Sunday , September 20 2026
Breaking News

डोक्यात काठीने हल्ला करून एका युवकाचा निर्घृण खून

Spread the love

 

बेळगाव : डोक्यात काठीने वार केल्याने एका तरुणाचा निर्घृण खून झाल्याची घटना शुक्रवारी रात्री सायंकाळी कॅम्प परिसरात घडली. गणेश प्रकाश कांबळे (वय २९, रा. तेलगू कॉलनी, मोची पल्ली, कॅम्प) असे मृत युवकाचे नाव असून याप्रकरणी त्याच गल्लीतील तरुण मंजुनाथ नायक (वय २०) याच्यावर कॅम्प पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, गणेश आणि तरुण हे दोघेही एकाच गल्लीतील रहिवासी असून ते मित्रही होते. मात्र, शुक्रवारी सायंकाळी तरुण गणेशच्या घरी गेला होता. त्या ठिकाणी दोघांमध्ये वादावादी झाली. यावेळी रागाच्या भरात तरुणने गणेशच्या डोक्यात काठीने वार केला. वार वर्मी बसल्याने तो जागीच ठार झाला.
गणेशवर झालेला हल्ला त्याच्या मोठ्या काकांनी पाहिला. खुनाची घटना उघडकीस येताच गल्लीत एकच गोंधळ उडाला. याबाबत समजताच कायदा व सुव्यस्था विभागाचे पोलिस उपायुक्त रोहन जगदीश, वाहतूक व गुन्हे तपास विभागाच्या पोलिस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी भेट देऊन पाहणी केली.
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयातील शवागृहात हलविण्यात आला आहे. खुनाचे निश्चित कारण अद्याप अस्पष्ट आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *