दिव्यांचा सण. दिवाळी म्हणजे आनंद वाटण्याचा सण. असाच आनंद चंदगड मराठी अध्यापक संघाच्या वतीने पाटणे फाटा येथील भंगार गोळा करणाऱ्या व हलकर्णी फाट्यावरील लमाण समाजासोबत वाटला आहे. गरीबीच्या पसाऱ्यात त्यांचा जन्म झाला आणि यातच त्यांच्या आयुष्याच्या वाटा निसरटया झाल्या. आपल्यासाठी कोणीतरी गोड …

Read More »

महिलेचे दोन तोळ्याचे मंगळसूत्र लांबवले; महांतेशनगरमधील प्रकार

  बेळगाव : सायंकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे मंगळसूत्र हिसडा मारून लांबविल्याची घटना शुक्रवारी (दि. १०) रात्री सातच्या सुमारास महांतेशनगरमध्ये घडली. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, महांतेशनगरमधील पी अँड टी क्वॉटर्समध्ये राहणाऱ्या शांता जमकी या सायंकाळी फिरण्यासाठी बाहेर पडल्या फिरून त्या घराकडे परतत होत्या. घराजवळ पोचल्यानंतर आत …

Read More »

निर्मला हायस्कूल येथे मानसिक तणावातून मुक्ती विषयी मार्गदर्शन

  बेळगाव : तणावमुक्त आनंदी जीवन जगण्यासाठी 14416 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून आपल्याला भेडसावत असणाऱ्या मानसिक तणावातून मुक्ती मिळवा, असे प्रतिपादन जिल्हा रुग्णालयाचे मानसिक आरोग्य चिकित्सक डॉक्टर सुनील जबागौडर यांनी मोदगा येथील निर्मला हायस्कूल निर्मल नगर येथे “मानसिक तणावातून मुक्ती” या कार्यक्रमात केले. डी एडिक्शन सेंटर आणि पुनर्वसन केंद्रातर्फे …

Read More »

दोरीचा गळ्याला फास लागून शाळकरी मुलाचा मृत्यू

  बेळगाव : खिडकीला टांगलेली दोरी गळ्यात अडकवून खेळताना गळ्याला फास लागून एका शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एपीएमसी रोड येथील मार्कंडेयनगर येथे शुक्रवारी दुपारी ही घटना घडली आहे. ऐन दिवाळीत शाळकरी मुलाच्या दुर्दैवी मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. आदित्य बसाप्पा नागराळ (१०) रा. मार्कंडेयनगर असे त्या दुर्दैवी मुलाचे …

Read More »

भारत विकास परिषदेच्या प्रांतस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत केएलएस स्कूल प्रथम

  बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने आयोजित गंगावती येथे झालेल्या प्रांतस्तरीय आंतरशालेय “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धेत बेळगावचे प्रतिनिधित्व केलेल्या केएलएस शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. प्रणीत भिंगुर्डे व कुबेर रेवणकर ( के.एल.एस. स्कूल) यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करत बेळगांव शाखेला हा मान मिळवून दिला. त्यांची आता विशाखापट्टणम येथे 26 नोव्हेंबर …

Read More »

राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेत संत मीराला उपविजेतेपद

  बेळगाव : दावणगिरी येथील जिल्हा क्रीडांगणावर सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक मुलांच्या राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेत बेळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेने उपविजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलांच्या गटात पहिल्या सामन्यात बेळगांवने म्हैसूरचा‌ 18 -15 असा पराभव केला, दुसऱ्या सामन्यात बेळगावने गुलबर्गाचा 28 -19 असा …

Read More »

बबन भोबे मित्रमंडळ आणि स्वामी विवेकानंद रिक्षा स्थानक यांच्यावतीने फराळाचे वाटप

  बेळगाव : बबन भोबे मित्रमंडळ, बेळगाव आणि स्वामी विवेकानंद रिक्षा स्थानक यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी आणि आश्रमातील मुलांना फराळाचे वाटप करून दीपावली साजरी करण्यात आली. सकल मराठा समाजाचे नेते आणि भाजप राज्य ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस किरण जाधव यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पाडण्यात आला. यावेळी बोलताना किरण जाधव यांनी, …

Read More »

सीमाभागातील विविध समस्यांबाबत समिती शिष्टमंडळाने घेतली शरद पवार यांची भेट

  बेळगाव : सीमाभागातील मराठी शाळांबाबत तसेच विविध समस्यांबाबत चंद्रकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद यांची पुणे मुक्कामी मोदी बाग येथे भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली. कंग्राळी बी. के. येथील मराठी शाळेचा प्रश्न शरद पवार यांच्या पुढे मांडण्यात आला. त्यावेळी …

Read More »

व्ही. एस. खवरे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

बेळगाव : कंग्राळी बी. के. येथील माध्यमिक विद्यालयाचे लिपिक व्ही. एस. खवरे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त नुकताच सत्कार करण्यात आला. विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. एम. हुलगबाळी अध्यक्षस्थानी होते. विश्व भारत सेवा समितीच्या कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. के. पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. …

Read More »